SBI Home loan मराठी मध्ये माहिती

SBI home loan information in Marathi आपण SBI गृहकर्जाबद्दल माहिती शोधत आहात का. तर आम्ही या लेखात एसबीआय गृह कर्जासंबंधी सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे व आम्हाला आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

SBI home loan information in Marathi

SBI गृहकर्जाची मराठीत माहिती SBI home loan information in Marathi

SBI गृह कर्ज म्हणजे काय (What is SBI home loan)?

SBI गृह कर्ज हे भारतातील गृहकर्जासाठी वापरली जाणारी सर्वात मोठी योजना आहे. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी या योजनेचा वापर करून आपल्या घराचे स्वप्न साकार केले आहे.

SBI बँक ग्राहकाला अत्यल्प व्याजदरात नवीन घरासाठी किंवा घर बांधण्यासाठी किंवा नवीन प्लॉट खरेदी करून बांधकाम करण्यासाठी गृहकर्ज उपलब्ध करून देते.

SBI गृहकर्जाची खास वैशिष्ट्ये (SBI home loan features)

SBI द्वारा दिल्या जाणाऱ्या गृहकर्जाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:-

१. प्रत्येक ग्राहकासाठी अनुरूप अशा विविध योजना
२. कमी व्याजदर
३. कमी प्रक्रिया शुल्क (processing fee)
४. कर्ज लवकर फेडण्यासाठी आगाऊ भरलेल्या रकमेवर (prepayment) कोणताही दंड आकारला जात नाही.
५. कमी होत जाणाऱ्या कर्जाच्या रकमेनुसार व्याज आकारला जातो.
६. परतफेड करण्यासाठी तीस वर्षापर्यंत ची मुदत.
७. ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध
८. स्त्री अर्जदारांसाठी व्याजदरात विशेष सवलत.

SBI गृहकर्ज कोणत्या कारणासाठी मिळते?

SBI द्वारा गृहकर्ज हे पुढील कारणांसाठी दिले जाते:-

१. नवीन तयार घर खरेदीसाठी
२. नवीन घर बांधण्यासाठी
३. घराच्या नूतनीकरणासाठी
४. घर दुरुस्तीसाठी
५. घर वाढवण्यासाठी
६. नवीन प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधण्यासाठी

SBI गृहकर्जासाठी अर्जदारांची पात्रता ( SBI home loan eligibility )

एसबीआय गृह कर्ज मिळवण्यासाठी लागणारी पात्रता ही पुढील बाबींवर अवलंबून असते:-

१. अर्जदार हा भारतीय रहिवासी किंवा NRI असावा.
२. अर्जदाराचे कमीत कमी वय १८ वर्षे इतके असावे
३. कर्जदाराचे जास्तीत जास्त वय ७० वर्षे असावे
४. कर्ज परतफेडीची अधिकतम मुदत : तीस वर्षे

SBI गृहकर्जाच्या (SBI home loan) विविध योजना

SBI द्वारा ग्राहकांना त्यांच्या सवलतीनुसार दिल्या जाणाऱ्या योजना पुढील प्रमाणे आहेत:-

१. SBI रेगुलर होम लोन:

भारतीय रहिवासी असलेली नोकरी करणारी किंवा स्वयंरोजगार यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला नवीन घर बांधण्यासाठी किंवा घर दुरुस्तीसाठी हे कर्ज मिळते. यामध्ये महिलांना व्याजदरात ०.०५% इतकी सूट दिली आहे.

वयोमर्यादा: १८-७० वर्ष
प्रक्रिया शुल्क: ०.३५% + service tax (किमान २,००० ते कमाल १०,०००)
कर्ज परतफेड कालावधी : ३० वर्ष
आगाऊ हप्ता भरण्यावर दंड आकारला (prepay penalty) जात नाही.

