ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार

Apj abdul kalam thoughts in marathi भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे अत्यंत दृढ निश्चय व प्रबळ इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्व होते त्यांनी त्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी अपार कष्ट घेतले अपयश पदरी पडल्यावर कोलमडून जायचे नाही व यश मिळाल्या वर हुरळून जायचे नाही असे त्यांचे ठाम मत होते त्यांच्या मते यश हे ठिकाण असून तो एक प्रवास आहे म्हणूनच ते स्वतः आयुष्यभर ज्ञानार्जन करीत राहिले.

Apj abdul kalam thoughts in marathi
apj-abdul-kalam-thoughts-in-marathi

ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार Apj abdul kalam thoughts in marathi

त्यांच्या मते अपयशाला न डगमगता प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणारा व्यक्ती नेहमी यशस्वी होतो. अशा या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचे काही विचार आम्ही आमच्या या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

१) तुम्ही झोपेत बघता त्यांना स्वप्न म्हणता येत नाही जी स्वप्ने आपल्याला झोपू देत नाहीत त्यांना खरी स्वप्न म्हणतात.

२) तुम्ही कधीही हरु नका व तुमच्या संकटांना तुम्हाला हरवू देऊ नका.

३) तुम्हाला जर सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे ज्वलंत राहायला व झीजायला शिका.

४) आपल्यापैकी प्रत्येकाकडे सारख्या दर्जाची हुशारी नसली तरी ती विकसित करण्याची संधी प्रत्येकाकडे असते.
५) माणसाला यशाचा खरा आनंद घेण्यासाठी संकटांची गरज असते.

६) तुमच्या पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण त्यानंतर जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय हा फक्त तुमच्या नशिबामुळे मिळाला होता हे बोलण्यासाठी अनेक लोक आतुर असतात.

७) आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला आजचा दिवस खर्ची घालविणे गरजेचे असते.

८) राष्ट्राचे हुशार मेंदू हे वर्गातील मागच्या बाकावर घडत असतात.

९) उत्कृष्टपणा हा अपघातातून मिळत नाही ती एक मोठी प्रक्रिया आहे

१०) यशस्वी व्यक्ती ते नसतात जे कधीही अपयशी होत नाही, पण यशस्वी ते होतात जे कधीच थांबत नाहीत.

११) शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत : अपयशाचं दुःख हृदयापर्यंत पोहोचवु नका व यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ देऊ नका.

१२) ऐशोआराम व असत्य टिकवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात तर सत्य व साधेपणा सहजच टिकतो.

१३) स्वप्न, स्वप्न, स्वप्न, स्वप्नाचे रूपांतर विचारत होते व विचारांचे रुपांतर कृतीत होते.

१४)एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती एकनिष्ठ असणे गरजेचे असते.

१५)जर तुम्ही अपयशी ठरलात तर कोलमडून जाऊ नका कारण अपयश ही शिकण्याची पहिली पायरी असते.

१६) सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगवेगळा दृष्टिकोन ठेवून विचार करणे.

१७) माझा निश्चय दृढ असेल तर कोणताही अपयश मला मागे टाकणार नाही.

१८) तुम्ही तुमच्या कामा प्रती एकनिष्ठ राहिलात तर तुम्हाला कोणापुढेही झुकावे लागणार नाही, पण जर तुमची तुमच्या कामाप्रती असलेली निष्ठा ढळली तर तुम्हाला प्रत्येकापुढे झुकावे लागेल.

१९) भूतकाळाच्या बंदीवासात अडकून राहू नका कारण ती फक्त एक शिकवण होती तुमच्या आयुष्याची व्याख्यान नव्हती.

२०)रिकामा खिसा तुम्हाला असंख्य गोष्टी शिकवतो पण भरलेला खिसा तुम्हाला असंख्य प्रकारे बिघडवतो.

२१) तुमचे विचार ही तुमची खरी संपत्ती आहे मग त्यासाठी तुम्ही काय उपभोगले किंवा सुचले हे गरजेचे नसते.

२२)जेव्हा आपल्या सहीचे रूपांतर स्वाक्षरी मध्ये होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होतो.

२३) छोटे ध्येय हा गुन्हा आहे म्हणून ध्येय नेहमी मोठे ठेवा.

२४) विज्ञान ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे म्हणून तिचा विकृतीसाठी वापर करू नका.

२५) तुम्ही स्वतंत्र नसाल तर कोणीही तुम्हाला आदर देणार नाही.

२६) काव्याची निर्मिती ही अति आनंदातून किंवा खोल दुःखातून होते

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

Leave a Comment