श्यामची आई पुस्तक सारांश लेखन

Shyamchi aai book review in Marathi देवालाही मागून न मिळणारे दान म्हणजे आई, देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे आई, बालपणातील विश्व म्हणजे आई. आई म्हणजे सर्वस्व असे सांगणारी व तिच्या मातृत्वाचा गौरव करणारी अनेक काव्य महाकाव्य लिहिली गेली.

यातीलच निस्वार्थ व निर्मळ भावनेने प्रेम करणारी व तितक्याच कठोरपणे शिस्त लावणाऱ्या आईची हृदय स्पर्शी कथा म्हणजे साने गुरुजींनी साकारलेले श्यामची आई हे पुस्तक (Shyamchi aai book summary in Marathi). या लेखात आम्ही साने गुरुजी यांच्या श्यामची आई या पुस्तकाचा सारांश तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Shyamchi aai book review in Marathi

श्यामची आई पुस्तक सारांश लेखन Shyamchi aai book review in Marathi

थोर क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी लिखित श्यामची आई ( shyamchi aai book writer in marathi ) ही कादंबरी त्यांनी नाशिक येथील कारागृहात असताना अवघ्या पाच दिवसात लिहून काढली. या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यानंतर हे पुस्तक वाचण्याचा मोह आवरता येत नाही.

यातील प्रत्येक रात्र वाचताना साने गुरुजींच्या अफाट शब्दसामर्थ्याचे व वाचकांना व श्रोत्यांना खिळवून ठेवण्याच्या अगम्य लेखनशैलीचे दर्शन घडते.

यातील प्रत्येक रात्रीच्या कथेत आईचे विविध स्वभाव वैशिष्ट्य उलगडतात. तसेच मुलांची जडणघडण करताना तिच्या प्रेमळ पण तितक्याच कणखर, कठोर व परोपकारी स्वभावाचे दर्शन घडून येते. एखाद्या कसलेल्या कुंभाराप्रमाणे ती आपल्या मुलांना नैतिकदृष्ट्या घडवण्याचा प्रयत्न करते.

यातल्या प्रत्येक गोष्टीमधून गुरुजींनी मोठा व मोलाचा उपदेश देण्याचा व तो तितक्याच सोप्या भाषेत पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

येथे वाचा: दिवाळी सण साजरे करण्यामागचं कारण आणि दिवाळी सणाचे महत्व

हे पुस्तक वाचताना कोकणातील सुसंस्कृत व साध्या कुटुंबाचे व तेथील रम्य संस्कृतीचे वर्णन डोळ्यासमोर उभे राहते.

हे पुस्तक वाचताना आपण त्यामध्ये आपली आई शोधण्याचा प्रयत्न करतो व यातील श्यामची आई ही आपलीशी कधी होऊन जाते हे आपल्यालाच कळत नाही. यातील कथा या जरी लहानग्या श्यामभोवती फिरत असल्या तरीही यातील प्रत्येक गोष्टीत आई हीच मुख्य नायिका आहे.

सावित्री व्रताच्या गोष्टीतील आईचे शब्द मन हेलावून टाकतात. “देवाच्या कामाला लाजु नको, पाप करताना लाज धर”, हे आईचे शब्द प्रत्येकाला निशब्द करतात. सध्याच्या युगात या शब्दांचे मोल खूप मोठे आहे.

अक्काचे लग्न या कथेत आईने परोपकाराचा अर्थ समजावून दिला. स्वतः जवळचे दुसऱ्याला द्यावे व त्याचे अश्रू थांबवून त्याला हसवावे या आईच्या उदात्त विचारांचे दर्शन या गोष्टीत घडते.

मुकी फुले या गोष्टीतून तिची फुलांविषयीची आत्मीयता व त्यांच्याकडे सुद्धा मुलांच्या दृष्टीने पाहण्याची वृत्ती दिसून येते.

श्यामला पोहता यावं यासाठी चाललेल्या तिच्या धडपडीमध्ये आपल्या मुलांना कोणीही नाव ठेवू नयेत व त्यांनी धीट व्हावे ही तिची साधी अपेक्षा दिसून येते.

“श्याम पायांना माती लागू नये म्हणून जितके जपतोस तितके मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो”, हे तिचे शब्द तिच्यातल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतात.

यातल्या गोष्टी या निर्मळ व निस्वार्थ मातृप्रेमाने ओथंबून वाहताहेत. लहानांमध्ये संस्कारांची मुळे रुजवणारी श्यामची आई मोठ्यांनाही जगण्यातला गर्भितार्थ सोप्या शब्दात पटवून देते.

यातल्या गोष्टी वाचताना त्यातील श्यामसोबत आपण कधी एकरुप होऊन जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. यातून आईने दिलेली शिकवण व तत्वज्ञान हे माणूस कसा असावा याचे स्पष्टीकरण देऊन जाते चांगल्या व वाईट गोष्टींची पारख करण्याची दृष्टी प्रदान करते तसेच संस्कृती व विकृती यामध्ये सावधपणाची काल्पनिक रेषा बनून राहते.

हे पुस्तक वाचल्यानंतर (Shyamchi aai book conclusion) प्रत्येकाच्या मनातील आई विषयीचा आदर नक्की वाढेल यात शंका नाही. यातली प्रत्येक गोष्ट पुन्हा-पुन्हा जरी वाचली तरी तिच्यातील असलेला भावनिक ओलावा व कुतूहल तसाच राहतो.

श्रावणात ओथंबून वाहणाऱ्या झऱ्यासारख्या या मातृत्वाच्या निस्वार्थ व निर्मळ प्रवाहात डुंबून जायला मला पुन्हा पुन्हा आवडतं. मला आशा आहे की हे पुस्तक तुमच्याही मनात नक्की घर करून राहील व तुमच्या आईशी असलेली तुमची नाळ अधिक घट्ट करेल.

हे सुद्धा अवश्य वाचा:

Share on:

1 thought on “श्यामची आई पुस्तक सारांश लेखन”

Leave a Comment