२. SBI रियल्टी होम लोन:

नवीन प्लॉट खरेदी करून त्यावर बांधकाम करण्यासाठी या योजनेचा वापर केला जातो. तसेच प्लॉट मिळाल्यानंतर पहिल्या पाच वर्षाच्या आत बांधकाम सुरु करणे आवश्यक असते

वयोमर्यादा: १८-७० वर्ष
प्रक्रिया शुल्क: ०.३५% + service tax (किमान २,००० ते कमाल १०,०००)
कर्ज परतफेड कालावधी : ३० वर्ष
आगाऊ हप्ता भरण्यावर दंड आकारला (prepay penalty) जात नाही.

३. SBI हर घर होम लोन (महिलांसाठी):

ही योजना खास करून महिला अर्जदारांसाठी किंवा पहिल्या सहअर्जदार म्हणून असलेल्या महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत महिलांसाठी व्याजदरांमध्ये विशेष सूट दिली गेली आहे.

व्याजदर: ९.४० %
वयोमर्यादा: १८-७० वर्ष
कर्ज परतफेड कालावधी : ३० वर्ष
आगाऊ हप्ता भरण्यावर दंड आकारला (prepay penalty) जात नाही.

४. SBI pre-approved होम लोन:

घर किंवा प्लॉट निवडण्याअगोदरच कर्ज मंजूर करायचे असेल तर या योजनेचा वापर केला जातो. या कर्ज मंजुरीची वैद्यता ही फक्त चार महिन्यापुरती असते. यामध्ये दिले जाणारे प्रक्रिया शुल्क परत केले जात नाही.

वयोमर्यादा: १८-७० वर्ष
प्रक्रिया शुल्क: ०.३५% + service tax (पंचवीस लाखाहून कमी कर्जासाठी)
६५०० रुपये (25 ते 75 लाखासाठी)
१०,००० (२५ लाखाहून अधिक कर्जासाठी)
कर्ज परतफेड कालावधी : ३० वर्ष
आगाऊ हप्ता भरण्यावर दंड आकारला (prepay penalty) जात नाही.

५. SBI flexipay होम लोन:

या योजनेनुसार अर्जदाराला इतर योजनांच्या पात्रतेपेक्षा वीस टक्क्यांपर्यंत जास्त कर्ज मिळवता येते. या योजनेमध्ये स्थगिती कालावधीमध्ये मुख्य हप्ता भरावा लागत नाही तर फक्त व्याज भरावा लागतो.

व्याजदर: ७.४० % पासून सुरु
वयोमर्यादा: २१ते ४५ वर्ष
कर्ज परतफेड कालावधी : ३० वर्ष
आगाऊ हप्ता भरण्यावर दंड आकारला (prepay penalty) जात नाही.
स्थगिती कालावधी: ३६ ते ६० महिने
प्रक्रिया शुल्क: ०.३५% + service tax (किमान २,००० ते कमाल १०,०००)

६. SBI प्रिविलेज लोन:

ही योजना केंद्र शासन तसेच राज्य शासन कर्मचाऱ्यांसाठी (सरकारी कर्मचारी) तयार केली गेली आहे. या योजनेअंतर्गत अर्जदाराला प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.

वयोमर्यादा: १८ ते ७५ वर्ष
कर्ज परतफेड कालावधी : ३० वर्ष
प्रक्रिया शुल्क: आकारले जात नाही
आगाऊ हप्ता भरण्यावर दंड आकारला (prepay penalty) जात नाही.

७. SBI शौर्य होम लोन:

ही योजना भारतीय संरक्षक दलामधील जवानांसाठी तयार केली गेली आहे. या योजनेअंतर्गत अर्जदारास व्याजदरामध्ये विशेष सवलत दिली जाते तसेच प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.

वयोमर्यादा: १८ ते ७५ वर्ष
कर्ज परतफेड कालावधी : ३० वर्ष
प्रक्रिया शुल्क: आकारले जात नाही
आगाऊ हप्ता भरण्यावर दंड आकारला (prepay penalty) जात नाही.

