बँक ऑफ इंडिया गृह कर्जाची मराठीत माहिती | Bank of India home loan information in Marathi

Bank of India home loan information in Marathi आपण बँक ऑफ इंडिया गृहकर्ज संदर्भात माहिती शोधत आहात का. तर या लेखात आम्ही Bank of India मधून मिळणाऱ्या गृहकर्जासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Bank of India गृहकर्जासाठी अर्जदाराची पात्रता व्याजदर, प्रक्रिया शुल्क, विविध योजना तसेच गृहकर्जाची सर्वसाधारण प्रक्रिया याबद्दलची माहिती या लेखात समाविष्ट केली आहे.

Bank of India home loan information in Marathi
bank-of-india-home-loan-information-in-marathi

बँक ऑफ इंडिया गृह कर्जाची मराठीत माहिती (BOI) | Bank of India home loan information in Marathi

Bank of India ने ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदरासह गृहकर्जाच्या विविध योजना उपलब्ध करुन दिल्या आहेत. Bank of India कमीत कमी प्रतिवर्ष ६.८५% इतक्या व्याजदराने ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करून देते. तसेच काही योजनांमध्ये बँक ऑफ इंडिया गृहकर्जाची कमाल मर्यादा ५ कोटी इतकी आहे.

Bank of India गृहकर्जाची वैशिष्ट्ये

Bank of India द्वारा दिल्या जाणाऱ्या गृहकर्जाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१) घर खरेदी /बांधकाम /नूतनीकरण इत्यादीसाठी पाचशे लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध तसेच तीस वर्षांइतका परतफेड कालावधी
२) योग्य व्याज आकार
३) ग्राहकाला त्याच्या परतफेड क्षमतेनुसार विविध कालावधीसाठी विविध रकमेमध्ये मासिक हप्ते भरण्याचा पर्याय उपलब्ध
४) Floating व्याजदर पर्यायामध्ये आगाऊ हप्ता भरण्यावर दंड आकारला जात नाही
५) परतफेड लवकर पूर्ण करण्यासाठी आगाऊ हप्ता भरण्याला परवानगी
६) दैनंदिन शिल्लक कर्ज रकमेवर व्याज आकारणी
७) भारतीय वंशाच्या व्यक्तीला तसेच NRI व्यक्तीला देखील Bank of India गृहकर्जाचा लाभ घेता येतो
८) जलद प्रक्रिया व मंजुरी
९) ग्राहकांसाठी सोपी व सुलभ प्रक्रिया

अर्जदाराची पात्रता Bank of India home loan eligibility

Bank of India गृहकर्जासाठी नोकरी करणारी तसेच स्वयंरोजगार करणारी व्यक्ती अर्ज करू शकते. NRI, PIO व HUF यांनादेखील गृहकर्जासाठी अर्ज करता येतो.

Bank of India गृहकर्ज कशासाठी मिळते?

Bank of India ग्राहकाला पुढील गोष्टींसाठी गृहकर्ज उपलब्ध करून देते.

१) नवीन घर/ फ्लॅट बांधणे किंवा विकत घेणे
२) घराचे किंवा फ्लॅटचे नूतनीकरण/ वाढविणे/ घरदुरुस्ती
३) नवीन जागा खरेदी करून त्यावर बांधकाम करणे
४) इतर बँकांमधील गृह कर्ज Bank of India मध्ये ट्रान्सफर करणे

Bank of India मधून ग्राहकाला कितपत गृहकर्ज मिळू शकते?

१. Bank of India घर किंवा फ्लॅट खरेदी किंवा बांधकामासाठी ३०० लाखापर्यंत गृहकर्ज देते तसेच महत्त्वाच्या मेट्रो शहरांमधील घरांसाठी ५०० लाखांपर्यंत गृहकर्ज ग्राहकास दिले जाते.

२. घराच्या दुरुस्ती, नुतनीकरण तसेच घर वाढविण्यासाठी 50 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.

