डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सर्व माहिती

Dr Apj abdul kalam biography in Marathi : वाचकहो तुम्ही डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र या विषयावर माहिती शोधत आहात का ? तर या लेखात आम्ही भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या एकंदरीत आयुष्याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Dr Apj abdul kalam biography in Marathi
dr-apj-abdul-kalam-biography-in-marathi

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची माहिती Dr Apj abdul kalam information in Marathi

पूर्ण नाव :-अवूल पकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम
जन्म तारीख आणि ठिकाण :-१५ ऑक्टोबर १९८१, रामेश्वरम, तमिळनाडू
शिक्षण :-B.Sc. (भौतिकशास्त्र), एरोस्पेस अभियांत्रिकी
कार्यवैज्ञानिक (इस्रो, डीआरडीओ), राष्ट्रपती, शिक्षक
राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ :-२००२ ते २००७
मृत्यू :-२७ जुलै २०१५

डॉ. अब्दुल कलाम हे भारतीय एयरोस्पेस क्षेत्रातील एक यशस्वी वैज्ञानिक व स्वतंत्र भारताचे ११ वे राष्ट्रपती ( 11th president in India ) होते. त्यांचे संपूर्ण नाव अवूल पकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम हे आहे.

कलाम यांचा जन्म तमिळनाडूमधील रामेश्वरम येथे झाला व तेथेच त्यांचे बालपण गेले. कलाम यांनी रामनाथपुरम येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

तसेच त्यानंतर मद्रास विद्यापीठातून भौतिक शास्त्रामध्ये पदवी प्राप्त केली. १९५५ मध्ये त्यांनी मद्रास मधील महाविद्यालयात एरोस्पेस अभियांत्रिकी या शाखेत प्रवेश घेतला. अभियांत्रिकी मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांनी डीआरडीओ या संस्थेमध्ये १९६० ते १९६९ पर्यंत वैज्ञानिक म्हणून काम केले.

१९६९ साली त्यांची इस्रोमध्ये बदली करण्यात आली, इस्रो मध्ये विविध क्षेपणास्त्र विकसित करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा होता यामुळेच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असेही संबोधले जाते भारताच्या १९९८ मधील पोखरण -२ या अणुचाचणीमध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता.

त्यानंतर २००२ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपती ( President of India ) पदावर नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती होण्याअगोदर भारतरत्न पुरस्कार मिळालेले ते तिसरे राष्ट्रपती होते. तसेच राष्ट्रपती पदाचा मान मिळालेले ते पहिले वैज्ञानिक होते. त्यांनी २००२ ते २००७ पर्यंत देशाच्या राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला.

कलाम यांचे बालपण व शिक्षण Apj abdul kalam childhood & education:-

अवूल पकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम म्हणजेच डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९८१ रोजी तमिळनाडूमधील रामेश्वरम इथल्या एका मुस्लिम कुटुंबात झाला.

कलाम यांचे वडील जैनुलाबदिन मराकयार हे तिथल्या मशिदीमध्ये इमाम होते. तसेच ते व्यवसायाने नाविक होते, त्यांचा रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरुंना रामेश्वरम ते धनुष्कोडीला होडीतून पोहोचण्याचा व्यवसाय होता. तसेच कलाम यांच्या आईचे नाव आशिअम्मा असून त्या गृहिणी होत्या.

कलाम हे त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात लहान होते. कलाम यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम मधील Schwartz हायर सेकंडरी स्कूल येथे पूर्ण केले.

बालपणी कलामांची प्रगती सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणेच होती याचे कारण म्हणजे कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी ते शाळेनंतर वृत्तपत्र वाटप करण्याचे काम करायचे. पण त्यांच्यातील शिकण्याची इच्छा अत्यंत प्रबळ होती.

ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवत याचा प्रयत्न करीत गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता. Schwartz हायर सेकंडरी स्कूल येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर कलाम यांनी सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली येथून १९५४ साली भौतिक शास्त्रांमध्ये पदवी संपादन केली.

त्यानंतर त्यांना असे वाटले की भौतिकशास्त्र हा विषय त्यांच्या रूचीतील नव्हता व त्यानंतर त्यांनी आपला कल अभियांत्रिकी कडे वळवला.

