Goose पक्षी मराठीत माहिती

मित्रांनो तुम्ही, Goose bird information in marathi या विषयाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का? तुम्हाला goose या पक्षाच्या प्रजाती, प्रजनन, खाद्य, स्थलांतर याबाबत बद्दल जाणून घ्यायचे असेल, तर या लेखात आम्ही या पक्षाबद्दल भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. Goose या पक्ष्याला मराठीमध्ये कलहंस असे म्हणतात.

Goose bird information in marathi
goose-bird-information-in-marathi

Goose पक्षी मराठीत माहिती Goose bird information in marathi

कलहंस ( Goose bird ) हा गोड्या पाण्याच्या सान्निध्यात राहणारा पक्षी आहे. तो साधारणत हा नद्या, सरोवरे, तलाव अशा ठिकाणी आढळून येतो. हा साधारणतः आकाराने मोठा असतो व त्याची मान लांब असते. तसेच याचे वैशिष्ट्य म्हणजे हा मोठ्या आवाजात ओरडतो.

हे पक्षी साधारणतः 12 ते 26 वर्ष इतका काळ जगतात. कलहंस हा पक्षी समूहात राहणारा व समूहाने स्थलांतर करणारा पक्षी आहे. चिडल्यावर हे पक्षी आपली मान हलवतात व मानेची पिसे उभी करतात.

कलहंस हे जलाशयाच्या सान्निध्यात राहत असल्याने ते उत्तम रित्या पोहू शकतात. तसेच हा स्थलांतर ( migration bird ) करणारा पक्षी असल्यामुळे उत्तमरीत्या उडू शकतो. कलहंस हा बदक व हंसापेक्षा पेक्षा उत्तम रित्या चालू शकतात.

कलहंस पक्षी कसे दिसतात ?

या पक्षाला ओळखणे अगदी सोपे असते. या पक्षाचे शरीर मोठ्या आकाराचे असते व मान लांब तसेच चोच मोठी असते.

मुळात कलहंसाचे रंगानुसार वर्गीकरण हे त्याच्या मानेच्या व डोक्याच्या रंगावरून केले जाते. या पक्षाची मान व डोके, करड्या, राखाडी, काळ्या व पांढऱ्या रंगाचे असतात.
या पक्षाचे वजन दीड किलो ते आठ किलो इतके असते. हा पक्षी दिसायला हंसासारखाच दिसत असला तरी त्याच्या पिसांचा रंग काळा असतो व त्यावर राखाडी ठिपके असतात तसेच त्याची चोच केसरी रंगाची असते.

तसेच हे पक्षी बदका पेक्षा मोठ्या आकाराचे असतात. नर कलहंस हा मादीपेक्षा आकाराने थोडा मोठा असतो. हा पक्षी मोठ्या आवाजात ओरडतो.

या पक्षाच्या पायांच्या बोटे कातडीने जोडली गेली असतात. त्याचा उपयोग त्यांना पाण्यामध्ये पाहण्यासाठी होतो. त्यांच्या पंखांचा फैलाव 4.2 ते 6.1 फूट इतका असतो. या पक्षाची लांबी 60 सेंटिमीटर ते 120 सेंटिमीटर इतकी असते

कलहंस पक्षीचा इतिहास Goose bird history :-

या पक्षाची उत्क्रांती ही लाखो वर्षांपूर्वी झाली असून ते गोडे पाणी, नदी, तलाव व इतर प्रवाहाच्या ठिकाणी दिसून येतात.

उत्खननात सापडलेल्या जीवाश्मावरून हा पक्षी एक कोटी वर्षांपासून अस्तित्वात असावा असे सांगितले जाते.

इजिप्त,रोम व ग्रीस या देशांमध्ये कलहंस पाळणे हा पूर्वीपासून महत्त्वाचा व्यवसाय ( Business ) होता. पूर्वीपासूनच काही ठिकाणी कलहंसाच्या मांसाचा उपयोग मांसाहारी लोक आपल्या अन्नामध्ये करतात.