३. नवीन जागा खरेदी करणासाठी तीनशे लाखांपर्यंत कर्ज

४. नोकरी करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या महिन्याच्या पगाराच्या 72 पट गृहकर्ज उपलब्ध केला जातो.

५. स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या आयकर परताव्यानुसार असलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या सहा पट गृहकर्ज दिला जातो.

प्रक्रिया शुल्क (process fee)

अर्ज करताना भरावे लागणारे प्रक्रिया शुल्क हे पुढील बाबींवर अवलंबून असते.
१. कर्जाची रक्कम
२. CIBIL पर्सनल स्कोर
३. रोजगार पद्धती: नोकरी/ स्वयंरोजगार

BOI गृहकर्जावर किती व्याजदर आकारते? Bank of india home loan interest rate

Bank of India गृहकर्जावर आकारला जाणारा व्याजदर हा पुढील बाबींवर अवलंबून असतो

  • CIBIL पर्सनल स्कोर
  • रोजगार पद्धती: नोकरी/ स्वयंरोजगार
  • महिला अर्जदारांना व्याजदरांमध्ये विशेष सवलत

Bank of India गृहकर्जासाठी किती मार्जिन द्यावे लागते?

मार्जिन म्हणजे आपल्याला घरासाठी हवे असलेल्या कर्जाच्या रकमेची काही टक्के रक्कम ही आपल्याला बँकेत जमा करावी लागते तर उर्वरित रक्कम बँकेकडून दिली जाते.

पहिल्या गृहकर्जासाठी मार्जिन टक्केवारी:

  • २० लाखांपर्यंत कर्जासाठी : १५%
  • २० ते ७० लाखापर्यंत : २०%
  • ७० लाखाहून अधिक कर्जासाठी: २५%

दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गृहकर्जासाठी मार्जिन टक्केवारी:

  • २० लाखांपर्यंत कर्जासाठी : २०%
  • २० ते ७० लाखापर्यंत : २०%
  • ७० लाखाहून अधिक कर्जासाठी: २५%

कर्जाची परतफेड

  • परतफेड करण्यासाठी तीस वर्षांपर्यंतचा कालावधी
  • ३६ महिन्यांपर्यंत स्थगिती कालावधी
  • नोकरी करणार्‍या व्यक्तीने सेवा निवृत्त होण्याआधी व इतर व्यक्तींनी वयाच्या सत्तरीपर्यंत कर्जाची परतफेड करावी
  • निवृत्तीनंतर खात्रीशीर उत्पन्नाचे साधन उपलब्ध असल्यास ती व्यक्ती ७० व्या वर्षापर्यंत कर्ज फेडू शकते.

Bank of India गृहकर्ज विविध योजना

Bank of India द्वारा ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या गृहकर्ज योजना पुढील प्रमाणे आहेत.

१. Bank of India स्‍टार होम लोन:

या योजनेमध्ये ग्राहकांना पुढील गोष्टींचा लाभ घेता येतो.

  • तीन कोटीपर्यंत गृहकर्ज
  • मोफत वैयक्तिक अपघात विमा
  • स्त्रियांना व्याजदरात ०.५% इतकी सवलत
  • 30 वर्षांपर्यंत परतफेड कालावधी

२. Bank of India स्‍टार डायमंड होम लोन:

या योजनेमध्ये ग्राहकांना पुढील गोष्टींचा लाभ घेता येतो.

  • ५ कोटीपर्यंत गृहकर्ज
  • हे गृह कर्ज विशिष्ट मेट्रो शहरांसाठी उपलब्ध आहे
  • एक कोटी पर्यंत एकूण उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीस तसेच कंपन्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

३. Bank of India स्‍टार स्मार्ट होम लोन:

या योजनेमध्ये ग्राहकांना पुढील गोष्टींचा लाभ घेता येतो.

