[मराठी] डेबिट कार्ड म्हणजे काय | Debit card mhanje kay in marathi 2021 | Debit card meaning in marathi

Debit card mhanje kay in marathi मित्रांनो या लेखात आम्ही या विषयावर महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. सध्याच्या कॅशलेस ( Cashless ) च्या जगात डेबिट कार्डला खूप महत्त्व आहे. डेबिट कार्ड मुळे अनेक मोठे-मोठे व्यवहार चुटकीसरशी होतात. अडचणीच्या वेळी बँकेत असलेले आपले पैसे मिळवण्यासाठी आपल्याला बँक उघडण्याची वाट बघावी लागत नाही किंवा रांगेत उभे राहावे लागत नाही. त्यासाठी डेबिट कार्ड अत्यंत सोपी आणि सोयीस्कर सुविधा आहे.

तर या लेखात आम्ही डेबिट कार्ड म्हणजे काय ?, डेबिट कार्डचा वापर कसा करावा?, कार्ड कसे मिळवावे व त्याचे फायदे, तोटे तसेच इतर प्रकारची भरपूर माहिती समाविष्ट केली आहे. ती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल.

Debit card mhanje kay in marathi
debit-card-mhanje-kay-in-marathi

Debit card information in marathi डेबिट कार्ड बद्दल मराठी मध्ये माहिती

डेबिट कार्ड म्हणजे काय ? Debit card mhanje kay in marathi

डेबिट कार्ड प्लास्टिक पासून बनलेले एक कार्ड आहे जे आपल्याला आपण बँकेत खाता खोल्या नंतर आपल्याला हवे असले तर बँकेकडून प्राप्त होते. हे आकारामध्ये ८५.६० mm × 53.98 mm असे असते.

डेबिट कार्ड आपल्या बँकेमधील खोललेल्या खात्याशी जोडलेले असते.

डेबिट कार्ड कसे मिळवावे ? How to get debit card :-

डेबिट कार्ड मिळवण्यासाठी दोन पद्धती आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत :-

१. घर बसल्या इंटरनेटचा वापर करून
२. बँकेला भेट देऊन

१. घर बसल्या इंटरनेटचा वापर करून ( Online ) :-

या पद्धतीमध्ये आपल्याला आपल्या मोबाईलचा किंवा संगणकाचा वापर करून घरूनच बँकेच्या संकेतस्थळावर ( Bank website ) भेट देऊन अर्ज करावा लागतो.

२. बँकेला भेट देऊन ( Offline ) :-

या पद्धतीमध्ये आपल्याला बँकेला भेट देऊन एक अर्ज भरून त्याला आधार कार्डची प्रत जोडून बँकेत जमा करावी लागते.

वरील दिलेल्या कोणत्याही पद्धतीचा वापर करून डेबिट कार्ड साठी अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर आपण अर्ज करताना दिलेल्या पत्त्यावर डेबिट कार्ड पत्राने येते. या पत्रात आपल्या डेबिट कार्ड बरोबर एक गोपनीय अंक ( Pin code ) असतो. हा गोपनीय अंक आपल्याला डेबिट कार्ड वापरताना लागतो.

डेबिट कार्डचा वापर Debit card uses :-

डेबिट कार्डचा वापर अनेक ठिकानी बिल भरण्यासाठी करू शकतो. डेबिट कार्डचा वापर पुढीलप्रमाणे दिलेल्या ठिकाणी केला जातो :-

१. ऑनलाइन शॉपिंग ( Online shopping )
२. ऑनलाइन विजेचे, मोबाईलचे बिल भरण्यासाठी.
३. दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये बिल देण्यासाठी.
४. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी.

डेबिट कार्डच्या मदतीने एटीएम मशीन मधून पैसे कसे काढावे How to use debit card in the ATM machine :-

मित्रांनो डेबिट कार्डचा वापर जसे पैसे देण्यासाठी करू शकतो तसेच आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी देखील करू शकतो. यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागते :-

१. आपल्या नजदीकच्या एटीएम मशीन कडे जावे लागते.
२. तिथे जाऊन आपला डेबिट कार्ड एटीएम मशीन वर दाखविल्याप्रमाणे ए. टी. एम. मशीन वरील एका स्लॉट ( slot ) मध्ये टाकवा लागतो.
३. डेबिट कार्ड एटीएम मशीन मध्ये टाकल्यावर, एटीएम मशीनच्या स्क्रीनवर भाषा निवडण्यासाठी पर्याय ( Choose language ) येथे जसे की हिंदी, मराठी, इंग्रजी यातून आपल्यास हवी असणारी भाषा निवडावी.
४. भाषा निवडून झाल्यानंतर तेथे आपल्याला आपला डेबिट कार्डचा बँकेकडून मिळालेला गोपनीय अंक टाकायचा असतो.
५. गोपनीय अंक टाकल्यानंतर, स्क्रीनवर विविध पर्याय येतील त्यावेळी तुम्हाला तेथे “तुम्हाला पैसे काढणे” ( Withdraw money ) असा एक पर्याय असेल तर त्यावर दाबावे लागेल.
६. नंतर तुम्हाला जितके पैसे काढायचे आहेत ती रक्कम तेथे नमूद करावी लागेल व खाली दिलेल्या “ठीक आहे” पर्याय वर दाबावे लागेल.

हे केल्यानंतर एटीएम मशीन मधून पैसे बाहेर येतील. यानंतर आपल्या डेबिट कार्ड एटीएम मशीन मधून बाहेर काडावे लागते.

ही प्रक्रिया करताना मित्रांनो तुम्हाला काहीही शंका असल्यास एटीएम मशीन आसपास असणाऱ्या बँकेचा कर्मचाऱ्याला विचारू शकतात ते आपणास मदत करतील.

डेबिट कार्डचे फायदे तोटे Debit card advantages disadvantages

१. डेबिट कार्ड फायदे मराठी Debit card che fayde :-

डेबिट कार्डचा वापर आजच्या जगात मोठ्या प्रमाणात होत आहे. हे एक उपयोगी कार्ड आहे. चला तर जाणून घेऊया या कार्डचे फायदे :-

१. डेबिट कार्ड च्या मदतीने आपण जगात कुठेही असल्यास खात्यातून पैसे काढू शकतो.
२. आपल्या खिशात डेबिट कार्ड असल्यास खिशामध्ये भरपूर पैसे न ठेवता चोरीच्या भीतीपासून बिनधास्त राहू शकतो.
३. समजा आपण बाहेर आहोत आणि आपण पैसे घरीच विसरला आहात आणि आपल्या कडे जर डेबिट कार्ड असल्यास आपण बाहेर असतानाही हवी ती वस्तू विकत घेऊ शकतो आणि डेबिट कार्डच्या मदतीने बिल देऊ शकतो.
४. डेबिट कार्डच्या मदतीने बिल ( Payment ) भरणे अगदी जलद व सोपे असते.
५. आपण डेबिट कार्डच्या मदतीने वीज बिल भरणा लांबलचक रांगेत उभे न राहता घरीच बसून भरू शकतो.

अशाप्रकारे डेबिट कार्डचे खूप फायदे आहेत.

२. डेबिट कार्ड चे तोटे Debit card che tote :-

डेबिट कार्ड वापरण्याचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे डेबिट कार्ड चे तोटे देखील आहेत. हे तोटे आपण डेबिट कार्ड वापरण्या अगोदर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

१. जर आपले डेबिट कार्ड चोरीला गेले व चोरांना डेबिट कार्डचे गोपनीय अंक समजल्यास ते आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात.
२. एटीएम मशीनमधून पैसे काढण्या अगोदर खात्री करा की एटीएम मशीन हे खात्रीतील बँकेचे आहे नाहीतर त्या एटीएम मशीन मधून आपल्या डेबिट कार्डची माहिती चोरी होण्याची शक्यता असते.
३. आपण डेबिट कार्डचा वापर केल्यास आपल्याला बँकेकडून अनेक मोबाइल संदेश ( Messages ) येत असतात जसे की किती पैसे काढले गेले आहेत, किती पैसे शिल्लक आहेत, किती पैसे जमा झाले. तर या संदेशांचे वार्षिक शुल्क, बँक आपल्या खात्यातून वजा करत असते.
४. प्रत्येक दिवशी डेबिट कार्ड चा वापर करून पैसे काढण्याची किंवा डेबिट कार्ड वापरण्याची मर्यादा असते जर तुम्ही त्याहून जास्त डेबिट कार्ड चा वापर केल्यास काही बँकांकडून यासाठीचे अधिक शुल्क खात्यातून वजा केले जाते.

डेबिट कार्ड वापरताना द्यावी लागणारी काळजी Precautions to be taken while using debit card :-

आपण जर डेबिट कार्ड वापरत असाल किंवा वापरणार असाल तर हे नक्कीच वाचा की डेबिट कार्ड वापरताना कशी काळजी घ्यावी.

१. एटीएम मशीन मधून पैसे काढताना खात्री करा की बाजूला उभे राहून कोणी आपल्या डेबिट कार्डची माहिती बघण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना.
२. आपल्याकडे डेबिट कार्डचा गोपनीय अंक कोणाला सांगू नका.
३. वारंवार फसवणूक करणारे फोन कॉल्स ( fraud calls ) येत असतात जे “आम्ही बँकेकडून बोलत आहोत” असे म्हणून आपल्या डेबिट कार्ड विषयी माहिती मागत असतात. अशा लोकांना आपल्या डेबिट कार्ड विषयी माहिती देऊ नका कारण बँक कधीही आपल्याला डेबिट कार्ड विषयी माहिती विचारण्यासाठी फोन कॉल करत नाही.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

Leave a Comment