माझा वाढदिवस मराठीत निबंध

मित्रांनो तुम्ही Maza vadhdivas essay in marathi शोधत आहात का ? तर आम्ही या लेखात माझा वाढदिवस या विषयावर सविस्तर निबंध लिहिला आहे. तुम्हाला Maza vadhdivas essay in marathi नक्की आवडेल अशी आम्ही आशा करतो.

Maza vadhdivas essay in marathi
maza-vadhdivas-essay-in-marathi

माझा वाढदिवस मराठीत निबंध Maza vadhdivas essay in marathi

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. प्रत्येकाची आपला वाढदिवस साजरा ( Birthday celebration ) करण्याची पद्धत वेगळी असते. यादिवशी आयुष्यातील एक वर्ष कमी झाले म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा मी माझ्या आयुष्यातील एक वर्ष मनमुरादपणे व उत्तमरित्या जगलो असे मानण्यात आनंद वाटतो. या दिवशी आपल्यावर प्रेम करणारी सर्व माणसे एकत्र येतात आपल्याला भेटवस्तू व पुढील आयुष्याच्या शुभेच्छा ( Good wishes ) देतात.

या दिवशी घरातील प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडीचा विचार करत असतो. आपल्याला आनंद कशात मिळेल यासाठी प्रयत्न करत असतो. हा खरंतर घरच्यांकडून स्वतःचे लाड करून घेण्याचा हक्काचा दिवस वाटतो.

दर वर्षी मी माझ्या वाढदिवसाची उत्सुकतेने वाट पाहत असतो. मी माझा वाढदिवस प्रत्येक वेळी वेगळा व कायम आठवणीत राहील असा साजरा करण्याचा प्रयत्न करतो. माझा वाढदिवस हा प्रत्येक वर्षी 14 मे या दिवशी येतो.

महत्त्वाचं म्हणजे माझा वाढदिवस हा नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीत ( summer vacation ) येतो व त्या वेळी आम्ही सर्व भावंड आमच्या गावच्या घरी असतो. व तेथेच आम्ही माझा वाढदिवस उत्तमरीत्या साजरा करतो. गेल्या वर्षी माझा वाढदिवस हा माझ्यासाठी कायम लक्षात राहील असा साजरा केला होता.

माझ्या वाढदिवसाची सुरुवाती माझ्या आई-वडिलांच्या शुभेच्छापासुन होते. तसेच मध्यरात्रीपासूनच माझ्या मित्रांचे व नातेवाईकांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेज यायला सुरुवात होते.

सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यावर देवाला नमस्कार करतो व आई-वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. त्यानंतर मी माझ्या आजोबांसोबत गावातल्या देवळात जातो व देवाचे आशीर्वाद घेतो. तिथून आल्यावर आजी, आई व घरातील इतर माझे औक्षण करतात व मी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो.

आई व बाबा त्यांच्या भेटवस्तू मला सकाळीच देतात. आई व काकी मात्र या दिवशी स्वयंपाक घरातच व्यस्त असतात. या दिवशी सर्व जेवण माझे आवडीचे बनवले जाते.

माझ्या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने संध्याकाळी सुरुवात होते. त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या वडिलांनी भेट दिलेले नवीन कपडे घालतो. मी माझ्या बहिणी सोबत त्यादिवशी कोणते-कोणते खेळ खेळायचे व कोणाला काय गिफ्ट द्यायचे हे आठवडाभर अगोदरच ठरवलेले असते. संध्याकाळी शेजारी व नातेवाईकांना तसेच माझ्या सर्व मित्रांना आमंत्रण दिले जाते.

या दिवशी मोठी माणसे व माझे मित्र घरातील हॉल फुलांच्या माळा, फुगे, तोरणे इत्यादींनी सजवतात. केक कापण्याआधी माझे औक्षण केले जाते आणि मी घरातील मोठ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो व त्यानंतरच केक कापला जातो. त्यानंतर सर्वांना केक, अल्पोपहार आणि शीतपेय दिले जाते. नंतर सर्वजण मला भेटवस्तू व शुभेच्छा देतात व मी सुद्धा त्यांना भेटवस्तू देतो.

यानंतर मी व माझे मित्र शेजारच्या खोलीत जातो, तिथे आम्ही अगोदरच वेगवेगळे खेळ खेळण्याची तयारी केलेली असते.

गेल्यावर्षी आम्ही या दिवशी संगीत खुर्चीचा खेळ खेळलो होतो. प्रत्येक डाव जिंकल्यानंतर जिंकणार्‍याला भेटवस्तू दिली होती. या दिवशी आम्ही खूप मजा करतो तसेच गाणी लावून नाचतो.

यानंतर आम्ही सर्वजण व पाहुणे एकत्र पंगतीत जेवायला बसतो. रात्रीचे हे जेवण बाबा बाहेरून मागवतात.

गेल्या काही वर्षांपासून माझ्या वाढदिवसा दिवशी माझे वडील जवळच असलेल्या अनाथ आश्रमात जाऊन तेथील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करतात. दरवर्षी मीसुद्धा त्यांच्यासोबत आश्रमात जाऊन त्यांची मदत करतो.

मी जेव्हा पहिल्यांदा हे पाहिले तेव्हा मला माझ्या घरच्यांचा खुप अभिमान ( proud ) वाटला होता. त्यांच्यासोबत अशा रीतीने साजरा केलेला माझा वाढदिवस हा मला माझ्या घरी साजरा केल्या जाणाऱ्या वाढदिवसापेक्षाही खूप आनंद देतो.

या दिवसाबद्दल आकर्षण वाटावे याचे एक मोठे कारण म्हणजे मला भेटणाऱ्या भेटवस्तू. रात्री सर्व आटोपल्यानंतर मी व माझी बहीण सर्व भेटवस्तू उघडून पाहतो. कोणी काय काय दिले हे पाहण्यात बराच वेळ निघून जातो.

अशारीतीने वर्षातील हा एक दिवस फक्त स्वतःचा म्हणून साजरा करण्यात वेगळीच मजा येते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

Leave a Comment