रेखावृत्त म्हणजे काय? संपूर्ण माहिती

Longitude information in Marathi मित्रहो आज आपण या लेखात रेखावृत्त म्हणजे काय? आणि त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.

Longitude information in Marathi

रेखावृत्त म्हणजे काय? | longitude information in Marathi

रेखावृत्त म्हणजे काय?

उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या व एकमेकींपासून एक अंश अंतरावर असणाऱ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषांना रेखावृत्त असे म्हणतात.

सर्व रेखावृत्त हे दक्षिण व उत्तर ध्रुवाजवळ एकत्र येतात. पृथ्वीवर एकूण ३६० रेखावृत्त आहेत तसेच लगतच्या दोन रेखावृत्तांमध्ये एक अंश इतके कोनीय अंतर असते.

शून्य अंश रेखावृत्तापासून पूर्वेला 180 रेखावृत्त व पश्चिमेला 180 रेखावृत्त असतात म्हणून सर्व मिळून एकूण 360 रेखावृत्त असतात. रेखावृत्त हे विषुववृत्ताला काटकोनात छेदतात.

एका रेखावृत्तावरील सर्व ठिकाणांची वेळ सारखीच असते.

रेखावृत्तांमधील अंतर:

दोन जवळच्या रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्ताजवळ सर्वाधिक असते व ध्रुवाजवळ जाताना यामधील अंतर कमी कमी होत जाते व शेवटी ध्रुवाजवळ दोन्ही रेखावृत्त एकत्र येतात.

दोन रेखावृत्तांमधील अंतर हे विविध महत्वाच्या अक्षवृत्तांपाशी पुढीलप्रमाणे असतात:-

१) विषुववृत्ताजवळ जवळच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर १११.३२ किलोमीटर इतके असते.
२) कर्कवृत्त किंवा मकरवृत्ताजवळ दोन रेखावृत्तांमधील अंतर १०२ किलोमीटर इतके असते.
३) आर्क्टिक्ट किंवा अंटार्क्टिक वृत्ताजवळ दोन रेखावृत्तांमधील अंतर ४४.३४ किलोमीटर इतके असते
४) दक्षिण व उत्तर ध्रुवाजवळ दोन रेखावृत्त मधील अंतर ० किलोमीटर इतके असते.

रेखावृत्त वरून वेळ कशी दर्शवली जाते?

पृथ्वीला स्वतःभोवती 360 अंश रेखावृत्त इतके अंतर फिरण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो.
म्हणजेच १° इतके अंतर पार करण्यासाठी ४ मिनिटे इतका वेळ लागतो.

त्यामुळे दोन ठिकाणांमधील वेळे मधील फरक काढण्यासाठी पुढील सूत्राचा वापर होतो:-

वेळेतील फरक (मिनिट) = दोन ठिकाणांच्या रेखावृत्तांमधील अंतर (अंश) × ४

उदाहरणार्थ : भारत आणि लंडन या देशांमधील रेखावृत्ते अंतर हे ८२.५ अंश इतके आहे.

या दोन देशांच्या वेळेमधील अंतर = ८२.५ × ४ = ३३० मीनीटे = ५ तास ३० मिनिट

म्हणजेच भारत आणि लंडन या देशांच्या वेळेमध्ये पाच तास तीस मिनिटे इतके अंतर आहे.

महत्वाची रेखावृत्ते कोणती व ती कोठून गेली आहेत?

१) शून्य अंश रेखावृत्त Prime Meridian:

हे रेखावृत्त इंग्लंड जवळच्या ग्रीनवीच या बेटा वरून गेले आहे. ग्रीनवीच येथून पूर्वेला 180 रेखावृत्त आहेत तर पश्चिमेला 180 रेखावृत्त आहेत.

कोणत्याही ठिकाणची वेळ ही ग्रीनवीच व त्या ठिकाणच्या रेखावृत्तीय अंतरावरुन ठरते.

२) आंतरराष्ट्रीय तारीख रेखावृत्त International Date Line:

हे रेखावृत्त शून्य अंश रेखावृत्तापासून दोन्ही बाजूंनी 180 अंशावर स्थित आहे. हे रेखावृत्त पॅसिफिक महासागर मधून जाते.

या रेखावृत्ताजवळ आंतरराष्ट्रीय तारखेमध्ये बदल होतो.

हे देखील वाचा:

Share on:

Leave a Comment