Information about parrot in Marathi | Short essay on parrot in Marathi

मित्रांनो तुम्हाला information about parrot in marathi या विषयाबद्दल जाणून घ्यायचे आहे का ? पोपट हा पाळीव पक्षी म्हणून तुम्हाला माहीत असेलच. पण या पक्षाच्या निरनिराळ्या 316 प्रजाती आहेत तर अशाच पोपटाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहेत का ? तुम्हाला या लेखामध्ये पोपट या पक्षाबद्दलच्या अनेक गोष्टी जसे की यांचे खाद्य, प्रजाती ( parrot species ), घरटे, प्रजनन याबद्दल माहिती मिळेल.

information about parrot in marathi

Information about parrot in Marathi Short essay on parrot in Marathi

Information about parrot in Marathi

पोपट हा जगातील सर्वात हुशार मानला जाणारा पक्षी आहे. त्याच्या मेंदू इतर पक्षांपेक्षा विकसित झालेला असतो. हा इतर पक्षांपेक्षा वेगाने उडू शकतो. हा पक्षी समूहाने राहतो. हे आपली वसाहत विशिष्ट झाडांमध्ये वसवतात.

बरेच लोक राघू या प्रजातीच्या पोपटाला पिंजऱ्यात पाळतात ( pet bird ). तसेच त्याला बोलायला व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करायला शिकवतात. या पक्षाची जगप्रसिद्ध असलेली बाब म्हणजे हा माणसाची तसेच जंगलातील इतर प्राण्यांची नक्कल करू शकतो तसेच माणसे, वस्तू व आकडे ओळखू शकतो.

दिसायला आकर्षक वाटत असले तरी काही पोपट हे हिंसक असतात व आपल्या चोचीचा वापर करून हल्ला करतात व जखमी करू शकतात. पूर्वीपासून पोपटाची रंगीबेरंगी पिसे ही शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात.

पोपटाचे आयुष्य ( parrot lifespan ) हे साधारणतः 15 ते 20 वर्षे इतके असते. काकापो नावाचे पोपट 80 वर्ष जगु शकतो.

पोपट हा पक्षी कसा दिसतो ?

गडद रंगाचे व रंगीबिरंगी पिसे असणारे हे पक्षी आकर्षक दिसतात. विविध प्रजाती नुसार हा पक्षी वेगवेगळ्या आकारात व रंगात दिसून येतो पण एकंदरीत त्यांच्या शरीराची ठेवण ही सर्व प्रजातींमध्ये सारखीच असते.

या पक्षाची चोच आखूड व खालच्या दिशेला कळलेली असते. तो चोचीचा वरचा भाग सुद्धा थोडाफार हलवू शकतो. या पक्षाची जीभ जाड व लांब असते व मान तोकडी असते.

याचे वजन साधारणतः दहा ग्राम ते 4000 ग्राम इतके असते. या पक्षाची चोचेपासून ते शेपटीपर्यंत लांबी प्रजाती नुसार दहा सेंटिमीटर ते 100 सेंटीमीटर पर्यंत असते.

पोपटाच्या शेपटीचा आकारही प्रजाती नुसार काहींमध्ये खूप लांब तर आखूड असतो. या पक्षाच्या पंखांचा फैलाव 15 सेंटिमीटर ते दीडशे सेंटिमीटर इतका असतो.

याचे पंख सुबक आकाराचे असतात. हा पक्षी इतर पक्ष्यांच्या मानाने वेगाने उडू शकतो. तो जास्तीत जास्त पंधरा मैल प्रतितास इतक्या वेगाने उडू शकतो. वेगाने उडत असला तरीही हा पक्षी जास्त दूरवर उडू शकत नाही.

काकापो या प्रजातीच्या पोपटाला उडता येत नाही. काकापो जगातील सर्वात वजनदार पोपटाची प्रजात आहे.

पोपट हा त्याच्या भडक रंगांमुळे सुंदर व आकर्षक वाटतो. सामान्यतः हिरव्या रंगाचा व लाल चोच असलेला पोपट हा सर्वत्र आढळला जातो. तसेच भरपूर प्रजाती या विविध रंगांमध्ये दिसून येतात, उदाहरणार्थ: लाल, पिवळा, हिरवा, निळा, काळा, इत्यादी.
भारतीय जंगलामध्ये आढळणारा रिंग नेक्ड पॅरट या प्रजातीच्या पोपटाच्या मानेभोवती राखाडी रंगाचे वलय असते.

त्याच्या पायाची पकड मजबूत असते. पोपटाच्या पायाची दोन बोटे ही पुढच्या बाजूला तर दोन मागच्या बाजूला वळलेली असतात. यामुळे तो आपल्या विशिष्ट पायांचा वापर करून झाडावर झपाट्याने चढू शकतो. हा त्याच्या मजबूत चोचेचा वापर करून टणक कवचाची फळे सुद्धा फोडू शकतो.

पोपट काय खातो ( Parrot food ) ?

धान्याचे दाणे व फळे व फळांच्या बिया हे त्यांचे खाद्य आहे. काही पोपट फुलांमधील मकरंद शोषून घेतात. बिया हे त्यांचे आवडते खाद्य ( parrot favourite food ) आहे. काही पोपट किडे व कीटक खातात.

ते त्यांच्या मजबूत चोचीचा वापर करून कठीण कवचाची फळे सहज फोडू शकतात व आतील गर खातात. पोपट हा पायाने पकडून खाणारा एकमेव पक्षी आहे. खाताना मात्र ते कोणतेच फळ पूर्णपणे खात नाही.

कोणत्याही फळाचा ते थोडा भाग खाऊन बाकीचे फळ फेकून देतात. त्यामुळे या पक्ष्यांचे थवे शेताची तसेच झाडांवरील फळांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात.

पोपट या पक्षामध्ये प्रजनन कसे घडून येते ?

काही पक्ष्यांप्रमाणे हा पक्षी सुद्धा एकाच जोडीदाराबरोबर आपले आयुष्य घालवतो व फक्त प्रजनन काळ अस नाही तर इतर काळात सुद्धा हे जोडपे सोबत राहते. हे पक्षी जानेवारी ते एप्रिल या काळात प्रजनन घडवून आणतात. प्रजननाच्या वेळी हे पक्षी झाडावर मोठे घरटे बांधतात. किंवा झाडावरील ढोलीमध्येच अंडी घालतात.

एका वेळेला ह्या पक्ष्याची मादी दोन ते पाच इतकी अंडी घालते. ते एकावेळी जास्तीत जास्त आठ अंडी देऊ शकतात. प्रजाती कोणतीही असली तरी अंड्यांचा रंग पांढरा असतो. साधारण 10 पिलांना अंड्यातून बाहेर येण्यासाठी 18 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो.

हे जोडपे आपल्या पिल्लांची उत्तमरीत्या काळजी घेतात. जन्मावेळी ही पिल्ले अत्यंत दुबळी असतात व पहिले दोन आठवडे ही पिल्ले अंध असतात. या पिल्लांना प्रौढावस्थेतील यायला तीन ते चार वर्षे लागतात.

पोपट कोठे आढळून येतात ?

हे पक्षी बहुदा उष्णकटिबंध प्रदेशांमध्ये आढळून येतात तसेच काही उपोष्ण कटिबंधीय प्रदेश तसेच थंड प्रदेशातही आढळून येतात.

पोपटाचा आवाज व त्याची नक्कल करण्याची कला ( Parrot voice ) :-

हा पक्षी अतिशय गोंगाट करणारा पक्षी आहे. या पक्षाचा आवाज कर्कश असतो. काही माणसे पोपटाला पाळून त्याला बोलायला शिकवतात. तो माणसा साखरे शब्द उच्चार करू शकतो. आफ्रिकेत आढळणारी एक प्रजात स्पष्ट उच्चार करते. तसेच हा पक्षी निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करू शकतो.

पोपटाचा इतिहास ( Parrot history ) :-

फ्रान्स मध्ये आढळून आलेल्या काही जीवाश्म वरून हा पक्षी दीड कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असावा असे समजले जाते. पोपटाचा उगम हा ऑस्ट्रेलियामध्ये झाला असावा असे सांगितले जाते.

पोपट त्याचे घरटे कुठे व कसे तयार करते ? ( parrot nest ) :-

पोपटाच्या काही प्रजाती हे झाडाच्या ढोली मध्ये आपले घरटे तयार करतात. तर काही प्रजाती घराच्या भिंतीला असलेल्या भोकामध्ये घरटी बनवतात. खडकाळ प्रदेशात राहणारे पोपट दगडांच्या फटीत आपले घरटे बनवतात. काकापो‌ हा आफ्रिकन पोपट जमिनीवरच आपले घरटे तयार करतो.

नासाडी करणारा पक्षी :-

पोपट हा समूहाने राहणारा व उडणारा पक्षी आहे. त्यामुळे हे पक्षी फळ बागेवर किंवा शेतामध्ये जाऊन फळांची नासधूस करतात. नेस्टर नोटॅबिलीस या प्रजातीचा पोपट मेंढीच्या पाठीला चोच मारून जखमी करतो त्यामुळे मेंढी मरून जाते.

म्हणूनच अशा उपद्रव करणाऱ्या पक्षाची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. यामुळेच पोपटाच्या काही प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत.

पोपटाच्या प्रजाती ( Parrot species name ) :-

Information about parrot in marathi

पोपटाचे शास्त्रीय नाव psittaciformes हे आहे. पोपटाच्या एकूण 316 प्रजाती आहेत व यातील मेको, लोरी पॅराकिट, काकाकुवा, बजरीगार या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात यांच्या विविध प्रजाती आढळून येतात.

उपद्रव करणाऱ्या या पक्षाची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते व यामुळेच पोपटाच्या अनेक प्रजाती नष्ट झाले आहेत.
साधारणतः आढळून येणाऱ्या पोपटाच्या प्रजाती पुढील प्रमाणे आहेत. :-

१) ग्रे पॅरट ( Gray parrot) : हा मध्यम आकाराचा पक्षी प्रामुख्याने आफ्रिकेमध्ये आढळून येतो. याच्या शरीराचा रंग राखाडी व सोच काळ्या रंगाची असते व शेपटीचा रंग लाल असतो.

२) मॅको ( Macaw ) : हा पक्षी साधारणतः 12 इंच ते 40 इंच इतका लांब असतो. याची शेपटी लांब व चोच मोठी असते व तो प्रामुख्याने मेक्सिको, मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिका येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतो

३) कोकाटील ( Cockatiel ) : हा छोट्या आकाराचा पक्षी ऑस्ट्रेलिया मध्ये आढळून येतो. तसेच हा पक्षी पाळला सुद्धा राहतो. पाळीव कोकाटील हा वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळून येतो.

४) बजरीगार ( Budgerigar ) : या पक्षाचे शरीर फिकट हिरव्या रंगाची असून डोके पिवळ्या रंगाचे असते. हा पक्षी ऑस्ट्रेलिया मध्ये आढळतो. हा पोपट छोट्या आकाराचा असून त्याची शेपटी लांब असते.

५) अमेझॉन पॅरट ( Amazon parrot ) : ह्या प्रजातीतील पोपट मध्यम आकाराचे व तोकड्या शेपटीचे असतात. हे पक्षी दक्षिण व मध्य अमेरिका तसेच कॅरिबियन प्रदेशात राहतात.

पोपटाबद्दल विचारले जाणारे प्रश्न :-

 1. पोपटाच्या घराला काय म्हणतात ?

  पोपटाच्या घराला ढोली असे म्हणतात.

 2. Write essay of bird on the parrot in marathi ?

  पोपट हा जगातील सर्वात हुशार मानला जाणारा पक्षी आहे. त्याच्या मेंदू इतर पक्षांपेक्षा विकसित झालेला असतो. हा इतर पक्षांपेक्षा वेगाने उडू शकतो. हा पक्षी समूहाने राहतो. हे आपली वसाहत विशिष्ट झाडांमध्ये वसवतात.

 3. पोपट काय खातो ?

  धान्याचे दाणे व फळे फळांच्या बिया हे त्यांचे खाद्य आहे. काही पोपट फुलांमधील मकरंद शोषून घेतात. बिया हे त्यांचे आवडते खाद्य ( parrot favourite food ) आहे. काही पोपट किडे व कीटक खातात.

 4. पोपट हा पक्षी कसा दिसतो ?

  गडद रंगाचे व रंगीबिरंगी पिसे असणारे हे पक्षी आकर्षक दिसतात. विविध प्रजाती नुसार हा पक्षी वेगवेगळ्या आकारात व रंगात दिसून येतो पण एकंदरीत त्यांच्या शरीराची ठेवण ही सर्व प्रजातींमध्ये सारखीच असते.

 5. पोपटाच्या घराचे नाव काय?

  पोपटाच्या घराला ढोली असे म्हणतात.

Read also:-

Share on:

Leave a Comment