10 lines on my mother in Marathi | Essay on mother in Marathi

10 lines on my mother in Marathi माझ्या मते आई या शब्दाची फोड म्हणजे “आदी ईश्वर” म्हणजे जी व्यक्ती देवाच्या ही आधी आपल्या आयुष्यात येते ती म्हणजे आपली सर्वांची लाडकी आई. आईचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे म्हणूनच आम्ही माझी आई या विषयावर विविध प्रकारे दहा ओळी मध्ये निबंध लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

10 lines on my mother in Marathi
10-lines-on-my-mother-in-marathi

माझ्या आईवर मराठीत १० ओळी 10 lines on my mother in Marathi

माझ्या आईवर मराठीत १० ओळी 10 lines on my mother in Marathi (Set-1)

 1. माझी आई म्हणजे माझ्यासाठी निस्वार्थ प्रेम व मायेचे मूर्तीमंत प्रतीक आहे.
 2. माझी आई ही आम्हा सर्व भावंडांवर सारखेच प्रेम करते.
 3. ती नेहमीच घरातील सर्वांची खूप काळजी घेते.
 4. माझी आई म्हणजे घरातील सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा मायेचा धागा आहे.
 5. म्हणूनच आम्ही मुलं तिचा नेहमी आदर करतो व तिच्या कामात तिला नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो.
 6. तिची सकाळ सर्वांच्या आधी होते व रात्री ती सर्वात शेवटी झोपते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती रात्रंदिवस झटत असते.
 7. तिने माझ्यासाठी विणलेला सुंदर स्वेटर ती माझ्या सोबत कायम असल्याची जाणीव करून देतो.
 8. माझ्या आईला माझ्या भविष्याची माझ्यापेक्षाही जास्त काळजी असते.
 9. माझ्या अभ्यासातील प्रगतीचे सर्व श्रेय हे तिचेच आहे कारण ती मला माझ्या अभ्यासात खूप मदत करते.
 10. आम्हा मुलांना आमची स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी ती सतत प्रयत्नशील असते.

माझ्या आईवर मराठीत १० ओळी 10 lines on my mother in Marathi (Set-2)

 1. माझी आई एखाद्या देवदूताप्रमाणे प्रत्येक क्षणी माझ्या सोबत असते व मला प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शन करत राहते.
 2. माझ्या छोट्या यशामध्येही तिला नेहमी मोठा आनंद वाटतो.
 3. माझी आई माझ्या तब्येतीची खूप काळजी घेते.
 4. माझेसुद्धा माझ्या आईवर खूप प्रेम आहे तसेच माझा सर्वात जास्त विश्वास सुद्धा तिच्यावरच आहे.
 5. माझी आई म्हणजे आमच्या घरातील मोठा आधारस्तंभ आहे जिच्यावर घरातील प्रत्येक जण अवलंबून आहे.
 6. माझे प्रत्येक गुपित हे फक्त माझ्या आईलाच माहिती असतं.
 7. दरवर्षी तिच्या वाढदिवसादिवशी मी माझ्या जवळचे पैसे जमवून तिच्यासाठी छोटीशी भेटवस्तू घेण्याचा प्रयत्न करतो. तिला इतर महागड्या भेटवस्तू पेक्षा मी दिलेली छोटी भेटवस्तू खूप महत्त्वाची वाटते.
 8. आम्हाला नैतिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते.
 9. एखाद दिवस जर घरी यायला नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला तर ती दारात माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते.
 10. ती तिच्या पुढील आव्हानांचा निडरपणे सामना करते म्हणूनच आई माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श व्यक्ती आहे.

माझ्या आईवर मराठीत १० ओळी 10 lines on my mother in Marathi (Set-3)

 1. माझ्या आयुष्यातील आईची जागा कोणीच घेऊ शकणार नाही कारण माझ्या आयुष्यातील तिचे स्थान आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे.
 2. माझी काळजी करणारी व तितक्याच कठोरपणे मला शिस्त लावणारी माझी आई माझ्यासाठी जगातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे.
 3. माझ्या यशामध्ये माझ्या मागे उभी असलेली एकमेव स्त्री म्हणजे माझी आई आहे.
 4. जिच्यावर मी डोळे बंद ठेवून सुद्धा विश्वास ठेवू शकतो ती व्यक्ती म्हणजे माझी आई.
 5. आमच्या जिभेचे चोचले हौसेने पुरवणारी आई म्हणजे जणू अन्नपूर्णा मातेचे स्वरूपच आहे.
 6. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती सतत आमच्यासाठी काबाडकष्ट करीत असते.
 7. माझी आई ही माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीसारखीच आहे कारण तिच्या बरोबर मी अगदी मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो.
 8. माझी आई मी आजारी पडल्यावर माझी सर्वतोपरी काळजी घेते व रात्रभर माझ्या उशाशी बसून राहते.
 9. इतकं काम करूनही ती तिच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य आणते हे माझ्यासाठी न उमगणार कोडच आहे.
 10. मला माझ्या कामात प्रोत्साहन देणाऱ्या व मी निराश होऊन खचून जाऊ नये म्हणून काळजी घेणाऱ्या आईची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.

माझ्या आईवर मराठीत १० ओळी 10 lines on my mother in Marathi (Set-4)

 1. प्रत्येकाला त्याची आई जगातील सर्वोत्तम आई वाटते याला मी सुद्धा अपवाद नाही.
 2. माझ्यासाठी आई म्हणजे देवाने माझ्यासाठी केलेली सर्वात सुंदर निर्मिती आहे.
 3. नीटनेटकेपणा ची सवय असलेल्या माझ्या आईला घरातील प्रत्येक गोष्ट जागच्या जागी व स्वच्छ ठेवायला आवडते व त्यासाठी ती नेहमी झटत असते.
 4. घरातील इतकं काम करूनही ती ऑफिससाठी वेळ कसा काढते हे नवलच आहे.
 5. माझ्यावर खूप प्रेम करणारी माझी आई मी चुकल्यावर ओरडाही देते पण नंतर शांत झाल्यावर मला कुशीत घेऊन माझी चूक पटवूनही देते.
 6. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र आम्ही हट्टाने तिला कोणतेही काम करू देत नाही पण आम्ही तिची कामे करत असताना तिच्यातला निस्वार्थीपणा व तिची किंमत कळते.
 7. माझ्या आनंदात आनंद मानणारी माझी आई अडचणीच्या वेळी मला सतत प्रोत्साहित करत असते.
 8. माझी आई मला आजसाठीच नाही तर उद्या येणाऱ्या भविष्यातील आव्हानांसाठी मला उत्तमरित्या तयार करते.
 9. माझी नैतिक जडणघडण होण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेणारी माझी आई ही माझ्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे.
 10. लहानपणी आपल्यासाठी जीवाची पर्वा न करणार्‍या आपल्या आईची तिच्या उतारवयात सेवा केली तर त्यात काही मोठे नवल नाही.

माझ्या आईवर मराठीत १० ओळी 10 lines on my mother in Marathi (Set-5)

 1. आई हे केवळ व्यक्ती नाही तर ती एक भावना आहे व ही भावना प्रत्येक सजीवामध्ये मूल जन्मल्यानंतर जन्म घेते.
 2. मुलाला जन्म देण्याचा विचार सुरू केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनात मातृत्वाची जाणीव निर्माण होते.
 3. आईने आजवर तिच्या कामातून सुट्टी घेतलेली मला आठवत नाही.
 4. माझ्या तब्येतीची सर्वात जास्त काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे माझी आई.
 5. तिने झोपताना सांगितलेल्या गोष्टी या आयुष्यभर लढण्याची व संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देत राहतील.
 6. आमच्यासाठी ती तिच्या गरजा व इच्छांकडे सतत दुर्लक्ष करते.
 7. माझ्या आईचे माझ्यावर किती प्रेम आहे हे शब्दात सांगणे निश्चितच शक्य नाही.
 8. ती मलाच नाही तर घरातील सर्वांनाच अगदी जीवापलीकडे जपते व प्रत्येकाची इच्छा व आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करते.
 9. आपल्यासाठी जीवाचं रान करणारे आई जेव्हा आजारी पडते तेव्हा मात्र आपल्या हृदयाचा ठोका चुकतो कारण आई सर्वात आधी एक माणूस आहे या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला असतो.
 10. माझ्या मते माझी आई मला माझ्या जन्मावेळी देवाने दिलेली भेट आहे.

माझ्या आईवर मराठीत १० ओळी 10 lines on my mother in Marathi (Set-6)

 1. आई ही सृष्टीला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे जी आपल्या बाळावर निस्वार्थ प्रेम करते.
 2. तिला माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीच खूप कौतुक वाटतं तसेच माझ्या प्रत्येक निर्णयात ती नेहमी माझ्या पाठीशी असते.
 3. आईने तिच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप काही सहन केलं म्हणूनच अशी संकटं आपल्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून ती नेहमी प्रयत्न करीत असते.
 4. झोपण्याआधी तिच्याकडून गोष्ट ऐकताना मिळणारा आनंद आणि त्यांची शिकवण ही आयुष्यभरही साथ देईल.
 5. तीच एक अशी व्यक्ती आहे जिला माझ प्रत्येक गुपित ठाऊक आहे म्हणूनच ती मला माझ्या मित्रांपेक्षा ही जवळची मैत्रीण वाटते.
 6. माझ्या परीक्षेच्या वेळी तीसुद्धा माझ्याबरोबर रात्री उशिरापर्यंत जागी राहते व मला माझ्या अभ्यासात मदत करते.
 7. आम्हा मुलांचीच नव्हे तर माझे बाबा, आजी, आजोबा या सर्वांचीच आई खूप काळजी घेते.
 8. आईला माझीच नाही तर घरातील प्रत्येकाची आवडनिवड माहित असते.
 9. मी नेहमी आईला तिच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न करतो.
 10. माझ्या आईच्या प्रेमाची तुलना कधीच होऊ शकत नाही कारण तिचे प्रेम आणि त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

1 thought on “10 lines on my mother in Marathi | Essay on mother in Marathi”

Leave a Comment