पॅन कार्ड काढण्यासाठी संपूर्ण माहिती

मित्रहो आपण या लेखात पॅन कार्ड काढण्यासाठीची संपूर्ण माहिती करून घेणार आहोत, तर चला तर मग जाणून घेऊया.

pan card in marathi

पॅन कार्ड काढण्यासाठी संपूर्ण माहिती | Pan card information in Marathi

पॅन कार्ड म्हणजे काय? Pan card meaning

पॅन कार्ड हे भारतातील महत्त्वाचे कागदपत्र आहे तसेच याचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जातो. बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी किंवा इतर आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो.

या लेखात आम्ही पॅन कार्ड साठी आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच पॅन कार्डसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसे करावे यासंदर्भात माहिती दिली आहे.


पॅनकार्ड काढण्यासाठी वयोमर्यादा:

१) पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे गरजेचे असते.
२) व्यक्तीचे वय १८ पेक्षा कमी असेल तर त्याचे पालक अर्जदार म्हणून त्या व्यक्तीच्या पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात


पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे Pan card documents required:

ऑनलाईन पद्धतीने पॅनकार्ड काढण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरसोबत जोडलेले असणे गरजेचे असते.

ऑफलाईन पद्धतीने पॅनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा तसेच पासपोर्ट साईज फोटोची आवश्यकता असते.

यामध्ये ओळखीचा, पत्त्याचा किंवा जन्मतारखेचा पुरावा दाखवण्यासाठी ज्या कागदपत्रांचा वापर करता येईल ते खाली नमूद केले आहेत.

अ) ओळखीचा पुरावा:

पुढीलपैकी कोणतीही कागदपत्रे तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी वापरू शकता.

१) आधार कार्ड (छायांकित प्रत)

२) मतदार ओळखपत्र (छायांकित प्रत)

३) शस्त्र परवाना (छायांकित प्रत)

४) पारपत्र (छायांकित प्रत)

५) वाहन चालक परवाना (छायांकित प्रत)

६) पेन्शनर्स कार्ड – अर्जदाराच्या फोटोसहीत ‌(छायांकित प्रत)

७) अर्जदाराचे रेशन कार्ड – अर्जदाराच्या फोटोसहीत (छायांकित प्रत)

८) विधानसभा सदस्य/ संसद सदस्य नगरसेवक यांची स्वाक्षरी असणारे ओळख प्रमाणपत्र (मूळ प्रत)

९) बँकेकडून मिळालेल्या प्रमाणपत्राची मूळ प्रत (या प्रमाणपत्रावर असलेला व पॅनकार्ड फॉर्म वर असलेला फोटो एकच असावा)

१०) केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना कार्ड/ ECHS कार्ड (छायांकित प्रत)

११) राजपत्रित अधिकार्‍याने सही केलेले ओळख प्रमाणपत्र (मूळ प्रत)

१२) राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून मिळालेले ओळखपत्र – अर्जदाराच्या फोटोसहीत (छायांकित प्रत)

ब) पत्त्याचा पुरावा:

पुढीलपैकी कोणतीही कागदपत्रे तुम्ही पत्याचा पुरावा म्हणून पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी वापरू शकता.

१) आधार कार्ड (छायांकित प्रत)

२) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून मिळालेले तीन वर्षांपेक्षा जुने निवासी वाटप पत्र (छायांकित प्रत)

३) वाहन चालक परवाना (छायांकित प्रत)

४) क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट: तीन महिन्यापेक्षा जुना नसावा (छायांकित प्रत)

५) सरकारकडून मिळालेले अधिवास पत्र (छायांकित प्रत)

६) लँडलाईन, टेलिफोन बिल किंवा ब्रोडबॅन्ड बिल- तीन महिन्यापेक्षा जुना नसावा (छायांकित प्रत)

७) राजपत्रित अधिकार्‍याने सही केलेले पत्त्याचे प्रमाणपत्र (मूळ प्रत)

८) विधानसभा सदस्य/ संसद सदस्य नगरसेवक यांची स्वाक्षरी असणारे पत्त्याचे प्रमाणपत्र (मूळ प्रत)

९) गॅस जोडणी कार्ड/ पाईप गॅसचा मागील तीन महिन्यातील कोणतेही एक देयक (छायांकित प्रत)

१०) डिपॉझिटरी अकाउंट स्टेटमेंट: तीन महिन्यापेक्षा जुना नसावा (छायांकित प्रत)

११) पारपत्र (छायांकित प्रत)

१२) एम्प्लॉयर प्रमाणपत्र (मुळप्रत)

१३) मालमत्ता कर असेसमेंट ऑर्डर (छायांकित प्रत)

१४) पत्नीचे / पतीचे पारपत्र (छायांकित प्रत)

१५) पत्ता नमूद केलेले पोस्ट ऑफिस पासबुक (छायांकित प्रत)

१६) मालमत्ता नोंदणी कागदपत्र

१७) मतदार ओळखपत्र (छायांकित प्रत)

१८) पाणी देयक- तीन महिन्यापेक्षा जास्त जुने नसावे. (छायांकित प्रत)

क) जन्मतारखेचा दाखला:

पुढीलपैकी कोणतीही कागदपत्रे तुम्ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी वापरू शकता.

१) आधार कार्ड (छायांकित प्रत)

२) पेन्शन पेमेंट ऑर्डर (छायांकित प्रत)

३) मतदार ओळखपत्र (छायांकित प्रत)

४) पारपत्र (छायांकित प्रत)

५) विवाह निबंधकाकडून मिळालेले लग्नाचे प्रमाणपत्र (छायांकित प्रत)

६) दहावी-बारावीचे प्रमाणपत्र/गुणपत्रक (छायांकित प्रत)

७) जन्मतारखेसाठी दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केलेले शपथ पत्र

८) अधिकृत कार्यालयाकडून मिळालेला जन्मदाखला (छायांकित प्रत)

९) केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना कार्ड/ ECHS कार्ड (छायांकित प्रत)

१०) सरकारकडून मिळालेला अधिवासाचा दाखला

११) वाहन चालक परवाना (छायांकित प्रत)

१२) राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून मिळालेले ओळखपत्र (छायांकित प्रत)


पॅन कार्ड साठी ऑफलाईन अर्ज कसे करावे?

ऑफलाइन पद्धतीने पॅनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो:-

१) पॅन कार्ड साठी लागणारे फॉर्म-४९A हा अर्ज मिळवा. हा अर्ज तुम्हाला NSDL च्या अधिकृत संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून प्रिंट करून घ्या किंवा जवळील संगणक केंद्रावरून मिळवा.

२) हा अर्ज व्यवस्थितरित्या भरा. मग आवश्यक असणारी कागदपत्रे व फोटो या अर्जासोबत जोडा.

३) यानंतर हा अर्ज व त्यासाठी लागणारे प्रक्रिया शुल्क DD स्वरूपात एकत्रितरीत्या NSDL च्या ऑफिस च्या पत्त्यावर पाठवा. (प्रक्रिया शुल्क किती भरावे आणि NSDL च्या ऑफिसचा पत्ता हे फॉर्मवर नमूद केलेले असते)

४) हा अर्ज पाठवल्यानंतर पंधरा कार्यालयीन दिवसामध्ये पॅन कार्ड तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोस्टामार्फत येईल.


पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पुढील प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल.

१) पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी NSDLच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. येथे आल्यानंतर Apply online या पर्यायावर क्लिक करा.

Source: NSDL

२) आता तुमच्या समोर आलेल्या विंडोमध्ये तुमच्या डिटेल्स विचारल्या असतील त्या टाका.

नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करत असल्यामुले Application type या पर्यायामध्ये New pan- Indian citizen (Form 49A) हा पर्याय निवडा.

पॅन कार्ड वैयक्तिक असल्यामुले Category या पर्यायामध्ये Individual हा पर्याय निवडा.

त्यानंतर खाली दिलेल्या रखान्यामध्ये तुमची माहिती ( पूर्ण नाव, जन्म तारीख, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर) भरा व नंतर Captcha कोड जसाचा तास टाकून खालील निळ्या रंगात असणाऱ्या Submit पर्यायावर क्लिक करा.

