झाडे बोलू लागली तर मराठी निबंध If trees could speak essay in Marathi

मित्रांनो तुम्ही If trees could speak essay in Marathi या काल्पनिक विषयावर निबंध ( Imaginary essay ) शोधत आहात का ? तर आम्ही या लेखात या विषयावर सोप्या व सुलभ भाषेत माहिती उपलब्ध केली आहे.

माणसाच्या आधिपत्याखाली झाडांवर तसेच संपूर्ण सृष्टीवर बरेच अत्याचार होत आहेत, पण ते बोलून दाखवणे किंवा विरोध करणे हे त्यांच्यासाठी शक्य नाही. म्हणूनच या काल्पनिक निबंधामार्फत आम्ही या झाडांची व्यथा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

If trees could speak essay in Marathi

If trees could speak essay in Marathi जर झाडे बोलू लागली तर निबंध

आमच्या गावातल्या शाळेच्या मागे एक मोठे जंगल आहे उन्हाळ्याची सुट्टी पडली की मी व माझे मित्र दररोज रानात खेळायला व भटकायला जायचो. कैऱ्या, करवंद, जांभूळ इत्यादी रानमेवा गोळा करायचो.

अशाच एका दिवशी जंगलात गेलो असताना भर दुपारी उन्हे वाढलेली असल्यामुळे आम्ही एका मोठ्या जीर्ण झालेल्या वडाखाली ( banyan tree ) थांबलो व खेळू लागलो पण मी मात्र त्या झाडाच्या पारावर जाऊन बसलो होतो तर अचानक आम्हाला कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला पण तो आवाज आमच्यापैकी कोणाचाच नव्हता.

आम्ही कोण आहे असे विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यावर, “मी वटवृक्ष बोलतोय.” असा आवाज आला हे ऐकल्यावर मात्र आम्ही दचकलो झाड बोलेल यावर आमचा कुणाचाच विश्वास बसत नव्हता पण त्यानंतर तो परत हसत म्हणाला, “बाळांनो मी खरंच वटवृक्ष बोलतोय”. आता मात्र आम्ही आश्चर्यचकित झालो व आम्ही त्याला त्याच्या हसण्याचं कारण विचारले.

त्यावर तो म्हणाला, “अरे मुलांनो मी बरीच वर्षे येथे एकटाच राहतो आहे तसेच एकटेपणामुळे मी खूपच कंटाळलो होतो. बऱ्याच वर्षानंतर तुम्ही माझ्या सानिध्यात आलात, माझ्यावर चढून बसलात, माझ्या पारंब्यासोबत खेळू लागतात त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला म्हणून मी हसलो पण याआधी मात्र मी कधीच एकटा नव्हतो खरंतर मी दीडशे वर्षांपासून इथे राहतो आहे त्यावेळी मात्र माझ्या आजूबाजूला अगदी दाटीवाटीने वेगवेगळ्या फळांची फुलांची झाडे होती.

सर्वत्र हिरवळ होती. तसेच अन्नाची उपलब्ध असल्याने वेगवेगळे पक्षी माझ्या फांद्यांवर घरटी करून राहायची. या खालच्या ढोलीमध्ये पोपटाचे एक जोडपे राहायचे. तेव्हाचा काळ फारच सुखावणारा होता. तेव्हा मला कधीच एकटेपणा जाणवला नाही.

आम्ही सर्वांनी अनेक पावसाळे एकत्र पाहिले, एकत्रच अनेक वादळाचा सामना केला व त्यातूनही तग धरून उभे राहिलो. तेव्हा सकाळ सुद्धा चिमण्यांच्या चिवचिवाटाने भरून जायची व रात्र आकाशातील चांदण्याच्या मंद प्रकाशात निघून जायची.

