[मराठी] क्रेडिट कार्ड म्हणजे काय | Credit card information in marathi 2021

नमस्कार मित्रांनो तुम्ही Credit card information in marathi हे शोधत आहात का ? आजकालच्या जगात क्रेडिट कार्डचा उपयोग खूप प्रमाणात होत आहे. या लेखात आम्ही क्रेडिट कार्ड बद्दल सर्व महत्वपूर्ण माहिती सांगितले आहे जसेकी क्रेडिट कार्ड म्हणजे काय, त्याचा उपयोग, त्याचे फायदे – तोटे या बद्दल सर्व माहिती दिली आहे आशा करतो की तुम्हाला ते आवडेल.

Credit card information in marathi
credit-card-information-in-marathi

क्रेडिट कार्ड म्हणजे काय Credit card information in marathi

क्रेडिट कार्ड म्हणजे काय credit card meaning in marathi :-

  • क्रेडिट कार्ड बँकेकडून मिळणारे एक प्लास्टिकचे कार्ड आहे जे डेबिट कार्ड पेक्षा वेगले आहे.
  • क्रेडिट कार्डच्या मदतीने आपण महिनाभर बँकेच्या पैशांचा वापर करू शकतो व महिन्यानंतर ते पैसे बँकेला परत करावे लागतात.
  • थोडक्यात क्रेडीट कार्ड च्या स्वरूपात बँक आपल्याला महिनाभर आपल्या वापरासाठी पैसे उधार देते व महिना झाल्यानंतर आपल्याला ते पैसे बँकेला जमा करावे लागतात.
  • जर आपण ते पैसे बँकेला दिलेल्या तारखेपर्यंत ( due date ) नाही देऊ शकलो तर त्या रक्कमवर व्याज लागायला सुरू होते.

मला क्रेडिट कार्ड मिळू शकेल ? credit card rules in marathi :-

प्रत्येकाला वाटत असते आपल्याकडे क्रेडिट कार्ड असावे परंतु बँक प्रत्येकाला क्रेडिट कार्ड देत नाही. त्यासाठी काही नियम आहेत.

जेव्हा तुम्ही बँकेमध्ये क्रेडिट कार्ड साठी अर्ज करता, तेव्हा बँक तुमच्या बँकेतील खात्याची पडताळणी करते म्हणजेच बँक खात्यातील वार्षिक उत्पन्न ( Annual income ) त्याच प्रमाणे आपला मिळणारा पगार, आपल्यावर परतफेड न केलेले कर्ज ( Loan ) तर नाही आहे ना ?.या सर्व गोष्टी बँक चेक करते कारण बँकेला खात्री करायचे असते की ज्या ग्राहकाला ( customer ) आपण पैसे उधार देत आहोत त्याची परत करण्याची ग्राहकाची क्षमता आहे ना ?.

क्रेडिट कार्डचा उपयोग credit card uses in marathi :-

आजच्या जगात भरपूर माणसे क्रेडिट कार्डचा वापर पैशांचे व्यवहार करण्यासाठी करत आहेत. क्रेडिट कार्डचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो जसे की पुढील दिलेल्या ठिकाणी :-

१. क्रेडिट कार्ड च्या मदतीने आपण दुकानातले, हॉटेल मधले बिल भरू शकतो.
२. आपल्याकडे क्रेडिट कार्ड असला तर आपण घरूनच मोबाईलचे बिल तसेच विजेचे बिल ( Electricity bill payment ) भरू शकतो.
३. क्रेडिट कार्डच्या मदतीने आपण एटीएम मशीन मधून पैसे देखील काढू शकतो.

तुम्हाला माहित आहे का क्रेडिट कार्डच्या वापरावर मर्यादा असते ?

जेव्हा आपण क्रेडिट कार्डसाठी बँकेत अर्ज करतो तेव्हा बँक आपल्या बँकेतील खात्याच्या पडताळणी नुसार आपल्याला एक मर्यादित रक्कम वाले क्रेडिट कार्ड देते.

म्हणजेच आपण प्रत्येक महिन्यात बँकेने दिलेल्या मर्यादित रकमेपर्यंत क्रेडिट कार्डचा वापर करू शकतो. ही मर्यादित रक्कम प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार बँकेकडून वेगवेगळी दिली जाते.

क्रेडिट कार्डचे फायदे credit card benefits in marathi :-

बँकेकडून मिळणाऱ्या क्रेडिट कार्डचे भरपूर फायदे आहेत.

१. जगभर कुठेही आपण असल्यास अचानक पैशाची गरज पडल्यास क्रेडिट कार्डच्या मदतीने आपल्याला हवी ती गोष्ट आपण घेऊ शकतो.
२. आपल्याला जर बाजारात जायचे असेल तर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सोबत न ठेवता निश्चिंतपणे क्रेडिट कार्डच्या मदतीने बिल देऊ शकतो.

क्रेडिट कार्ड चे तोटे मराठी credit card che tote in marathi :-

या क्रेडिट कार्डचे जसे भरपूर फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत जे माहित करणे देखील महत्त्वाचे आहे.

जर आपण क्रेडिट कार्डच्या मदतीने वापरले गेलेले बँकेचे पैसे बँकेने दिलेल्या तारखेपर्यंत ( due date ) परत नाही करू शकलो तर बँकेकडून त्यावर व्याज ( Interest ) लागायला सुरूवात होते जे खूप असते.

क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावी लागणारी काळजी :-

शक्यतो गरज असेल तरच क्रेडिट कार्डचा वापर करावा नाहीतर आपल्याजवळील रोख रक्कम भरावी.

क्रेडिट कार्डचे बिल बँकेने दिलेल्या अखेर तारखे अगोदर भरावे नाहीतर त्या रकमेवर पैशांचा वापर केलेल्या दिवसापासून व्याज लागायला सुरुवात होते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

Leave a Comment