८. SBI एन आर आय (NRI) होम लोन:

ही योजना NRI रहिवाशांना भारतामधील प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योजना तयार केली आहे.

वयोमर्यादा: १८ ते ६० वर्ष
व्याजदर: ६.७५% प्रतिवर्ष पासून पुढे
कर्ज परतफेड कालावधी : ३० वर्ष
प्रक्रिया शुल्क: ०.३५% + service tax (किमान २,००० ते कमाल १०,०००)
आगाऊ हप्ता भरण्यावर दंड आकारला (prepay penalty) जात नाही.

९. SBI फंड ट्रान्सफर होम लोन:

इतर बँकांमधील गृहकर्ज एसबीआय मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी या योजनेचा वापर केला जातो.
तसेच या योजनेमध्ये अर्जदाराला टॉप-अप लोनची सुविधा उपलब्ध आहे.

तसेच अशा अनेक गृहकर्ज योजना SBI ग्राहकांना उपलब्ध करून देते.

कर्जाची परतफेड

कर्जाची परतफेड करण्यासाठी SBI ग्राहकाला जास्तीत जास्त तीस वर्षानी इतका कालावधी देत असून ग्राहकाला मासीक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करावी लागते.

अर्जदार त्याच्या वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत कर्जफेड करू शकतो. कर्ज मंजुरीच्या करारावर दिलेल्या तारखेपासून कर्जाचे हप्ते फेडण्यास सुरुवात होते.

काही योजनांमध्ये स्थगिती कालावधी मध्ये फक्त व्याज भरावा लागतो व स्थगिती कालावधी संपल्यानंतर मुख्य हप्ते सुरू होतात.

SBI गृहकर्ज व्याजदर ( SBI home loan interest rate )

SBI गृहकर्जासाठी ग्राहकांना कमीत कमी व्याजदर आकारते. एसबीआय गृहकर्जासाठी आकारला जाणारा व्याजदर ६.८०% पासून सुरू होतो.

तसेच महिला अर्जदारांना गृहकर्जासाठी व्याजदरांमध्ये ०.५% इतकी सवलत दिली जाते‌ तसेच भारतीय संरक्षण दलातील अधिकाऱ्यांना व जवानांनादेखील यामध्ये विशेष सवलत दिली जाते.

SBI YONO मधून घरकर्जासाठी अर्ज करणाऱ्यांनादेखील व्याजदरामध्ये विशेष सवलत दिली जाते.

SBI मधून किती गृहकर्ज मिळू शकते?

तुम्हाला मिळू शकणार्‍या अधिकतम कर्जाची मर्यादा ही बँक पुढील मुद्द्यांवरून ठरवते.

अर्जदाराचे वय: अर्जदाराचे वय जितके कमी तितका त्याला कर्ज फेडण्यासाठी मिळणारा अवधी अधिक असतो कारण SBI ने कर्ज फेडण्याची मर्यादा ही 70 वर्षे इतकी ठरवली आहे. म्हणूनच अर्जदाराचे वय जितके कमी असेल त्यानुसार कर्जाची अधिकतम मर्यादा जास्त असते.

अर्जदाराचे उत्पन्न: तुमच्या मासिक उत्पन्नावर तुम्ही किती रक्कम मासिक हप्ता म्हणून भरू शकता हे अवलंबून असते. त्यामुळे जितके अर्जदाराचे उत्पन्न जास्त असते त्यानुसार त्याला मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कम ही जास्त असते.

रोजगार पद्धती : अर्जदार नोकरी करीत आहे की स्वयंरोजगारावर अवलंबून आहे यावर त्याला मिळू शकणाऱ्या कर्जाची अधिकतम मर्यादा ठरते.

अर्जदाराच्या मालमत्तेचे मूल्य: अर्जदाराच्या संपत्तीचे मूल्य व त्यासंबंधीची कागदपत्रे यावर त्याला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरते.