३) यानंतर येणार्‍या विंडोमध्ये तुम्हाला तुमचा टोकन नंबर दिला जाईल हा टोकन नंबर लिहून ठेवा. त्यानंतर “Continue with PAN application form” या पर्यायावर क्लिक करा

नोंद:- अँप्लिकेशन भरताना काहीही शंका असल्यास स्क्रीनवरील उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या Save draft या पर्यायावर क्लिक करून फॉर्म जेवढा भरला आहे तेवढा save करू शकता. तुम्ही आम्हाला खालील Comment box मध्ये शंका विचारू शकता. व नन्तर शंकेचे निरसन झाल्यांनतर येथे क्लिक करून, Registered User या पर्यायावर क्लिक करून तेथे आपली माहिती आणि फॉर्म भरताना वेळी मिळालेला टोकन नंबर वापरून फॉर्म जेथे थांबला आहे तेथून पुन्हा भरण्यास सुरु करू शकता.

४) यानंतर येणारा विंडोमध्ये सर्वात पहिला पर्याय म्हणजे “तुम्ही पॅन कार्ड संदर्भातील कागदपत्रे कशी जमा करणार आहात “ व यासाठी तुम्हाला पुढील प्रमाणे तीन पर्याय दिलेले असतात.

अ) Submit digitally through e-kyc & e-sign (Paperless): यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असते म्हणजे जेव्हा आधार कार्ड व्हेरिफिकेशनसाठी OTP पाठवला जाईल तेव्हा तो तुमच्या आधार कार्डसोबत जोडलेल्या मोबाईल नंबर वर येतो.

आ) Submit scanned image through e-sign: या पर्यायांमध्ये तुम्हाला गरजेची असणारी कागदपत्र व फोटो स्कॅन करून अपलोड करावी लागतात.

इ) Forward application documents physically: यामध्ये तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म व कागदपत्रे पोस्टाने NSDL च्या पत्त्यावर पाठवावी लागतात.

तर मित्रानो जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत जोडलेल असेल तर तुम्ही पहिल्या पर्यायाला निवडू शकता जे अगदी सोप्पे व जलद पडेल. जर तुमचं मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत जोडलेले नसेल तर तुम्ही आपल्या नजदिकच्या ईसेवा केंद्राला भेट देऊन जोडू शकता.

५) तर आता खाली या, येथे तुम्हाला Whether Physical PAN card is required? (तुम्हाला पॅन कार्ड प्लास्टिक कार्ड स्वरूपामध्ये हवं आहे का?) असे विचारले असेल तर, तेथे Yes हे पर्याय निवडा.

आता तुम्हाला तुमचा आधार कार्डचे शेवटचे चार नंबर विचारले असेल, ते तिथे भरा. आता तुम्हाला त्याखालीच “i hereby agree that my photograph as available in Aadhaar shall be printed on the PAN card (तुम्हाला तुमच्या आधार कार्डसाठी असणारे फोटो पॅन कार्डसाठी हवं आहे )` येथे Yes या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुम्ही अगोदर भरलेली स्वतःबद्दल माहिती दाखवली असेल, तेथे काही भरलेले नसल्यास भरा.

आता तुम्हाला ”Have you ever been known by any other name (तुम्हाला दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते का? )” असे विचारले असेल, तेथे असेल तर Yes वर क्लिक करून नाव टाका नसेल तर No पर्यायाला निवडा.

आता तुम्हाला तुमच्या Parents details (पालकांबद्दल माहिती) विचारली असेल, तेथे तुमच्या आई वडिलांची माहिती भरा.

अशाप्रकारे माहिती भरून झाल्यांनतर खालील Next या पर्यायावर क्लिक करा.

६) आता तुमच्या समोर नवीन Page येईल, येथे तुम्हाला Source of Income (उत्पन्न), Address for communication (पॅन कार्ड वितरणासाठी पत्ता), Residence address (घरचा पत्ता), Telephone number & Email address हि सर्व माहिती भरा. जर तुम्हाला PAN card घरी येण्यास हवा असेल तर Address for communication येथे Residence address असे निवडा आणि खाली Residence address बद्दल विचारलेली माहिती भरा.

जर तुम्हाला PAN card ऑफिसला येण्यास हवा असेल तर Address for communication येथे Office address असे निवडा आणि Office address येथे पत्ता टाका.

जर तुम्ही Residence address म्हणजेच घरचा पत्ता टाकणार असाल तर Representative Assessee हे पर्याय आहे तसेच ठेवा व जर Office address टाकणार असाल तर ती माहिती भरा.

आता खालील निळ्या रंगात असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.

७) आता तुम्हाला समोर तुमच्या जवळपासचे Income tax चे ऑफिस निवडण्यासाठी काही माहिती विचारली जाईल (Area code, AO type, Range code, AO no). तर मित्रानो हि माहिती आपल्याला माहित नसल्यास खाली चार पर्याय असतील त्यातील Indian citizens असे पर्याय निवडा.

Indian citizens असे पर्याय निवडल्यानन्तर खाली तुम्हाला State (राज्य) आणि City (शहर) विचारले असेल तिथे ती माहिती निवडा. हे निवडल्यानन्तर तुमच्या समोर तुमच्या नजदिकचे Income tax ऑफिसचे नाव दिसेल, त्यावर क्लिक करा.

अशाप्रकारे समोर आलेल्या Income tax office च्या नावावर क्लिक केल्यावर वरील विचारलेले सर्व माहिती (Area code, AO type, Range code, AO no) आपोआप भरली जाईल. नन्तर खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.

८] आता तुम्हाला Document डिटेल्स विचारल्या जातील, येथे तुम्ही आधार कार्ड वापरले असल्यामुळे तुम्हाला कोणतेही इतर कागदपत्रे देण्याची गरज लागत नाही. फक्त खाली तुम्हाला Declaration मध्ये तुमच्या नावाच्या खाली Himself/Herself असे पर्याय निवडायला लागेल व नन्तर त्याखाली तुमच्या शहराचे नाव टाकावे लागेल.

आता खालील Next या पर्यायावर क्लिक करा.

९) आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे सुरवातीचे ८ अंक टाकायला सांगितले असेल, ते टाका व खाली सर्व माहिती दाखविली असेल जी तुम्ही भरली आहेत. तर ती सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करा व नन्तर खाली असणाऱ्या Proceed या पर्यायावर क्लिक करा.

१०) आता तुम्हाला Payment पद्धत विचारली जाईल, त्यातील Online payment through Bill desk हे पर्याय निवडा, खाली या व “I agree to the terms of service” या पर्यायावर क्लिक करा व नन्तर Proceed to payment या पर्यायावर क्लिक करा.

११) आता तुम्हाला पॅन कार्ड साठी किती रक्कम द्यावी लागेल ते दाखवले जाईल जी १०० रुपयांच्या आसपास असते. तर खाली असणाऱ्या Pay Continue या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या समोर payment करण्यासाठी विविध पर्याय येतील, त्यातील तुम्हाला ज्या पर्यायाने Payment जमेल त्या पर्यायाने Payment करा.

Payment केल्यांनतर तुमच्या समोर Payment Receipt येईल, तेथे खाली असणाऱ्या Continue या पर्यायावर क्लिक करा.

१२) आता तुम्हाला आधार कार्डच्या मदतीने प्रमाणीकरण करण्यासाठी Aadhar authentication page समोर येईल, तेथे एक पर्याय (I use my Aadhaar card details…) निवडण्यासाठी असेल त्यावर क्लिक करा व खालील Authenticate पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला Continue with e-KYC असा एक पर्याय समोर दिसेल, त्यावर क्लिक करा.

१३) आता तुमच्या समोर, तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाकण्यासाठी पर्याय आला असेल, तो टाका व खालील Submit पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर Continue with e-KYC असा एक पर्याय येईल त्यावर क्लिक करा.

१४) आता तुमच्या समोर NSDL Electronic signature service असे असलेले एक page येईल, तेथे “I hereby authorize NSDL” असे एक पर्याय असेल त्यासमोर क्लिक करा व नन्तर खाली आपला आधार कार्ड क्रमांक टाकून Send OTP या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वर OTP पाठवला जाईल, तो समोर आलेल्या पर्यायामध्ये टाका व Verify OTP या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे पॅन कार्ड साठी ऑनलाईन अँप्लिकेशन पूर्ण झाले आहे, तुमच्या समोर Acknowledgement दाखवले जाईल, तुम्ही स्क्रीन बंद केलीत तरी चालेल.

हा अर्ज भरल्यानंतर पंधरा कार्यालयीन दिवसामध्ये पॅन कार्ड तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोस्टामार्फत येईल.


अशाप्रकारे आम्ही पॅन कार्डसाठी लागणारे कागदपत्र व पॅन कार्ड कसे काढावे या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला comment box मध्ये नक्की सांगा.

हे देखील वाचा:

Share on:

Leave a Comment