ताज महालवर 10 ओळी

10 lines on Taj mahal in Marathi मित्रहो आपण आज या लेखात ताज महालवर 10 ओळी पाहणार आहोत. ताजमहाल हे भारतामध्ये स्थित असलेले जगप्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे आणि शहाजहानने त्याची पत्नी मुमताज हिच्यासाठी ताजमहाल बांधले होते

10 lines on taj mahal in Marathi

ताज महालवर 10 ओळी 10 lines on Taj mahal in Marathi (सेट १)

१) ताजमहाल हे भारतामध्ये स्थित असलेले जगप्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे.

२) ताजमहाल हे आग्रा येथील यमुना नदी जवळ स्थित आहे.

३) या ऐतिहासिक स्मारकाचे बांधकाम सतराव्या शतकात मुघल सम्राट शहाजहान याच्या कारकिर्दीत केले गेले.

४) शहाजहानने त्याची पत्नी मुमताज हिच्यासाठी ताजमहाल बांधले होते.

५) ताजमहालचे संपूर्ण बांधकाम हे पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये कोरून केले गेले आहे.

६) हे बांधकाम एकूण वीस हजार कारागिरांनी पूर्ण केले.

ताजमहालच्या चारही बाजूंना उंच मिनार बांधली आहेत व हे याची एकूण शोभा वाढवतात.

७) यातील प्रत्येक मिनार हे 40 मीटर उंची आहे.

८) जगभरातील अनेक पर्यटक वर्षभर या ऐतिहासिक वास्तूला भेट देतात.

९) ताजमहाल हे जगातील एकूण सात आश्चर्यांपैकी एक मानले जाते.

१०) या वास्तूला शहाजहान व मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

ताज महालवर 10 ओळी (सेट २)

१) ताजमहाल हे भारतामधील अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तुंपैकी एक आहे.

२) ही वास्तू जगातील एकूण सात आश्चर्यांमध्ये गणली जाते.

३) या वास्तूचे बांधकाम 17 व्या शतकात पूर्ण केले गेले.

४) मोगल सम्राट शहाजहान याने त्याची पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ ही वास्तू उभी केली होती.

५) ताजमहाल चे बांधकाम वीस हजार कारागिरांनी एकूण बावीस वर्षात पूर्ण केले.

६) ताजमहाल हा सकाळी फिकट गुलाबी रंगाचा भासतो तर संध्याकाळी सोनेरी रंग चढल्यासारखा दिसतो.

७) आग्रा किल्ल्यापासून ताजमहाल हे अडीच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

८) ताजमहल च्या आतील भिंतीवर इस्लामिक कुराणांमधील शिलालेख कोरलेले आहेत.

९) ताजमहालची एकूण उंची 73 मीटर इतकी आहे.

१०) ही वास्तू 17 हेक्टर जमिनीवर बांधली गेली आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा:

Share on:

Leave a Comment