किमान CIBIL score: CIBIL score हा तुमच्या मागील आर्थिक उलाढालींवर अवलंबून असतो जितका तुमचा CIBIL score जास्त असेल तितकी तुम्हाला मिळू शकणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढते.

SBI गृह कर्ज ( SBI home loan ) घेण्याची प्रक्रिया

SBI गृहकर्ज साधारणतः पुढील प्रक्रियेने मिळवता येते:-

१. गृहकर्जासाठीचा अर्ज व आवश्यक कागदपत्रे ( SBI home loan documents ) बँक शाखेत जमा करणे:
बँकेने उपलब्ध करून दिलेल्या अर्जामध्ये योग्य ती माहिती भरून बँकेला आवश्यक असणारी वैद्य कागदपत्रे बँकेच्या शाखेत जमा करणे आवश्यक असते.
आवश्यक असणारी कागदपत्रे:

  • उत्पन्नाचा पुरावा
  • ओळखपत्र
  • वयाचा पुरावा
  • पत्यासंदर्भातील पुरावा
  • रोजगारसंदर्भातील पुरावा
  • शैक्षणिक पुरावा
  • बँक स्टेटमेंट
  • संपत्ती संदर्भातील तपशील

२. प्रक्रिया शुल्क भरणे: गृहकर्जाची अर्ज व कागदपत्रे जमा केल्यानंतर प्रक्रिया शुल्क बँकेत जमा करणे गरजेचे असते.
हे प्रक्रिया शुल्क तुमची कर्जाची रक्कम तसेच तुम्ही कोणती योजना स्वीकारता यावर अवलंबून असते.

३. कागदपत्रांचे मूल्यमापन व पात्रतेची पडताळणी: यानंतर जमा केलेल्या अर्ज व कागदपत्रांची तपासणी केली जाते. काही वेळा अर्जदारासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अर्जदारास शाखेत बोलावले जाते. तसेच अर्जात नमूद केलेली माहिती पडताळून पाहिली जाते.

४. अर्ज मंजुरी प्रक्रिया व ऑफर लेटर: या प्रक्रियेमध्ये अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीची गृहकर्जाची पात्रता तसेच कर्जाची कमाल रक्कम ठरवली जाते.

यानंतर बँकेने ठरवलेल्या अधिकतम कर्जाची रक्कम, व्याजदर, परतफेडीचा कालावधी, नियम व अटी अशा गोष्टी नमूद केलेले ऑफर लेटर तयार केले जाते.

ऑफर लेटर जर अर्जदाराने मान्य केले तर त्यावर त्याची सही घेऊन त्याची एक प्रत बँकेकडे ठेवली जाते.

५. घर /प्लॉट /फ्लॅट कागदपत्रांची कायदेशीर तपासणी: यानंतर अर्जदाराला हव्या असलेल्या घराची किंवा प्लॉटच्या कागदपत्रांची तपासणी करून अर्जदाराला त्याची मूळ प्रत बँकेत जमा करावी लागते.

६. तांत्रिक तपासणी व साईट एस्टिमेशन: यानंतर बँकेचा कर्मचारी किंवा बँकेशी संलग्न असलेल्या बांधकाम संस्थेतील अभियंत्याकडून घराची किंवा साईटची तपासणी करून त्याचे मूल्यांकन केले जाते.

७. अंतिम करार: यानंतर बँक करारपत्र तयार करून त्यावर अर्जदाराची सही घेतली जाते. त्यानंतर अर्जदाराला संपत्तीची मूळ कागदपत्रे बँक शाखेत जमा करावी लागतात व त्यानंतरच अर्जदारास गृहकर्जाचा लाभ घेता येतो.

वरील दिलेल्या लेखाचा उद्देश गृह कर्जाबद्दल माहिती प्रदान करणे इतकाच आहे व कोणताही आर्थिक सल्ला देणे हा या मागचा उद्देश नाही.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment