Cockatoo bird information in Marathi | Information on cockatoo in Marathi

मित्रांनो तुम्हाला Cockatoo bird information in Marathi या विषयाबद्दल जाणून घ्यायचे आहे का ? तर या ठिकाणी या लेखात तुम्हाला कोकाटे या पक्षाबद्दल बरीच माहिती मिळू शकेल. आम्ही या लेखात कोकाटो या पक्षाबद्दल मुद्देसूदपणे बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. Cockatoo या पक्ष्याला मराठीमध्ये काकाकुवा असे म्हणतात.

cockatoo bird information in marathi

Cockatoo bird information in marathi कोकाटू पक्षीबद्दल माहिती

Cockatoo bird information in Marathi

कोकाटो हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान असणार्‍या पक्षांपैकी एक आहे. कोकाटो हा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पाळीव पक्षी ( pet bird ) आहे.

डोक्यावर सुंदर पिसांचा तुरा असलेला हा पक्षी अत्यंत हुशार असतो व तो बोलू शकतो. कोकाटो चा Cacstuidae या पोपटाच्या कुटुंबात समावेश होतो.

हा समुहाने राहणारा पक्षी असून तो हुशार आहे. या प्रजातीतील पक्षी रात्रीच्या वेळी घरट्यात असतात व दिवसभर अन्नाच्या शोधात इतरत्र फिरत असतात.

या पक्षाच्या एकूण 21 प्रजाती ( cockatoo species ) अस्तित्वात आहेत. काहीजण हे हुशार पक्षी पिंजर्‍यात पाळणे पसंत करतात तसेच याच्या काही प्रजाती प्राणिसंग्रहालयात देखिल आढळून येतात.

जगातील मोठ्या आवाज करणारे पक्षांपैकी हा एक आहे. कोकाटो मध्ये उडण्यासाठी मदत करणारी पिसे तयार व्हायला किंवा जुनी गेलेले पिसे परत यायला भरपूर वेळ लागतो.

हा पक्षी सतत आपल्या चोचीचा वापर करून आपले पंख व पिसे साफ करतो. तसेच शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी तो पावडर सारखा एक पदार्थ तयार करतो व तो आपल्या चोचीच्या सहाय्याने शरीरावर लावतो.

हारले या नावाचा जगप्रसिद्ध कोकाटे पक्षी पांढऱ्या रंगाचा असून तो नेदरलैंड ( Netherlands ) मध्ये आढळून येतो.

कोकाटो पक्षी कसा दिसतो? ( How cockatoo looks )

कोकाटो हा पक्षी प्रामुख्याने त्याच्या डोक्यावर असलेल्या सुंदर पिसांच्या तुऱ्यामुळे व बाकदार चोचेमुळे ओळखला जातो.

या पक्ष्याची चोच मोठी व खालच्या बाजूला कललेली असते तसेच हा पक्षी मध्यम ते मोठ्या आकारात आढळून येतो. व याचे डोळे गोल आकाराचे असतात.
या पक्षाची चोच टोकदार असून कधीकधी तो या चोचेचा आधार घेऊन झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो.

हा पक्षी त्याच्या डोक्यावरील तुरा वर खाली हलवू शकतो. त्याच्या तुऱ्याच्या हालचालींवरून तो आपल्या मूड बद्दल संकेत देत असतो. इतर पक्षांपेक्षा या पक्षाच्या तुऱ्यामध्ये जास्त रंग आढळून येत नाहीत. बहुतांश प्रजातींमध्ये पांढरा राखाडी काळा असे रंग आढळतात तर काही थोड्याच प्रजातींमध्ये शेपटी व तुऱ्यामध्ये लाल रंगाची पिसे आढळतात.

या पक्षाच्या पायाच्या बोटांची संरचना इतर पोपटाप्रमाणेच असते. म्हणजेच दोन बोटे समोरच्या बाजूला तर दोन बोटे मागच्या बाजूला असतात. ह्याचा उपयोग त्याला झाडावर चढण्यासाठी होतो. तसेच एका पायाने फांदी घट्ट धरून दुसऱ्या पायाने फळ पकडू शकतो व एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सहज जाऊ शकतो.

काही पक्ष्यांचा आकार इतर पक्षांच्या तुलनेत साधारणत: मोठा असतो. तर काही प्रजातींचा आकार लहान असतो.

कोकाटो या पक्षाची चोचेपासून ते शेवटपर्यंतची लांबी ही विविध प्रजाती मध्ये 12 ते 24 इंच इतकी लांब असते. ग्रेट ब्लॅक या प्रजातीचा कोकाटो मोठ्या आकाराचा असून त्याची लांबी तीस इंचापर्यंत असते.

विविध प्रजातींमध्ये या पक्षाचे वजन 300 ग्रॅम ते 1200 ग्रॅम इतकी असते.

कोकाटो काय खातो? ( what do cockatoos eat )

कोकाटो हा पक्षी अनेक गोष्टींचा व प्रामुख्याने फळांचा खाद्य म्हणून उपयोग करतो.

कोकाटो हा दिवसा लवकर घरट्याबाहेर निघत नाही कारण त्याला अन्न शोधण्यासाठी उजेडाची गरज असते. म्हणून शक्यतो ऊन्ह वाढल्यावर हा पक्षी अन्नाच्या शोधात बाहेर पडतो.

बहुतेक कोकाटो पक्षी हे बिया, कंदमुळे, फळे, फुले, कीटक यांचा खाद्य म्हणून वापर करतात. बहुतेक प्रजातींमध्ये मुख्यत्वे बियांचा खाद्य म्हणून वापर केला जातो.

काही प्रजाती ह्या जमिनीवरील बिया धान्य इत्यादीचा खाद्य म्हणून उपयोग करतात. काही कोकाटो त्यांच्या लांब चोचीने जमीन उकरून त्यातील कीड व कीटक खातात. व काही प्रजाती या फक्त झाडावरील फळे, फुले यांचा खाद्य म्हणून वापर करतात. कोकाटो त्याच्या मजबूत चोचीचा वापर करून कठीण कवचाची फळे फोडू शकतात. ते एका पायात फळ पकडून चोचीने ते फळ फोडतात. काही लहान पक्षांना मात्र ही फळे फोडता येत नाहीत.

काही फळे ही नाजूक फांदीच्या टोकावर असतात त्यामुळे त्यांच्या वजनामुळे फांदी खाली वाकत असल्यामुळे ते खाणे त्यांना शक्य होत नाही. म्हणून हे फांदीला एका पायाने खाली वाकवतात व दुसरा पाय दुसऱ्या फांदीला घट्ट धरून ठेवतात व फळ चोचीने पकडून खातात.

काही कोकाटो हे मिळेल त्या गोष्टींचा खाद्य म्हणून वापर करतात तर काही प्रजाती मात्र विशिष्ट प्रकारच्या फळांचाच खाद्य म्हणून वापर करतात.

काही प्रजाती फक्त प्रजनन वेळी मोठ्या प्रमाणात कीटकांचा खाद्यात समावेश करतात. तर काही प्रजाती या फक्त कीटकांना खाऊन आपले उदरनिर्वाह ( livelihood ) करतात.

हे पक्षी प्रजननावेळी जास्तीत जास्त पौष्टिक फळे व इतर गोष्टी खातात, म्हणूनच यावेळी हे पक्षी आपला जास्तीत जास्त वेळ अन्न शोधण्यात घालवतात.

माणसे जशी हाताने अन्न खातात तसेच कोकाटो हे पायाने अन्न खाणारी प्रजात आहे. बहुतेक कोकाटो हे डाव्या पायाचा वापर खाण्यासाठी करतात. तर काहीजण उजव्या पायाचा वापर करतात.

कोकाटोचे घरटे ( where do cockatoos live ) :-

या पक्ष्यांची घरटी बहुदा डोंगराच्या उतारावर असतात. बहुदा कोकाटोच्या बहुतेक प्रजाती या झाडातल्या ढोली मध्येच आपले वास्तव्य करतात.

हे पक्षी साधारणतः स्वतः पेक्षा मोठे असलेल्या झाडाच्या खोडावरील पोकळीमध्ये म्हणजेच ढोली मध्ये आपले घरटे तयार करतात. घरटी बनवण्यासाठी ते काड्या, गवत, पाने, छोट्या फांद्या, व खोडाच्या सालीचा वापर करतात.

ही ढोली ते स्वतः करत नाहीत. कधी कधी या ढोलीच्या हक्कावरून हे पक्षी एकामेकाशी भांडण करतात.

काही कोकाटो हे अन्न व पाण्याचे उपलब्ध असलेल्या जागी सात ते आठ मीटर इतक्या लांबीचे सामूहिक घरटे झाडावर तयार करतात.

जंगलातील होणाऱ्या वृक्षतोडीमुळे ( Deforestation ) ढोली असलेल्या झाडांची संख्या कमी होते व या पक्षांच्या ढोलीमध्ये राहण्याची सवय मोडत चालली आहे.

कोकाटो पक्षामध्ये प्रजनन कसे घडून येते ?

कोकाटो पक्षी इतर पक्षांपेक्षा हुशार असतो व त्यामुळेच तो लैंगिकदृष्ट्या प्रौढावस्थेत गेल्यावर तो आपला साथीदार निवडतो व आयुष्यभर त्यासोबत राहतो.

त्यानंतर ते कोणत्याही इतर पक्षाबरोबर असे संबंध तयार करत नाही. कोकाटो हे वयाच्या तिसऱ्या ते सातव्या वर्षापर्यंत प्रजननासाठी परिपक्व होतात.

कोकाटो प्रजातीतील मादी दोन दिवसाच्या अंतराने एक अशाप्रकारे अंडी घालते. हे पक्षी जास्तीत जास्त आठ अंडी देऊ शकतात.

एका खेपेला दिल्या जाणाऱ्या अंड्यांची संख्या ही विविध प्रजाती नुसार कमी जास्त असतात. मोठ्या आकाराच्या काही प्रजातींमध्ये एका खेपेला एकच अंडे दिले जाते. व छोट्या आकाराचे कोकाटू एका खेपेस 2 ते 8 पर्यंत अंडी येऊ शकतात.

तसेच प्रजनन वेळी घेतल्या जाणार्‍या खाद्यानुसार अंड्यांची संख्या कमी जास्त असते. तसेच जर पहिली खेप फुकट गेली तर हे पक्षी पुन्हा अंडी घालतात.

ही अंडी लंबगोलाकार व पांढऱ्या रंगाची असतात. अंडी घातल्यानंतर ती उगवण्याचे काम मात्र जोडप्यातील दोन्ही पक्षी करतात. याला अपवाद म्हणजे ब्लॅक कॉक ही जात ज्यामध्ये अंडी उबवण्याचे काम फक्त मादी करते.

यातल्या एकूण अंड्यापैकी 20 टक्के अंड्यांमधून पिल्ले तयार होत नाहीत. या पक्षाच्या पिल्लांना अंड्यातून बाहेर येण्यासाठी लागणारा वेळ हा प्रत्येक प्रजातीनुसार वेगळा असतो छोट्या कोकाटोच्या पिल्लांना अंड्यातून बाहेर येण्यासाठी वीस दिवसाचा कालावधी लागतो तर मोठ्या आकाराच्या कोकाटोमध्ये 29 दिवसाचा कालावधी लागतो.

तसेच सर्व अंड्यांमधून शेवटी बाहेर पडणाऱ्या पिलाची जगण्याची शक्यता कमी असते. लहान असताना ते आपल्या पालकांकडून विविध कौशल्य शिकून घेतात. तसेच ते वर्षभर आपल्या पालकांच्या निगराणीखाली राहतात.

जन्माला आल्यानंतर त्यांना उडण्यासाठी लागणाऱ्या पिसांची वाढ होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो.

प्रजाती ( cockatoo species ) :-

कोकाटो हा पक्षी पोपट या पक्षाच्या कुटुंबातील असून त्याच्या एकूण 21 प्रजाती आहेत या प्रामुख्याने इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक भागांमध्ये आढळून येतात. त्यातील 11 हे ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये आढळून येतात तर काही प्रजाती ह्या इंडोनेशिया, फिलिपिन्स येथे आढळून येतात.

कोकाटो पक्ष्याचा आयुष्य कालावधी ( Cockatoo bird life span ) :-

हा पक्षी जंगलामध्ये असला तर तो 25 ते 60 वर्ष इतका काळ जगतो. काही प्रजाती या माणसाच्या वया एवढा काळ जगतात.

प्रसिद्ध पाळीव पक्षी :-

कोकाटो हा प्रसिद्ध पाळीव पक्षी आहे. कोकाटो मध्ये आढळून येणारा कोकाटिल या प्रजातीचा पक्षी सहसा पाळला जातो व त्याच्या गरजा पूर्ण करणे शक्य असते पण त्याला सतत पिंजर्‍यात ठेवावे लागते. हा हुशार पक्षी माणसासाठी उत्तम सोबती आहे.

कोकाटो समूहाने राहणारा पक्षी :-

काही प्रजाती या एकत्र झाडावर मोठे घरटे करून राहतात तसेच एकत्र थव्याने खाद्य शोधण्यासाठी जातात. अन्नाच्या उपलब्धतेनुसार या थव्यांमधील पक्ष्यांची संख्या कमी जास्त असते. दुष्काळ ( Drought ) किंवा अन्य प्रतिकूल परिस्थितीत या थव्यांमधील पक्ष्यांची संख्या खूप मोठी म्हणजे दहा हजारांहून जास्त असते.

कोकाटो पक्षी कुठे आढळून येतात?

आशियामध्ये हे पॅसिफिक महासागराच्या जवळ आढळून येतात. की या पक्षाच्या बहुतांश प्रजाति या ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतात तसेच काही प्रजाती या फिलिपिन्स, न्यू गोनिया, इंडोनेशिया व इतर काही बेटांवर आढळून येतात.

कोकाटो पक्षाचे स्थलांतर ( cockatoo migration )

कोकाटो हा पक्षी स्थलांतर करीत नाही. हा वर्षाचे बाराही महिने एकाच प्रदेशात राहतो.

कोकाटोचे रंग :-

हे साधारणतः काळा व पांढरा या रंगांमध्ये आढळून येतात. या पक्ष्यांमध्ये इतर जातीच्या पोपटासारखे वेगवेगळे रंग आढळून येत नाहीत. अगदी मोजक्याच प्रजातींमध्ये लाल पिवळा निळा हिरवा असे गडद रंग दिसून येतात.

आवाज व संभाषण ( Cockatoo bird sound ) :-

हे पक्षी मोठा व कर्कश आवाजात एकमेकांशी संभाषण करतात. ते त्यांच्या कर्कश आवाजातून त्यांचा मूड दर्शवतात, तसेच इतरांशी संबंध निर्माण करतात.

भक्षक जवळ आल्यास व काही धोका असल्यास ते आपल्या आवाजातूनच थव्यातील इतर पक्षांना सावध करतात.

त्याच्या डोक्यावरील पिसांचा तुरा सुद्धा महत्वाचे संकेत दर्शवत असतो. जेव्हा ते निश्चिंत असतात तेव्हा त्याच्या डोक्यावर पिसांचा तुरा खालच्या दिशेला झुकलेला असतो. व तो जेव्हा उत्साही असतो तेव्हा आपल्या पिसांचा तुरा वर उंचावतो.

कोकाटोचा जोडीदार :-

कोकाटे हा पक्षी एकाच जोडीदाराबरोबरच आपल्या आयुष्यातील बरेच वर्ष राहतो. त्या जोडप्याचे एकमेकांशी भावनिक संबंध निर्माण होतात. जर त्यातील एखादा जोडीदार मेला किंवा सोडून गेला तर त्या जोडप्यातील दुसरा पक्षी हा मानसिकदृष्ट्या दुखावला जातो.

कोकाटे ची शिकार :-

या पक्ष्यांचे थवे फळबागांवर किंवा शेतातील पिकावर हल्ला चढवतात म्हणजेच तेथील पिकांची नासधूस करतात. त्यामुळे माणसे पिकांचा बचाव व्हावा म्हणून त्यांना मारतात, बंदिस्त करतात किंवा पळवून लावतात. तसेच घार, घुबड, साप, रानमांजर तसेच इतर प्राणी हे त्यांची शिकार करतात. त्यामुळे काही प्रजाती हृया नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. चांगली बाब म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येणाऱ्या कोकाटोच्या प्रजाती ह्या अजूनही शाबूत आहेत.

Read also:-

Share on:

Leave a Comment