[मराठी] My railway journey essay in Marathi माझा रेल्वे प्रवास निबंध

My railway journey essay in Marathi मित्रहो, आज मी तुम्हाला या लेखात माझा रेल्वे मधील प्रवासा बद्दल निबंध दिला आहे. माझा रेल्वे मधील प्रवास कसा छान गेला या बद्दल मी या लेखात मांडल आहे.

My railway journey essay in Marathi

My railway journey essay in Marathi माझा रेल्वे प्रवास मराठीत निबंध

My railway journey essay in Marathi

रेल्वे ने केला जाणारा प्रवास हा अतिशय जलद व प्रतेक्काला परवडणारा असा असतो. हि अत्यंत उपयोगी वाहतूक सेवा आहे. आपण रेल्वे ने खूप दूरवरचा प्रवास अनेक गाड्या न बदलता एकाच रेल्वे ने करू शकतो.

अशाच रेल्वेचा मी देखील उपयोग करतो. काही महिन्या अगोदर मी शाळेतील सुट्टीला सुरवात होत असताना म्हणजेच एप्रिल महिन्याचा अखेरीस मामाचा गावाला रत्नागिरी मध्ये गेलो होतो. सुट्टीची सुरवात होत असल्यामुळे मला माहित होते कि स्टेशन वर तिकीट काढण्यासाठी खूप रांग असेल म्हणून रेल्वेच्या वेळापत्रकानुसार सोमवारी सकाळी १० वाजताची असणाऱ्या रेल्वेचे टीकेट पपांचा मोबाइल चा मदतीने ऑनलाइन बुक केले.

मी सोमवारी घरून टॅक्सी करून स्टेशन ला पोहचलो. स्टेशन चा ठिकाणी लोकांची भरपूर प्रमाणात येजा चालू होती. मी त्या गर्दीतुन पुढे पुढे होत तिकीट मध्ये सांगितलेल्या प्लॅटफॉर्म वर जाऊन उभा राहिलो. प्लॅटफॉर्म तर दोन्ही बाजूनी माणसांनी मोठ्या प्रमाणात भरून गेले होता. तिथे मी बराच वेळ उभा राहिलो शेवटी ९.५० ला ट्रेन हळू हळू येऊन समोर थांबली.

ट्रेन समोर येताच मात्र लोकांनी ट्रेन चा दरवाजांजवळ आत घुसण्यासाठी खूप गर्दी केली. प्रत्येक जन कसेबसे आत घुसण्याचा प्रयत्न करीत होता. मी सुद्धा एकदाचा कसबस करून अखेर ट्रेन मधे घुसलो. मी माझी बॅग सीट वरील रखान्यात ठेवली आणि खिडकी शेजारी रिकाम्या असलेल्या एका सीट जाऊन बसलो.

इतर लोक हि घाई गडबडीत आत येऊन प्रतेकाने सीट पकडली परंतु काही जणांना मात्र उभेच रहावे लागले. मी माझा घरी रेल्वे मध्ये बसाल्याचे कळविले आणि बॅगेमधील असलेले साने गुरुजीने लिहलेले श्यामची आई हे पुस्तक काढुन वाचण्यास सुरवात केली. पुस्तक वाचता वाचता खिडकी तुन आत येणारी स्वछ आणि थंड हवा मात्र खुपच छान वाटत होती. अनेक लोक एकमेकांशी बोलत होती, काही शांत मोबाइल मधील गाणे ऐकत बसली होती, काही लहान मूळ खेळ खेळत होते, काही जण गाण्यांच्या भेंड्या खेळत होते. अशाप्रकारे ट्रेन मधील वातावरण खूप छान होते.

खिडकीतून बाहेरील सुंदर दृश्य दिसत होते. अनेक हिरवीगार शेती, तलाव, गाव, हिरवीगार डोंगर असे अनेक दृश्य दिसत होती. रेल्वे मध्ये अनेक फेरीवाले येजा करत होते. भेळवाले., सरबतवाले, वडापाववाले, असे अनेक जण जोराने ओरडत ओरडत येजा करत होते.

माझ्यासोबत असलेले ट्रेन चा डब्यातील अनेक माणसे फेरीवाल्यांकडून काही ना काही घेत होते. मी देखील भेळ विकत घेतली व भेळ खात खात पुस्तक वाचत प्रवासाचा आनंद लुटत राहिलो.

आता मात्र रात्र झाली होती, काही जन झोपू गेली होती तर काही झोपण्याची तयारी करीत होती, काही जण न्यूजपेपर वाचत बसली होती, काही जण एकमेकांशी बोलत बसलेली होती. मी देखील झोपण्याची तयारी करून काही वेळात झोपून गेलो.

पहाटे लवकरच ५.३० वाजता जाग आली. मी अंगा वरिल घेतलेली शाल कवळून बॅगेमध्ये ठेवेळी व बाथरूम मध्ये जाऊन जब्रश करून आलो व आईने डब्ब्यात दिलेल नाश्ता खाल्लं.

अशा रीतीने काही तासांनंतर ८ वाजता रत्नागिरीतील स्टेशनर वर येऊन ट्रेन थांबली. स्टेशनवर माझा मामा माझी वाट बघत बसला होता. मी ट्रेन मधून बाहेर आलो व मामासोबत घेरी जाण्यास निघालो.

अशा प्रकारे माझा ट्रेन मधील प्रवास खूप छान झाला. मला प्रवास करताना खुप छान वाटले.

तर मित्रानो या My railway journey essay in Marathi लेखात मी माझा रेल्वतील प्रवासाबद्दल काही शब्द सांगितले आहेत. जर आपल्याला मी लिहलेला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्राना नक्कीच पाठवा.

Read also:-

Share on:

Leave a Comment