10 lines on tree in Marathi | Essay on tree in Marathi

मित्रांनो तुम्ही 10 lines on tree in Marathi शोधत आहात का ? तर तुम्हाला या लेखात झाडांविषयी पुरेपूर माहिती मिळेल व हा लेख तुम्हाला नक्की आवडेल. झाडे ही आपल्या आयुष्याचा व पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहेत. इतर सजीव हे अन्नासाठी व इतर गोष्टींसाठी झाडांवर अवलंबून असतात. जर झाडांचे अस्तित्व नसेल तर संपूर्ण जीवसृष्टी कोलमडून पडेल. या लेखात आम्ही 10 lines on tree in Marathi निबंधांचे ३ सेट मध्ये वर्गीकरण केले आहे.

10 lines on tree in Marathi

10 lines on tree in Marathi झाडांवर १० ओळी

10 lines on tree in Marathi (सेट १)

१. झाडे ही पृथ्वीवरील अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. झाडे ही कल्पवृक्षासारखी सतत मदत करीत असतात.

२. माणसे, प्राणी, पक्षी हे अन्नासाठी पूर्णपणे झाडांवर अवलंबून असतात. झाड हे स्वयंपोषी म्हणजेच स्वतःचे अन्न स्वतः तयार करते.

३. मानवी कारणांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यात यांचा मोलाचा वाटा असतो.

४. अन्नसाखळीमध्ये ( Food chain ) झाडांचे स्थान पहिले ( उत्पादक ) असते.

५. जर एखाद्या विशिष्ट झाडांच्या प्रजातीचा नाश झाला तर त्यावर असणारी संपूर्ण अन्नसाखळी कोलमडून जाते.

६. झाडे ही शेकडो वर्ष जगतात व आयुष्यभर इतरांना मदत करतात.

७. झाडांना आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. मधुमेह, कर्करोग ( Cancer ), क्षयरोग ,कुष्ठरोग असे अनेक दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक उपचार केले जातात.

८. झाडांच्या विविध अवयवांचा उपयोग औषधे, सौंदर्यप्रसाधने, सुगंधी उत्पादने यासाठी होतो. तसेच त्यापासून मिळणारे लाकूड घरे, सरपण व औषधांसाठी वापरले जाते.

९. झाडे ही ध्वनी प्रदूषण ( Sound pollution ) रोखण्यास मदत करतात.

१०. म्हणूनच जीवसृष्टीचे अस्तित्व हे झाडांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांची जपणूक व संवर्धन करणे गरजेचे आहे.

10 lines on tree in Marathi (सेट २)

१. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे” या तुकोबांच्या अभंगातील काव्यपंक्ती वृक्ष वेली यांचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून देताना, संत तुकारामांनी त्यांची तुलना नातेवाईकांशी केली आहे. झाड हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहे.

२. जगभरात झाडांच्या लाखो प्रजाती असून प्रत्येक झाडाची वेगळी वैशिष्ट्ये व गुणधर्म आहेत.

३. बहुतांश प्राणी, पक्षी शाकाहारी असून आपल्या उदरनिर्वाहासाठी झाडांवर अवलंबून असतात.

४. तसेच प्राण्यांचे श्वासाद्वारे सोडला जाणारा कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू झाडे शोषून घेतात व त्याचे रूपांतर पुन्हा ऑक्सिजन मध्ये करून पर्यावरणाचा समतोल साधतात.

५. वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडांच्या अवयवाचा वापर विविध आजार बरे करण्यासाठी केला जातो. डोंगरावर तसेच माळरानावर झाडांची लागवड केल्यास मातीची धूप थांबण्यास मदत होते.

६. झाडाच्या लाकडाचा उपयोग घराच्या बांधकामासाठी तसेच सरपण म्हणूनही केला जातो.

७. झाडे पृथ्वी भोवती आच्छादन तयार करतात व सूर्याच्या अतिनील किरणांपासून ( Ultraviolet radiation ) बचाव करतात. सध्या पृथ्वीवरील जमिनीचा 31 टक्के भाग हा जंगलाने व्यापलेला आहे.

८. सध्या शहरांच्या विकासासाठी तसेच इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. यामुळे झाडांच्या विविध प्रजाती व त्यावर अवलंबून असलेल्या सजीवांच्या प्रजातीचा नाश होत चालला आहे.

९. दरवर्षी 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन ( World Environment Day ) साजरा केला जातो तसेच 21 मार्च हा जागतिक वृक्षदिन ( International day of forest ) तसेच वनदिन म्हणून साजरा केला जातो यामागचा मूळ उद्देश पर्यावरणाची व त्यातील घटकांचे महत्त्व ओळखून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे हा आहे.

१०. तसेच 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक वृक्षारोपण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकाने किमान एक झाड लावणे व त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. असे झाले तर वैश्विक तापमान वाढ ( Global warming ) व त्याचे परिणाम यापासून आपण आपल्या सृष्टीला वाचवू शकतो.

10 lines on tree in Marathi (सेट ३)

१. वृक्ष हा पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहे. मानवी अस्तित्व आणि पर्यावरणाचे अस्तित्व या दोन्ही गोष्टींसाठी झाडे आवश्यक आहेत.

२. आपल्या जीवनात वृक्षांची किंमत, महत्त्व आणि त्यांचा उपयोग हा देवाच्या आशीर्वादापेक्षा कमी नाही.

३. झाडे हवेचे शुद्धीकरण करतात म्हणजेच ते धोकादायक कार्बन डाय ऑक्साईडला स्वच्छ ऑक्सिजनमध्ये रूपांतरित करतात म्हणून आपण शुद्ध हवेचा श्वास घेऊ शकतो म्हणून झाडं माणसाचे सर्वोत्तम साथीदार आहेत.