ससे, हरीण, खारुताई असे अनेक प्राणी येथेच राहायचे आमची फळे व जमिनीतील कंदमुळे खाऊन जगायचे पण एके दिवशी माणसांची नजर या जंगलातील झाडांवर पडली व त्यांनी आपल्या स्वार्थासाठी इथल्या साग, शिसव, चंदन अशा झाडांची कत्तल ( Tree cutting ) करण्यास सुरूवात केली ते रोज यायचे एक-एक झाड पाडून घेऊन जायचे. अनेक पावसाळे एकत्र असलेल्या या झाडांना कोलमडून पडताना पाहताना हृदय पिळवटून निघत होते.

त्यानंतरची प्रत्येक रात्र या भीतीतच जायची, कदाचित उद्या आपल्यावरही हीच वेळ येईल. एक-एक करत जवळजवळ सर्व रान कोलमडून पडत होते. त्यावरील पक्षी व त्यांची पिल्ले या सर्वांनाच त्रास सहन करावा लागत होता. इथल्या पक्षांनी व प्राण्यांनी मात्र आपले स्थलांतर केले पण आम्ही मात्र कुठेही जाऊ शकत नव्हतो.

पण एक दिवस या रानाला देवराई ची मान्यता मिळाली व आमची होणारी कत्तल थांबली पण तोपर्यंत मात्र अनेक झाडं नष्ट झाली होती. त्यानंतर अन्नाची उपलब्धता नसल्याने कोणतेही पक्षी किंवा प्राणी इथल्या सानिध्यात आले नाही व त्यामुळे इथल्या वातावरणात भकासपणा जाणवू लागला तो आज पर्यंत.

माणसांनी मात्र आमचा नेहमीच फायदा घेतला. वेळेला आम्ही त्यांना अन्न दिले, चुलीसाठी सरपण व घरासाठी लाकडे दिली, इथल्या काही झाडांनी अनेक औषधे दिली, चंदनाने त्याचा सुगंध दिला. पण माणसाने मात्र नेहमीच त्यांच्या स्वार्थाचा विचार केला. पण या सगळ्यात त्याला हे कळलेच नाही की आम्ही सुद्धा या जीवसृष्टीचा ( Lifecycle ) महत्त्वाचा भाग आहोत आणि जर आमचे अस्तित्व संपले तर ही संपूर्ण जीवसृष्टी कोलमडून पडेल.

आमच्या झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात व मातीची होणारी धूप थांबवतात. तसेच आम्ही हवेतील अनावश्यक कार्बन-डाय-ऑक्साइडचे शोषण करून त्याचे रूपांतर ऑक्सिजन मध्ये करतो व हवेचे प्रदूषण ( Air pollution ) रोखतो. आम्ही वातावरणातील उष्णता शोषून घेतो व पृथ्वीवर थंड वातावरण ( Climate ) तयार करतो त्यामुळेच ढगांचे संघनन होऊन पाऊस पडतो.

आता मात्र पृथ्वीवर झाडांची संख्या कमी झाली आणि पाऊसही कमी होऊ लागला. तसेच जंगलतोडीमुळे ( Deforestation ) इथल्या जीवसृष्टीचा म्हणजेच इथल्या पक्ष्यांचा व प्राण्यांच्या प्रजातीचा ऱ्हास होत चालला आहे. माणसाच्या शहरीकरणाच्या व नागरीकरणाच्या स्वार्थामुळे जंगलांचा मात्र नाहक बळी चालला आहे.

रोपापासून वृक्ष तयार व्हायला अनेक वर्षे लागतात, पण माणसं मात्र त्या झाडाची काही क्षणात कत्तल करतात. म्हणूनच बाळांनो पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व टिकवायचे असेल ना तर वृक्षारोपण ( Tree plantation ) व त्यांचे संगोपन ही काळाची गरज आहे”, असे म्हणून तो शांत झाला.

त्या जीर्ण झालेल्या वृक्षाने आम्हाला सृष्टीच्या पुढील भयानक परिस्थितीची जाणीव करून दिली होती. त्याच्या व्यथेमुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो होतो पण तिथून निघताना मात्र आम्ही वृक्षारोपण करण्याचा व त्याचे महत्त्व इतरांना पटवून देण्याचा संकल्प केला.

Read also:-

Share on:

Leave a Comment