हॉकी खेळाची माहिती | Information about hockey in Marathi

मित्रांनो तुम्ही हॉकी या जगप्रसिद्ध खेळा संदर्भात माहिती ( hockey information ) जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का. तर हा आर्टिकल तुम्हाला Information about hockey in marathi अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्यास नक्की मदत करेल.

या लेखात तुम्हाला हॉकी चा इतिहास, हॉकी चे विविध प्रकार व त्यासाठी लागणारे साहित्य व मैदान तसेच या खेळाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धा ( International sports ) इत्यादी माहिती समाविष्ट केली आहे. तर चला जाणून घेऊया.

information about hockey in marathi

Essay on hockey in Marathi हॉकी खेळाची माहिती

हॉकी हा जगातील तिसर्‍या क्रमांकावर जगप्रसिद्ध असलेला खेळ आहे. फुटबॉल आणि क्रिकेट नंतर हॉकी खेळाचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. हा खेळ ऑलिम्पिक ( Olympic games ) मध्ये सुद्धा खेळला जातो.

या खेळ प्रदेशानुसार वेगवेगळ्या format मध्ये खेळला जातो. उदाहरणार्थ bandy हा प्रकार बर्फाच्या मैदानावर खेळला जातो field हॉकी हा प्रकार गवतावर किंवा मॅटवर खेळला जातो. प्रत्येक प्रदेश तेथील वातावरण यानुसार खेळाचे नियम साहित्य मैदानाचा आकार वेगवेगळे असतात. येथील फिल्ड हॉकी गवतावरील किंवा मॅटवर खेळला जाणारा हा प्रकार जगप्रसिद्ध आहे.

या मध्ये हॉकी विश्वचषक आणि महिला विश्वचषक या हॉकी मधील सर्वोच्च स्थानी असलेल्या स्पर्धा आहेत.

हॉकी चा इतिहास / hockey history in marathi :-

hockey history
Source: Wikipedia

या खेळाची सुरुवात बहुधा चार हजार वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज वर्तवला जातो. अथेन्स मधील उत्खननामध्ये इसवी सन पूर्व 514 ते 449 या कालखंडात एक भित्तीचित्र आढळून आले यात दोन खेळाडू एकमेकांसमोर टोकावर वाकलेल्या काठ्या घेऊन उभे आहेत व त्यांच्या मधोमध एक चेंडू ठेवलेला आहे यावरून तो खेळ हॉकी असावा असे दिसून येते.

प्राचीन ईजिप्तमध्ये हॉकी खेळत असावेत असे काही पुरावे आढळून आले आहेत या नंतर अनेक ठिकाणी हा खेळ खेळला गेला पण इसवी सन अठराशे नंतर या खेळाला आधुनिक रूप येऊ लागले इसवी सन 1920 पासून हॉकी हा खेळ ऑलिम्पिक सामन्यांमध्ये समाविष्ट करण्यात आला सण 1971 पासून हॉकी विश्वचषक ( hockey world cup ) सुरू करण्यात आला तर सन 1974 पासून महिला हॉकी विश्वचषक आला सुरुवात झाली.

हॉकी मधील उपप्रकार hockey types:-

हॉकी हा खेळ प्रदेशानुसार आणि तेथील नैसर्गिक परिस्थिती नुसार वेगळा फॉरमॅटमध्ये खेळला जातो

1] फिल्ड हॉकी :-

field hockey
Information-of-hockey-in-marathi

हा खेळ साधारणपणे गवती मैदानावर किंवा मॅटवर खेळला जातो हा हॉकीतील जगप्रसिद्ध प्रकार आहे. या खेळामध्ये प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. हा खेळ 70 मिनिटांचा असून 35 मिनिटांच्या दोन हाफ मध्ये विभागला जातो दोन हाफ मध्ये दहा मिनिटांचा ब्रेक असतो. या खेळासाठी लागणारे मैदान साहित्य याची माहिती खालील प्रमाणे आहे.

मैदान : या खेळाचे मैदान आयताकृती असून त्याची लांबी 91.4 मिटर तर रुंदी 55 मीटर इतकी असते मैदानाच्या मध्यावर एक रेष आखली जाते तर मध्यापासून दोन्ही बाजूस 22.86 मीटर अंतरावर दोन रेषा असतात.मैदानाच्या दोन्ही बाजूस दोन गोल असतात हे गोल्ड 3.66 मीटर रुंदीचे तर 2.13 मीटर उंचीचे असतात.

साहित्य :-
या खेळासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे

चेंडू (ball) : या खेळातील चेंडू हा cork चा बनवलेला असतो. व त्याला चामड्याचे कव्हर शिवलेले असते. या चेंडूचा परीघ (perimeter) हा 23 सेंटीमीटर इतका असतो.

हॉकी स्टिक : यासाठी लागणारी हॉकी स्टिक ही अंदाजे एक मीटर लांबीची असते हॉकी स्टिक ही साधारणतः लाकडाची असते पण आता हॉकी स्टिक ही वेगवेगळ्या मटेरियल्स पासून बनवली जाते उदाहरणार्थ: कार्बन, फायबर ग्लास, ॲल्युमिनियम इत्यादी.
याव्यतिरिक्त गोलकीपर च्या संरक्षणासाठी हेल्मेटचा आणि पॅडचा वापर केला जातो.

फिल्ड हॉकी मधील सर्वसाधारण नियम rules of hockey in marathi :-
1) खेळताना नेहमी हॉकी स्टिक च्या चपट्या बाजूचा वापर करावा लागतो.
2) संरक्षणासाठी शिन गार्ड, माऊथ गार्ड चा वापर करणे अनिवार्य आहे कोणत्याही प्रकारची ज्वेलरी जवळ बाळगू नये.
3) एका वेळी प्रत्येक संघाकडून दहा खेळाडू व एक गोलकीपर खेळू शकतात.
4) हा सामना 35 मिनिटांच्या दोन हाफ मध्ये खेळवला जातो
5) चेंडूला हाताने पायाने स्पर्श केल्यास foul ठरवण्यात येतो.
6) पर्यायी खेळाडू (substitution) : खेळ थांबला असताना दोन्ही संघ आपले खेळाडू बदली करू शकतात.

फिल्ड हॉकी विश्वचषक आणि विजेते :-
या प्रकारातील विश्वचषकाची सुरुवात 1971 पासून करण्यात आली. खाली दिलेल्या यादीमध्ये विश्वचषक वर्ष व विजेते ( Hockey world cup winners ) यांची यादी समाविष्ट करण्यात आली आहे.

वर्षेविजेते
1971पाकिस्तान
1973नेदरलँड्स
1975पाकिस्तान
1978नेदरलँड्स
1982पश्चिम जर्मनी
1986इंग्लंड
1990पाकिस्तान
1994नेदरलँड्स
1998स्पेन
2002ऑस्ट्रेलिया
2006ऑस्ट्रेलिया
2010जर्मनी
2014नेदरलँड्स
2018नेदरलँड्स

2] बॅंडी हॉकी :-

Bandy hockey
बॅंडी हॉकी, Source :- Wikipedia

हा खेळ मुख्यतः युरोप आणि आशिया खंडात खेळला जातो याचा उल्लेख रशियन हॉकी असा ही खेळला जातो या खेळासाठी लागणारा मैदान बर्फाने आच्छादलेल्या असतो जेणे करून त्यावरून खेळाडूंना सरकणे अगदीच सोपे जाईल या खेळासाठी असलेल्या मैदानाची मापे ही फुटबॉल मैदान सारखीच असतात याची माफी अंदाजे 350 फूट लांब आणि 180 फूट रुंद असतात हा खेळ 90 मिनिटांचा असतो व तो 45 मिनिटांच्या दोन भागांमध्ये विभागला जातो या मध्ये खेळाडूंची संख्या प्रत्येक संघात आठ ते दहा इतकी असते

साहित्य :-
या खेळासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे

1) Bandy ball : या खेळामध्ये kosa-60, jofa-60 इत्यादी चेंडू ना मान्यता असते या चेंडूंचा रंग लाल गुलाबी किंवा नारंगी असतो.
2) bandy स्टिक: काठीचा वाकलेला भाग सोडून या काटे ची लांबी 127 सेंटीमीटर इतकी असते. या काठीचा खालचा भाग हा वळलेला असतो.
3) Bandy scates: हा खेळ बर्फावर खेळला जात असल्याने स्टेट शूज कसे असावेत याचेही नियम ठरवले गेले आहेत उदाहरणार्थ स्केटचे कोपरे टोकदार असू नये. ब्लेड ची रुंदी कमीत कमी 2.9 इतकी असावी.
4) शिरस्त्राण (helmet) : या खेळासाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे.तसेच योग्य मापाची व dentist कढून बनवून घेतलेले mouthguard वापरणे आवश्यक आहे. तसेच मानेच्या संरक्षणासाठी neckguard वापरणे देखील गरजेचे आहे, या खेळात एकूण अठरा नियम आहेत खेळाडूंच्या वयोमानानुसार नियमात बदल करण्यात येतात.

3] Ice हॉकी information about ice hockey in marathi:-

ice hockey
Ice-हॉकी

हा खेळ प्रामुख्याने अमेरिका आणि युरोप खंडात खेळला जातो. Bandy आणि ice हॉकी यामध्ये असलेला मुख्य फरक म्हणजे bandy मध्ये गोलाकार चेंडू चा वापर केला जातो तर Ice हॉकीमध्ये तीन इंच व्यास (diameter) असलेल्या चकतीचा (puck) वापर केला जातो. Ice हॉकी साठी वापरण्यात येणाऱ्या स्टीकचा आकार इंग्रजी L सारखा असतो. Ice हॉकी मध्ये प्रत्येकी सहा खेळाडू असतात त्यातील एक गोल टेंडर असतो. तर बाकी पक च्या मागे धावत असतात.

Ice हॉकी साठी लागणारी साहित्य पुढील प्रमाणे आहेत :-
हेल्मेट, स्केट्स, हॉकी स्टिक्स, शिन पॅड, शोल्डर पॅड, एलबो पॅड इत्यादी.

4] Para हॉकी :-

हा हॉकी चा प्रकार विकलांग माणसांसाठी 1960 मध्ये स्वीडन या देशात सुरू करण्यात आला सध्या हा खेळ विकलांग ऑलिंपिक मध्ये प्रसिद्ध आहे हा खेळ जगातील अनेक ठिकाणी खेळला जातो यासाठी double bladed sledge वापर केला जातो त्यावर खेळाडूंना बसण्याची सोय असते व पुढे जाण्यासाठी तसेच पक टोळवण्यासाठी स्टीकचा वापर केला जातो.

5] Inline हॉकी :-

हा खेळ ice हॉकी सारखा असतो इथे स्केट्स ऐवजी रोलर स्केटचा वापर केला जातो यामध्ये चार खेळाडू व एक गोलकीपर अशा एकूण पाच जणांचा समावेश असतो यामध्ये पंधरा मिनिटांच्या तीन फेऱ्या घेतल्या जातात यामध्येही चेंडू ऐवजी पक म्हणजे चकतीचा वापर केला जातो.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment