सीईटी परीक्षा म्हणजे काय? संपूर्ण माहिती

CET Exam Information in Marathi मित्रहो आज आपण या लेखात सीईटी परीक्षा म्हणजे काय आणि त्याविषयीची भरपूर माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊया या.

CET Exam Information in Marathi

सीईटी परीक्षा म्हणजे काय | CET Exam Information in Marathi

सीईटी म्हणजे काय?

सीईटी याचा अर्थ सामायिक प्रवेश परीक्षा असा होतो. ही परीक्षा विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते. CET चे full form हे Common Entrance Test असे आहे.

विद्यार्थ्यांना या परीक्षेत मिळणाऱ्या गुणवत्ता यादीनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या परीक्षा देणे गरजेचे असते. तसेच विविध कोर्सेस साठी विविध प्रकारच्या सीईटी घेतल्या जातात. त्यातील काही परीक्षा पुढे नमूद केल्या आहेत.

१) दहावी सी.इ.टी:

दहावीनंतर 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी असणारी ही परीक्षा ऐच्छिक स्वरुपाची आहे.
यामध्ये सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया मध्ये प्राधान्य दिले जाते व त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणांच्या आधारे 11 वी मध्ये प्रवेश दिला जातो.

परीक्षेचे स्वरूप:

१) ही परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावरच घेतली जाते.
२) हा पेपर एकूण शंभर गुणांचा असतो व यामध्ये पुढील विषयांचा समावेश केला जातो.
अ) इंग्रजी – २५ गुण
ब) गणित – २५ गुण
क) विज्ञान – २५ गुण
ड) सामाजिक शास्त्र – २५ गुण
३) हा पेपर सोडवण्यासाठी एकूण दोन तासाचा अवधी दिला जातो.
४) यातील प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.

परीक्षादहावी सी.इ.टी
पात्रतादहावी
प्रश्न संख्या१००
एकूण गुण१००
वेळ२ तास

२) एमएचटी सी.इ.टी:

बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी तसेच औषध निर्माण क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एमएचटी सी.इ.टी परीक्षा देणे गरजेचे असते.

यासाठी असणारा अभ्यासक्रम हा बारावी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमासारखाच असतो. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे (MSBTE) घेतली जाते.

परीक्षेचे स्वरूप:

१) अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र वा गणित हा पेपर द्यावा लागतो.
२) वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र आणि रसायनशास्त्र व जीवशास्त्र हा पेपर द्यावा लागतो
३) यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धती वापरली जात नाही

यातील प्रत्येक पेपर संदर्भातील तपशील पुढीलप्रमाणे आहे:-

१) भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र (physics and chemistry):

यातील प्रत्येक विषयावर 50 प्रश्न विचारले जातात म्हणजेच दोन्ही विषयांचे मिळून एकूण शंभर प्रश्न असतात.
प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण मिळतो.

हा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्याला 90 मिनिटांचा अवधी मिळतो. यातील प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.

२) गणित (mathematics):

यामध्ये एकूण 50 प्रश्न विचारले असतात. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी असतो.

हा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्याला 90 मिनिटांचा अवधी मिळतो. यातील प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.

३) जीवशास्त्र (biology):

यामध्ये जीवशास्त्र या विषयावर एकूण 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 1 गुणासाठी असतो.

हा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्याला 90 मिनिटांचा अवधी मिळतो. यातील प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.

परीक्षाएमएचटी सी.इ.टी
पात्रताबारावी (विज्ञान)
प्रश्न संख्या१००(भौतिक+रसायन) + ५० (गणित/ जीवशास्त्र)
एकूण गुण२००
वेळ१८० मिनिट

३) एम.ए.एच. सीईटी (एम बी ए):

एम बी ए तसेच एम.एम.एस. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बॅचलर पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर ही परीक्षा द्यावी लागते.

यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणांच्या क्रमवारीनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे (MSBTE) घेतली जाते.

पात्रता:

यासाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी ५०% टक्के गुणांसोबत उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच मागासवर्गीय व विकलांग उमेदवारांना ४५% इतकी मर्यादा आहे.

यासाठी लागणारी कमीत कमी वयोमर्यादा 21 वर्षे इतकी असते.

परीक्षेचे स्वरूप:

यामध्ये असणाऱ्या परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

१) हा पेपर सोडवण्यासाठी एकूण दोन तासांचा अवधी असतो
२) यामध्ये एकूण २०० प्रश्न विचारले जातात.
३) यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत वापरली जात नाही.
४) प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण दिला जातो
५) प्रश्नांची विषयानुसार केलेली वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे.
लॉजिकल रिझनिंग : ७५ गुण
ॲबस्ट्रॅक्ट रीजनिंग: २५ गुण
क्वांटिटेटिव्ह ॲप्टीट्युड : ५० गुण
व्हर्बल ॲबिलिटी/ रीडींग कॉम्पिटिशन : ५० गुण

परीक्षाएम.ए.एच. सीईटी (एम बी ए)
पात्रताबॅचलर पदवी
प्रश्न संख्या२००
एकूण गुण२००
वेळ२ तास

४) एम.ए.एच. बी.एड. सीइटी :

ही परीक्षा बॅचलर पदवी नंतर बी.एड. कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी द्यावी लागते. बीए बीकॉम तसेच बीएस्सी नंतर ज्यांना शिक्षक बनण्यासाठी बी.एड या कोर्ससाठी प्रवेश मिळवायचा असतो त्या उमेदवारांनी ही परीक्षा द्यावी लागते.

पेपरचा आराखडा:

पेपर साठी असणारा सर्वसाधारण आराखडा पुढील प्रमाणे आहे

१) ह्या पेपर साठी ९० मिनिट इतका वेळ दिला जातो.
२) ही परीक्षा एकूण शंभर गुणांची असते
३) प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण मिळतो
४) यातील प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात
५) यामध्ये निगेटिव मार्किंग केली जात नाही
६) या परीक्षेसाठी असणारा पेपर गुणांनुसार पुढीलप्रमाणे विभागला जातो.
मानसिक क्षमता : या विभागांमध्ये 40 प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला एक मार्क दिला जातो. यामध्ये पुढील काही विषयांवर प्रश्न विचारले जातात
सामान्य ज्ञान : या विभागांमध्ये 30 प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला एक मार्क दिला जातो
शिक्षक योग्यता : या विभागांमध्ये 30 प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला एक मार्क दिला जातो.

परीक्षाएम.ए.एच. बी.एड. सीइटी
पात्रताबॅचलर पदवी
प्रश्न संख्या१००
एकूण गुण१००
वेळ९० मिनिट

अशा प्रकारे आम्ही CET Exam Information in Marathi या लेखात सीईटी या परीक्षेबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील वाचा:-

Share on:

2 thoughts on “सीईटी परीक्षा म्हणजे काय? संपूर्ण माहिती”

Leave a Comment