१९५५ मध्ये त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकी या शाखेत प्रवेश मिळवला व तेथून त्यांनी या विषयात पदवी ( Graduation ) संपादन केली.

१९५८ साली कलाम यांचे भारतीय वायुसेनेमध्ये ( Indian Airforce ) लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याचे स्वप्न अगदीच थोडक्यात हुकले होते. ते भारतीय वायुसेनेच्या पात्रतेच्या क्रमवारीमध्ये नवव्या क्रमांकावर होते व भारतीय वायुसेनेमध्ये फक्त आठ जागा रिक्त होत्या त्यानंतर त्यांनी आपला कल वैज्ञानिक होण्याकडे वळवला.

कलाम यांचे वैज्ञानिक म्हणून योगदान Apj abdul kalam as a scientist:-

अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर झाल्यानंतर कलाम यांनी डीआरडीओ या संस्थेत वैज्ञानिक ( scientist ) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच वेळी ते INCOSPAR या समितीमध्ये डॉ. विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होते.

१९६९ मध्ये कलाम यांची इस्रो मध्ये सॅटलाईट लॉन्च व्हेईकल (SLV – 3) या प्रोजेक्टच्या संचालक पदी नेमणूक करण्यात आली याच प्रक्षेपक वाहनाचा वापर करून १९८० साली रोहिणी उपग्रह याचे प्रक्षेपण करण्यात आले.

त्यानंतर १९७० ते १९९० च्या काळात त्यांनी PSLV आणि SLV-3 विकसित करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. तसेच कलाम यांनी पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून तसेच डीआरडीओ या संस्थेचे सचिव म्हणूनही काम केले आहे.

पोखरण येथे झालेल्या पोखरण-२ अनुचाचणी मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. यामुळेच त्यांना देशातील सर्वोत्तम आण्विक वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळाली.

कलाम यांचे राष्ट्रपतीपद Apj abdul kalam president period:-

एक यशस्वी वैज्ञानिक म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर इसवी सन २००२ मध्ये कलाम यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याचे ठरवले व भारताचे ११ वे राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला.

राष्ट्रपती होण्याआधी भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेले ते तिसरे राष्ट्रपती होते. त्यांनी २५ जुलै २००२ रोजी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती पदाची शपथ ग्रहण केली.

२० जून २००७ पर्यंत त्यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला त्यांच्या एकूण कारकिर्दीत त्यांनी 21 माफीनाम्याचे पैकी 20 माफीनामे फेटाळले.

कलाम यांचा राष्ट्रपतीपदानंतरचा काळ:-

राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपल्यानंतर कलाम अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून भेट द्यायचे तसेच त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विद्यापीठाचे कुलपती पदाची जागा भूषवली.

तसेच अण्णा विद्यापीठातल्या एरोस्पेस अभियांत्रिकी शाखेमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले.

कलाम यांचा मृत्यू Apj abdul kalam death:-

२७ जुलै २०१५ रोजी ( Apj abdul kalam death date ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉँग येथे चालू असलेल्या व्याख्यानादरम्यान ते अचानक कोसळले त्यानंतर लगेचच त्यांना जवळच्या Benthany रुग्णालयात दाखल करण्यात आले पण थोड्याच वेळाने त्यांचा तिथे मृत्यू झाला.

कलाम यांना मिळालेले पुरस्कार Abdul kalam awards:-

कलाम यांना त्यांच्या एकूण आयुष्यात अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.

  • त्यांना १९८१ मध्ये पद्मभूषण तसेच १९९० मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • तसेच १९९७ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न याने गौरविण्यात आले.
  • १९९७ मध्ये नॅशनल काँग्रेसने त्यांना इंदिरा गांधी पुरस्काराने सन्मानित केले.
  • तसेच इसवी सन २००० मध्ये अल्वा रिसर्च सेंटरने रामानुजन पुरस्कार देऊन कलाम यांचा गौरव केला.
  • १९९८ साली त्यांना भारत सरकारने वीर सावरकर पुरस्काराने सन्मानित केले.
  • २००७ मध्ये रॉयल सोसायटी युनायटेड किंग्डम यांनी किंग चार्लस (२) मेडल देऊन त्यांचा सत्कार केला.
  • तसेच जगभरातील एकूण ४० विद्यापीठांनी त्यांना विविध क्षेत्रातील डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment