नवीन आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

मित्रहो आपण आज या लेखात नवीन आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.

Adhar card document list in Marathi

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे Adhar card document list in Marathi

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी किंवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ही पुढीलप्रमाणे दिली आहेत.

A) ओळखीचा पुरावा (यामध्ये तुमचे नाव व फोटो समाविष्ट गरजेचे आहे)
B) पत्त्याचा पुरावा (यामध्ये तुमचे नाव आणि पत्ता असणे गरजेचे आहे)
C) जन्मतारखेचा पुरावा
D) नातेसंबंधाच्या कागदपत्राचा पुरावा ( घरातील मुख्य व्यक्तीसंदर्भातील माहिती यामध्ये समाविष्ट असावी)

आधारकार्ड काढताना ह्या कागदपत्रांची मुळप्रत तुम्हाला द्यावी लागते व ही कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला परत दिली जातात.

यातील प्रत्येक पुराव्यासाठी लागणारी विविध कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत

A] ओळखीचा पुरावा (यापैकी कोणतेही एक):

खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून सादर करू शकता.

१) रेशन कार्ड

२) स्वातंत्र्य सैनिक कार्ड (फोटोसहीत)

३) पॅन कार्ड

४) पीएसयु किंवा सरकारद्वारा मिळालेले फोटो

५) पारपत्र

६) एटीएम कार्ड (फोटोसहीत)

७) मतदार ओळखपत्र

८) पेन्शनर कार्ड (फोटोसहीत)

९) क्रेडिट कार्ड (फोटोसहीत)

१०) शस्त्र परवाना

११) वाहन चालक परवाना

१२) मान्यताप्राप्त शालेय संस्थेकडून मिळालेले आयडी कार्ड

१३) विवाह प्रमाणपत्र (फोटोसहीत)

१४) नरेगा जॉब कार्ड

१५) किसान कार्ड (फोटोसहीत)

१६) तहसीलदार किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून मिळालेले ओळखीचे प्रमाणपत्र

१७) पंचायतीकडून मिळालेले ओळखीचे प्रमाणपत्र (फोटोसहीत)

१८) पोस्टाकडून मिळालेले नाव व फोटो असलेले पत्त्याचे कार्ड

१९) ECHS/CGHS कार्ड

२०) SC/OBC/ST प्रमाणपत्र (फोटोसहीत)

२१)SSLC बुक

२२) राज्य/ केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून मिळालेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र किंवा दिव्यांग ओळख पत्र

२३) भामाशाह कार्ड

२४) विधानसभा सदस्य/ संसद सदस्य नगरसेवक यांची स्वाक्षरी असणारे ओळख प्रमाणपत्र

२५) RSBY कार्ड

२६) नाव बदलले असल्यास राजपत्र अधिसूचना

B] जन्मतारखेचा पुरावा असलेली कागदपत्र:

खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र तुम्ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करू शकता.

१) जन्म दाखला

२) पॅन कार्ड

३) पारपत्र

४) सरकारी विद्यापीठाकडून मिळालेले शालेय प्रमाणपत्र

५) SLSC प्रमाणपत्र/ बुक

६) ECHS/CGHS फोटो कार्ड

७) गट अ राजपत्रित अधिकाऱ्याकडून मिळालेले जन्मतारखेसंदर्भातील प्रमाणपत्र

८) पीएसयु किंवा सरकारकडून मिळालेले व जन्मतारीख असणारे फोटो आयडी कार्ड

९) मान्यताप्राप्त शाळा / महाविद्यालयातून मिळालेले ओळखपत्र (जन्मतारखेसहित)

१०) राज्य /केंद्रीय पेन्शन पेमेंट ऑर्डर

C] नातेसंबंधाच्या कागदपत्राचा पुरावा:

खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र तुम्ही नातेसंबंधाच्या कागदपत्राचा पुरावा म्हणून सादर करू शकता.

१) जन्माचा दाखला

२) आर्मी ग्रीटिंग कार्ड

३) राज्य सरकार/ECHS/ ESIC/CGHS वैद्यकीय कार्ड.

४) पीडीएस कार्ड

५) पारपत्र

६) पेन्शन कार्ड

७) नरेगा जॉब कार्ड

८) भामाशाह कार्ड

९) लग्नाचे प्रमाणपत्र

१०) पोस्टाकडून मिळालेले नाव व फोटो असलेले पत्त्याचे कार्ड

११) विधानसभा सदस्य/ संसद सदस्य नगरसेवक यांची स्वाक्षरी असणारे ओळख प्रमाणपत्र

१२) मुलाच्या जन्माच्या वेळी सरकारी दवाखान्यातून मिळालेली डिस्चार्जची स्लीप

१३) ग्रामपंचायतीकडून मिळालेले घरातील मुख्य व्यक्तीशी असलेल्या नात्यासंदर्भातील प्रमाणपत्र

D] पत्त्याचा पुरावा:

खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र तुम्ही पत्त्याचा पुरावा पुरावा म्हणून सादर करू शकता.

१) मालमत्ता कर पावती

२) पारपत्र

३) विमा पॉलिसी

४) पासबुक/ बँक स्टेटमेंट

५) क्रेडिट कार्ड स्टेटमेंट

६) रेशन कार्ड

७) दूरध्वनी देयक

८) वाहन चालक परवाना

९) वीज देयक

१०) मतदार ओळखपत्र

११) गॅस देयक

१२) पोस्ट ऑफिसचे पासबुक किंवा बँक स्टेटमेंट

१३) पीएसयु किंवा सरकारी फोटो आयडी कार्ड

१४) बँकेने लेटरहेडवर दिलेले व फोटो असलेले पत्र

१५) SSLC बुक (फोटो सहित)

१६) शस्त्र परवाना

१७) नोंदणीकृत कंपनीने लेटरहेडवर दिलेले व फोटो असलेले पत्र

१८) NREGS जॉब कार्ड

१९) शालेय संस्थेकडून मिळालेले व पत्ता नमूद केलेले फोटो आयडी

२०) पेन्शनर कार्ड

२१) ECHS/CGHS कार्ड

२२) शाळेतील ओळखपत्र

२३) किसान पासबुक

२४) प्राप्तीकर मूल्यांकन ऑर्डर

२५) स्वातंत्र्यसैनिक कार्ड

२६) नोंदणीकृत विक्री/ भाडे करार

२७) भामाशाह कार्ड

२८) वाहन नोंदणी प्रमाणपत्र

२९) विधानसभा सदस्य/ संसद सदस्य नगरसेवक यांची स्वाक्षरी असणारे पत्त्यासंदर्भातील प्रमाणपत्र

३०) राज्य/ केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून मिळालेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र किंवा दिव्यांग ओळख पत्र

३१) पालकांचे पारपत्र

३२) पोस्टाकडून मिळालेले नाव व फोटो असलेले पत्त्याचे कार्ड

३३) राज्य शासनाकडून मिळालेले व फोटो असलेले जातीचे किंवा अधिवास प्रमाणपत्र

३४) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेने दिलेले ओळखपत्र

३५) पतीचे/पत्नीचे पारपत्र

३६) सरकारी कार्यालयातून मिळालेले व फोटो असणारे लग्नाचे प्रमाणपत्र

३७) राज्य/केंद्र शासनाकडून मिळालेले निवासी वाटप पत्र (तीन वर्षापेक्षा जुने असावे)

३८) ग्रामपंचायतीतील मिळालेले पत्त्याचे प्रमाणपत्र

३९) अनाथालयांसाठी मान्यताप्राप्त निवारा गृहांचे संस्था प्रमुख/अधीक्षक यांनी दिलेले लेटरहेडवरील प्रमाणपत्र.

४०) नगरसेवकाकडून मिळालेले पत्त्याचे प्रमाणपत्र (फोटो सहित)

४१) पाणी देयक

तर अशाप्रकारे आम्ही या Adhar card document list in Marathi लेखात आधार कार्ड साठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Share on:

Leave a Comment