  • Bank of India मध्ये बचत खाते किंवा डिपॉझिट खाते असणार्‍या ग्राहकांसाठी हे गृहकर्ज उपलब्ध आहे.
  • नोकरी करणाऱ्या व्यक्तीस कमीत कमी पाच लाख इतके तरी इतर ग्राहकांचा कमीत कमी दहा लाख इतके कर्ज.
  • तीस वर्षांपर्यंतचा परतफेड कालावधी

४. Bank of India स्टार प्रवासी गृह कर्ज:

ही गृह कर्ज योजना वैद्य पासपोर्ट असणाऱ्या NRI व्यक्तीसाठी आहे.

या योजनेअंतर्गत गृहकर्जाची कमाल मर्यादा पाच कोटी इतकी आहे तसेच परतफेड करण्यासाठी तीस वर्षापर्यंतचा कालावधी बँके कडून दिला जातो.

BOI गृहकर्जासाठी लागणारी कागदपत्रे Bank of India home loan documents list

Bank of India गृहकर्जासाठी ग्राहकाला साधारणतः पुढील कागदपत्रांची आवश्यकता भासते

१. ओळखपत्र:- ओळखपत्र म्हणून पुढील कागदपत्रांचा वापर करता येतो

आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र इत्यादी.

२. रहिवासी पुरावा:- रहिवासी पुरावा म्हणून खाली दिलेल्या कागदपत्रांचा वापर करता येतो.
पासपोर्ट, वाहन चालक परवाना, मतदार ओळखपत्र, विज देयक किंवा दूरध्वनी देयक, आधार कार्ड इत्यादी.

३. उत्पन्नाचा पुरावा:- नोकरी करणाऱ्या अर्जदाराला उत्पन्नाचा पुरावा देण्यासाठी खाली दिलेल्या कागदपत्रांचा उपयोग होऊ शकतो.

  • बँक स्टेटमेंट
  • सॅलरी स्लिप

स्वयंरोजगारवर अवलंबून असलेल्या अर्जदाराला उत्पन्नाचा पुरावा देण्यासाठी खाली दिलेल्या कागदपत्रांचा उपयोग होऊ शकतो.

  • आयकर परतावा प्रत
  • नफा व तोटा स्टेटमेंट

४. संपत्ती संदर्भातील कागदपत्रे:- विक्री करार, ना हरकत प्रमाणपत्र, विक्रीसाठी केलेला करार इत्यादी.

Bank of India गृहकर्जाची प्रक्रिया

Bank of India मधून गृह कर्ज मिळवण्यासाठी साधारण प्रक्रिया संक्षिप्त रुपात पुढीलप्रमाणे दिली आहे.

१) Bank of India गृहकर्जासाठी असलेला अर्ज भरून त्यासंबंधी बँकेला हवी असणारी कागदपत्रे जोडून बँकेत जमा करावी.

२) अर्ज बँकेत जमा करताना प्रक्रिया शुल्क भरावे लागते.

३) यानंतर बँक जमा केलेल्या कागदपत्राची व दिलेल्या माहितीची पडताळणी करते व गरज पडल्यास अर्जदाराला शाखेत बोलावून अधिक माहिती घेतली जाते.

४) कर्ज मंजुरी तसेच कर्जाची रक्कम ठरवली जाते.

५) कर्जाची रक्कम तसेच नियम व अटी असलेले ऑफर लेटर तयार केले जाते व त्यावर अर्जदाराची सही घेतली जाते.

६) अर्जदार इच्छुक असलेल्या घराची किंवा जमिनीच्या कागदपत्राची तपासणी व कायदेशीर पडताळणी केली जाते.

७) बँक कर्मचारी किंवा सिव्हिल इंजिनिअर कडून साईटची पडताळणी व अंदाज घेतला जातो.

८) तांत्रिक तपासणीनंतर अंतिम करार पत्र तयार केले जाते व त्यावर अर्जदाराची सही घेतली जाते.

यानंतर ग्राहकाला Bank of India गृहकर्जाचा लाभ घेता येतो.

Bank of India गृहकर्ज संदर्भातील या लेखाचा उद्देश माहिती उपलब्ध करून देणे इतकाच आहे तसेच गृहकर्जासंदर्भात आर्थिक सल्ला देणे हा यामागचा उद्देश नाही.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment