दहावीनंतर एनडीए मधील प्रवेश प्रक्रिया

How to join NDA after 10th in Marathi मित्रांनो तुमचा दहावीचा टप्पा नक्कीच उत्तमरित्या पार पडला असेलच. तुम्ही भविष्यात NDA ( National Defense Academy ) मधून अधिकारी होऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक आहात का ? तर त्यासाठी तुम्हाला NDA साठी लागणाऱ्या पात्रतेची पूर्तता करण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे पार पाडावे लागतील.

How to join NDA after 10th in Marathi
how-to-join-nda-after-10th-in-marathi

दहावीनंतर एनडीए मधील प्रवेश प्रक्रिया How to join NDA after 10th in Marathi

शैक्षणिक पात्रता NDA exam eligibility:-

NDA साठी प्रवेश परीक्षेचा अर्ज भरताना तुम्ही बारावी उत्तीर्ण अथवा बारावीमध्ये शिकत असणे गरजेचे आहे. तसेच, NDA संस्थेत दाखल होण्याआधी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

आर्मीमध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला विज्ञान, वाणिज्य किंवा कला यातील कोणत्याही शाखेमधून बारावी उत्तीर्ण व्हावे लागते तर भारतीय नौदल किंवा भारतीय वायुदलामध्ये भरतीसाठी भौतिकशास्त्र, गणित व रसायनशास्त्र हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

NDA भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा NDA exam age limit:-

NDA साठी अर्ज करताना उमेदवाराचे वय कमीत कमी १६.५ वर्ष तसेच जास्तीत जास्त १९.५ वर्षे इतके असणे गरजेचे आहे.

अर्ज कुठे व कधी करावा?

दरवर्षी एप्रिल व सप्टेंबर अशा रीतीने वर्षातून दोनदा NDA प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही राष्ट्रीय पातळीवरील ( State level ) परीक्षा आहे व ती केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेतली जाते.

NDA साठीचा अर्ज तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर ( website ) जाऊन भरावा लागतो.

NDA प्रवेश प्रक्रिया NDA selection process:-

NDA ची प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पाडली जाते. पहिला टप्पा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा होय. प्रवेश परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना SSB बोर्डाच्या मुलाखतीस सामोरे जावे लागते.

प्रत्येक टप्प्याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे.

१) प्रवेश परीक्षा:-

ही परीक्षा Multiple choice questions म्हणजेच बहुपर्यायी स्वरूपाची असते. ही परीक्षा एकूण 900 गुणांची असून गणित व सामान्य क्षमता चाचणी असे दोन पेपर द्यावे लागतात.

गणित हा विषय 300 गुणांसाठी असून त्यासाठी अडीच तासाचा कालावधी दिला जातो तसेच सामान्य क्षमता चाचणी हा विषय सहाशे गुणांसाठी असून त्यासाठी सुद्धा अडीच तासाचा कालावधी दिला जातो.

हा पेपर इंग्रजी किंवा हिंदी अशा दोन भाषांमध्ये घेतला जातो. तसेच या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत देखील लागू केली गेली आहे.

दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जात असून महाराष्ट्रासाठी मुंबई व नागपूर अशी दोन परीक्षा केंद्रे ( Exam centers ) दिली आहेत.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना SSB मार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीस सामोरे जावे लागते.

२) सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखत:-

उमेदवाराने प्राथमिक निवडीनुसार ठरवलेल्या शाखेनुसार त्याच्या मुलाखतीचे ठिकाण ठरवण्यात येते. ही मुलाखत पूर्ण होण्यास एकूण पाच दिवसाचा अवधी लागतो.

SSB द्वारे केली जाणारी ही निवड दोन टप्प्यांमध्ये केली जाते.

१) पहिला टप्पा (OIR and PP&DT):-

पहिल्या टप्प्यामध्ये बुद्धिमापन चाचणी (OIR) व चित्र आकलन व वर्णन चाचणी (PP&DT) या चाचण्यांच्या निकषावर प्राथमिक निवड केली जाते.

या टप्प्यातून निवडले गेलेले उमेदवार हे पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरतात व उरलेले उमेदवार हे निवड प्रक्रियेतून ( selection process ) बाहेर केले जातात.

२) दुसरा टप्पा:-

दुसऱ्या टप्प्यातील निवड ही मुलाखत (Interview), ग्रुप टास्क व मानसशास्त्र चाचणी (Psychological test) या निकषांवर पार पाडली जाते.

हा टप्पा पूर्ण होण्यासाठी एकूण चार दिवसांचा अवधी लागतो. या टप्प्यामध्ये मुलाखत अधिकारी, ग्रुप टास्क अधिकारी व मानसशास्त्रज्ञ यांच्याद्वारे प्रत्येक उमेदवाराचे मूल्यमापन केले जाते.

वरील तीनही चाचण्यांच्या निकषावर प्रत्येक उमेदवारामधील अधिकारी होण्याची क्षमता व प्रशिक्षण क्षमता तपासून पाहिली जाते.

हवाई दलामध्ये प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना कॉम्प्युटराईज्ड पायलट सिलेक्शन सिस्टीम (CPSS) ची चाचणी द्यावी लागते. CPSS चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवार हवाई दलातील फ्लाईंग शाखा तसेच जनरल ड्युटी व नेवल एअर आर्मसाठी NDA मध्ये अर्ज करू शकत नाहीत.

या निवड प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी मुलाखतीचा निकाल जाहीर केला जातो.

वैद्यकीय चाचणी NDA Medical test:-

मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रत्येक दलाच्या निकषानुसार वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर अंतिम यादी ( Final list ) जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या इच्छुक शाखेसाठी NDA मध्ये प्रवेश घेता येतो.

प्रशिक्षण NDA training:-

NDA या प्रशिक्षण संस्थेअंतर्गत लष्कर, नौदल व वायुदल या तीनही दलातील विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या प्राथमिक शिक्षण दिले जाते.

या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व शारिरीक अशा दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. सुरुवातीच्या अडीच वर्षातील प्राथमिक प्रशिक्षण हे सर्व दलातील प्रशिक्षणार्थींसाठी सारखेच असते.

आर्मीमधील प्रशिक्षणार्थींना B.Sc किंवा B.A. पदविका दिली जात असून त्यांचा NDA मधील एकंदरीत प्रशिक्षणाचा कालावधी तीन वर्षे इतका असतो.

तर नौदल व वायू दलातील प्रशिक्षणार्थींना B.Tech. ही डिग्री दिली जाते व त्यांचा NDA मधील प्रशिक्षणाचा कालावधी हा चार वर्षांचा असतो.

NDA मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक दलातील प्रशिक्षणार्थींना प्रत्येक दलासंदर्भातील प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवले जाते.

आर्मीमधील प्रशिक्षणार्थींना देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमी ( Indian Military’s academy ) मध्ये पुढील प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.

नौदलातील प्रशिक्षणार्थींना एझीमला येथील इंडियन नेवल अकादमीमध्ये पुढील प्रशिक्षण दिले जाते. आणि हवाई दलातील प्रशिक्षणार्थींना एअर फोर्स अकादमी, हैदराबाद व एअर फोर्स टेक्निकल कॉलेज, बंगळूर येथे पुढील प्रशिक्षण दिले जाते.

NDA मधील शाखा NDA streams:-

NDA मध्ये भूदल, नौदल व वायुदल अशा एकूण तीन मुख्य शाखा आहेत.

१) आर्मी (भूदल) Army:

१८९५ मध्ये स्थापन झालेला भारतीय लष्कर हा भारतीय संरक्षक दलामधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे तसेच प्रांतानुसार या दलाची सात विभागांमध्ये विभागणी केली गेली आहे.

२) भारतीय नौदल Navy :-

भारतात स्थापन झालेली पहिली सशस्त्र सेना म्हणजे नौदल. या दलाची स्थापना १८३० साधी झाली होती व सध्या या दलात २५२ लढाऊ विमान व २९५ लढाऊ जहाज कार्यरत आहेत.

भारतातील समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे काम आहे.

३) भारतीय वायुदल Indian Airforce:-

१८३२ मध्ये स्थापन झालेल्या या दलामध्ये सध्या अंदाजे १७२४ लढाऊ विमान कार्यरत आहेत. या दलाचेही प्रांतानुसार सात विभागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.

हे दल जलसीमा तसेच भूसीमांवरील रक्षणासाठी नेहमी कार्यरत असते.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment