अक्षवृत्त म्हणजे काय? संपूर्ण माहिती

Latitude meaning in Marathi मित्रहो आज आपण या लेखात अक्षवृत्त म्हणजे काय आणि त्याविषयीची भरपूर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या.

Latitude meaning in Marathi

अक्षवृत्त म्हणजे काय? | Latitude information in Marathi

अक्षवृत्त म्हणजे काय? Latitude meaning in Marathi

विषुववृत्ताला समांतर असणाऱ्या व एकमेकांपासून समान अंशावर असणाऱ्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात.

विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना अक्षवृत्तांचा आकार कमी कमी होत जातो. सर्वात लहान अक्षवृत्त म्हणजे ध्रुव जे बिंदू समान मानले जाते व त्यांना 90 डिग्री अक्षवृत्त असेही म्हणतात.

पृथ्वीवर एकूण 181 अक्षवृत्त आहे यातील 90 विषुववृत्ताच्या दक्षिण बाजूला व 90 उत्तर बाजूला असतात.
सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त आहे.

पृथ्वीवरील कोणतेही अक्षवृत्त हे एकमेकांना समांतर असतात. अक्षवृत्त व पृथ्वीचा अक्ष हे काटकोनामध्ये असतात.

अक्षवृत्त हे अंशामध्ये का दाखवले जाते?

अक्षवृत्त कसे तयार केले जातात हे समजले तर अक्षवृत्त हे अंशामध्ये का दाखवले जातात हे समजण्यास मदत होईल.

यासाठी पृथ्वीच्या केंद्राजवळ मध्यापासून ठराविक अंशामध्ये कोन करणारी रेषा आखली जाते. ही रेषा पृथ्वीवरील पृष्ठभागाला स्पर्श करते. तेच ठराविक अंशाइतके अंतर ठेवून पृथ्वीच्या पृष्ठभागावर काल्पनिक वर्तुळ आखले जाते यालाच अक्षवृत्त असे म्हणतात. व हे अक्षवृत्त पृथ्वीच्या केंद्रावरून जितक्या अंशावर आखले जाते त्या अंशानेच या अक्षवृत्ताला ओळखले जाते.

उदाहरणार्थ: वरील आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राशी ८० अंश कोन करणाऱ्या अक्षवृत्तला ८० अंश अक्षवृत्त असे म्हटले जाते.

महत्वाची पाच अक्षवृत्ते:

पृथ्वीवरील काही महत्त्वाची असणारी अक्षवृत्त पुढीलप्रमाणे आहेत:-

१) कर्कवृत्त: विषुववृत्त कडून उत्तर ध्रुवाकडे २३°३०’ अंशावर असणाऱ्या अक्षवृत्ताला कर्कवृत्त असे म्हणतात.

२) विषुववृत्त: पृथ्वीच्या मध्यभागातून जाणाऱ्या अक्षवृत्ताला म्हणजेच शून्य अंश अक्षवृत्ताला विषुववृत्त असे म्हणतात.

३) मकरवृत्त: विषुववृत्त कडून दक्षिण ध्रुवाकडे २३°३०’ अंशावर असणाऱ्या अक्षवृत्ताला मकरवृत्त असे म्हणतात.

४) आक्ट्रिक वृत्त: विषुववृत्तापासुन उत्तर ध्रुवाकडे ६६°३०’ अंशावर असणाऱ्या अक्षवृत्ताला आक्ट्रिक वृत्त असे म्हणतात.

५) अंटाक्ट्रिक वृत्त: विषुववृत्तापासुन दक्षिण ध्रुवाकडे ६६°३०’ अंशावर असणाऱ्या अक्षवृत्ताला अंटाक्ट्रिक वृत्त असे म्हणतात.

अक्षवृत्तामुळे पडणारे पृथ्वीचे कटिबंध:

पृथ्वीवरील महत्त्वाच्या असणाऱ्या अक्षवृत्तांमुळे पृथ्वीवरील पृष्ठभागाचे पुढील कटीबंधांमध्ये वर्गीकरण केले जाते.

उष्ण कटिबंध:

पृथ्वीवरील कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंत येणाऱ्या भागाला उष्ण कटिबंध असे म्हणतात. या कटिबंधामध्ये तापमान सर्वाधिक असते तसेच एकूण जीवसृष्टी पैकी 2/3 पेक्षा जास्त जीवसृष्टी ही उष्णकटिबंधामध्ये अस्तित्वात आहे.

समशीतोष्ण:

उष्ण कटिबंध व शीत कटिबंध यांच्यामध्ये असणाऱ्या भागाला समशीतोष्ण कटिबंध असे म्हणतात. समशीतोष्ण कटिबंध हा पृथ्वीवर दोन भागांमध्ये अस्तित्वात आहे. या ठिकाणी असणारे तापमान हे उष्ण कटिबंधापेक्षा कमी असते.

१) दक्षिण समशीतोष्ण कटिबंध: मकरवृत्त व अंटाक्ट्रिक वृत्त या मध्ये येणाऱ्या भागाला दक्षिण समशीतोष्ण कटिबंध असे म्हणतात.
२) उत्तर समशीतोष्ण कटिबंध: कर्कवृत्त व आक्ट्रिक वृत्त या मध्ये येणाऱ्या भागाला समशीतोष्ण कटिबंध असे म्हणतात.

शीत कटिबंध:

समशीतोष्ण कटिबंधानंतर ध्रुवाजवळच्या भागाला शीत कटिबंध असे म्हणतात. शीत कटिबंधातील तापमान पृथ्वीच्या इतर भागापेक्षा कमी असते. शीत कटिबंध हा पृथ्वीवर दोन भागांमध्ये आहे.

अ) दक्षिण शीत कटिबंध: दक्षिण ध्रुवालगत ६६°३०’ ते ९०° अक्षवृत्तादरम्यान असणाऱ्या भागाला दक्षिण शीत कटिबंध असे म्हणतात.

ब) उत्तर शीत कटिबंध: उत्तर ध्रुवालगत ६६°३०’ ते ९०° अक्षवृत्तादरम्यान असणाऱ्या भागाला उत्तर शीत कटिबंध असे म्हणतात.

अशाप्रकारे आम्ही Latitude meaning in Marathi या लेखात अक्षवृत्त म्हणजे काय या संदर्भात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.‌

हे देखील वाचा:-

Share on:

1 thought on “अक्षवृत्त म्हणजे काय? संपूर्ण माहिती”

  1. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

    Reply

Leave a Comment