कलहंस पक्षांची प्रजाती Goose bird species :-

या पक्षाच्या एकूण २०४ प्रजाती आहेत. व त्यातील १६ ते १७ प्रजाती या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या पक्षांमध्ये आढळून येणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रजाती ( Goose bird species ) पुढीलप्रमाणे आहेत :-

१) ब्रान्ट गुस
२) कॅकलींग गुस
३) कॅनडा गुस
४) ग्रेटर व्हाईट फ्रंटेड गुस
५) ग्रेलॅग गुस
६) लेसर व्हाईट फ्रंटेड गुस
७) पिंक फुटेड गुस
८) रेड ब्रेस्टेड गुस
९) राॅस गुस
१०) स्नो गुस
११) बिन गुस

यामध्ये कॅनडा गीस ही या पक्षांची सर्वात मोठी प्रजात आहे. याचे वजन साधारण 14 पौंड इतके असते. व लांबी 43 इंच असते. ही लांबी म्हणजे चोच ते शेपूट यामधील अंतर असते.

कलहंस पक्षी काय खातात ?

कलहंस हा प्रामुख्याने गवत, बिया, धान्य, बेरी व जलपर्णी वनस्पती ( aquatic plants ) याचा उपयोग खाद्य म्हणून करतात. हे पक्षी कीटक व छोटे मासे यांचाही खाद्य म्हणून उपयोग करतात. गवत हे कलहंसांचे आवडते खाद्य आहे.

कलहंस पक्षाचे घरटे :-

कलहंस आपले घरटे पाने, गवत, काड्या या पासून बनवतात. हे पक्षी, नद्या, सरोवरे, तलावाजल राहतात.

कलहंस या पक्षामध्ये प्रजनन कसे घडून येते ?

Goose bird information in marathi
goose-bird-information-in-marathi

कलहंस हा पक्षी एकाच नर किंवा मादी बरोबर आयुष्यभर राहतात व हे जोडपे एका वेळेला पांढऱ्या रंगाची सर्वसाधारणतः सहा इतकी अंडी देतात. हे पक्षी जास्तीत जास्त दहा इतकी अंडी देऊ शकतात.

ह्या पक्ष्यांमध्ये साधारणपणे वसंत ऋतूत प्रजनन घडून येते. जर त्या जोडप्यातील ( Couple ) एखादी पक्षी मेले तर त्याच वर्षात त्याचा जोडीदार दुसऱ्या पक्षाशी संबंध निर्माण करतो व प्रजनन घडवून आणतो. कलहंसामध्ये अंडज पद्धतीने प्रजनन घडून येते.

अंडी दिल्यानंतर त्यांना उबवण्याचे काम हे मादी कलहंस करते. व त्या अंड्यांचे संरक्षण करण्याचे काम हे नर कलहंस करतो.
कलहंसाला अंड्यातून बाहेर येण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो.

जन्माला आल्यानंतर हे पक्षी स्वतःचा बचाव करणे शिकतात व शक्यतो काही महिने त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली राहतात.
दोन महिन्यात या पिलांच्या पंखाची पूर्ण वाढ होऊन ते आकाशात उडू शकतात. नर कलहंस आपल्या पिल्लांचा धोक्यापासून बचाव करतो.

कलहंसांचे स्थलांतर Goose migration :-

कलहंसांनी स्थलांतर केले की हिवाळा आला असे समजले जाते. त्यांच्या वजनामुळे हे पक्षी स्थलांतर करणार्या इतर पक्षांपेक्षा सर्वात उशिरा पोहोचतात. बर्फाळ प्रदेशात हिवाळ्याच्या काळात थंडी वाढू लागली की हे पक्षी ऊष्म वातावरणाच्या प्रदेशात स्थलांतर करतात.

Goose migration
Goose-migration

स्थलांतर करताना हे पक्षी V या इंग्रजी अक्षराच्या आकारात उडतात. स्थलांतर वेळी कमीत कमी ऊर्जेमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा हा यामागचा उद्देश असतो. इथे सर्वात पुढच्या पक्ष्याला उडण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. व त्याच्या मागील पक्षी हे सहज व कमी ऊर्जेचा वापर करून उडू शकतात. याच कारणामुळे उडताना हे पक्षी एकमेकांच्या जागा बदलतात. स्थलांतरवेळी हे पक्षी ३००० मैल इतक्या दूरवर प्रवास करतात

हे पक्षी जास्तीत जास्त 55 महिला प्रति तास इतक्या वेगाने उडू शकतात. जर एखादा कलहंस उडताना जखमी झाला व तो खाली पडू लागला तर थव्यातील आणखी दोन कलहंस त्याच्यासोबत खाली येतात व जोपर्यंत त्याला उडता येत नाही तोपर्यंत त्याच्या सोबत राहतात.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

Leave a Comment