४. झाडे पाणी आणि माती स्वच्छ करण्यात देखील मदत करतात, जे पृथ्वीला स्वच्छ आणि सुंदर स्थान बनवते.

५. झाडे आपल्याला ऑक्सिजन तसेच अन्न देतात जे जीवनातील सर्वात आवश्यक घटक आहेत. सुरुवातीच्या काळात थंडी व पावसापासून बचाव करण्यासाठी झाडांच्या पानांचा वापर केला जायचा.

६. जेव्हा ग्रीनहाऊस वायू वातावरणात सोडले जातात तेव्हा ते सूर्याच्या उष्णतेला अडकविणारा एक थर निर्माण करतात. त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. परिणामी, जागतिक तापमानात वाढ होते. म्हणूनच लागवड केल्या जाणाऱ्या झाडांची संख्या वाढविल्यास ते हवा स्वच्छ करण्यास आणि जागतिक तापमानवाढ ( Global warming ) कमी करण्यास मदत करते.

७. झाडे आपल्या पर्यावरणातील महत्त्वपूर्ण भाग आहेत जे वातावरणात संतुलन राखण्यास मदत करतात. वातावरणातील एकही घटक नष्ट झाल्यास, पूर्ण वातावरण विस्कळीत होते आणि त्याचा परिणाम वातावरणातील सर्व सजीवांवर होतो.

८. वृक्ष औषधी क्षेत्रात देखील महत्त्वपूर्ण आहेत. उपचारात्मक गुणधर्म असलेली अनेक झाडे आणि वनस्पती आहेत. वृक्षाच्या अर्कापासून बनविली बरीच औषधे बाजारात उपलब्ध आहेत.

९. वृक्ष आपल्याला भरपूर संसाधने देते जे आपल्याला जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत जसे की स्वच्छ हवा, खाण्यासाठी फले व निवारा साठी लागणारे लाकूड देते.

१०. माणसाप्रमाणे पक्षी व प्राणी देखील वृक्षांवर अन्नासाठी व निवार्‍यासाठी अवलंबून असतात.

10 lines on tree in Marathi (सेट ४)

१. माणसं खूप प्रमाणात झाडे तोडत आहेत त्यामुळे पृथ्वीवरील झाडांची संख्या खूप प्रमाण कमी होत आहे. जर अशीच वृक्षतोड सुरू राहिली होती तर वातावरणातील हवा प्रदूषित होईल त्यामुळे दूषित हवा श्वसनावाटे शरीरात घुसेल ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतील.

२. आपण वृक्षांचे संरक्षण करत नाही आहोत त्यामुळे जगभर ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण‌ अशा अनेक, समस्या वाढत चालले.

३. वृक्ष हे पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचे घटक आहे त्याच्या शिवाय पर्यावरण निर्जीव व ओसाड होऊन जाईल.

४. अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी पूर्णपणे झाडांवर अवलंबून असतात. ते आपले पूर्ण आयुष्य तेथेच झाडांची फळे खातात व तिथेच आपले घर बनवून राहतात. जर अशी वृक्षतोड चालू राहिली तर प्राणी, विविध प्रकारचे कीटक व पक्ष्यांचे आधार निघून जाते म्हणूनच वृक्षतोड चालूच राहिली तर परिणामी प्राणी व पक्षी नष्ट होऊन जातील.

५. रस्त्यावरून चालणाऱ्या अनेक वाहने त्याचप्रमाणे कारखान्यातील धुरामुळे दिवसेंदिवस हवा खूप प्रमाणात प्रदूषित होत आहे. परंतु वृक्ष त्या प्रदूषित हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून हवेत स्वच्छ ऑक्सिजन सोडतात.

६. स्थितांबर मध्ये असलेल्या ओझोनचा थर सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे शोषून घेतो. परंतु काही भागात कमी झालेल्या ओझोन थरामुळे ( Ozone depletion ) त्या भागातून अतिनील किरणे ही थेट पृथ्वीवर पोहोचतात. जी खूप धोकादायक आहेत म्हणजेच त्यामुळे त्वचेचा कर्करोगास उद्भवतो. वृक्ष ही अतिनील किरणे 50 टक्क्यांनी कमी करण्यास मदत करते आणि माणसांना या धोकादायक किरणांपासून वाचवते.

७. वृक्ष पर्यावरणात आणि सजीवांसाठी मोठी भूमिका बजावते. अनेक ग्रामीण भागात झाडे हे लाकूड मिळण्यासाठी लावली जातात, त्या झाडांच्या लाकडाचा, फांद्याचा उपयोग इंधनासाठी व त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो.

८. झाडांचा वापर कागद बनवण्यासाठी देखील केला जातो. एक टन कार्यालयीन कागद बनविण्यासाठी 24 झाडांची कत्तल केली जाते. परंतु तीच झाडे वाढविण्यासाठी दहा-बारा वर्षाचा कालावधी लागतो. म्हणूनच कागदाचा वापर टाळणे किंवा कागदाचा वापर कमी करून आपण वृक्षतोड कमी‌ करू शकतो.

९. जमिनीवर मातीचा एक सेंटीमीटर इतका थर तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. हा थर पाऊस किंवा वारा यामुळे वाहून जातो शिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो व मातीची धूप होते.

१०. झाडांची मुळे मातीचे कण घट्ट धरून ठेवतात व त्यामुळे पावसाच्या पाण्याचा होणारा आघात शोषून घेतला जातो व वाहून जाणारी जमिनीची धूप टाळली जाते.

Read also हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment