बाष्पीभवन म्हणजे काय? संपूर्ण माहिती

Evaporation information in marathi मित्रहो आज आपण या लेखात बाष्पीभवन म्हणजे काय? आणि त्याविषयीची भरपूर माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊया या.

evaporation information in marathi

बाष्पीभवन म्हणजे काय? | Evaporation information in marathi

बाष्पीभवन म्हणजे काय?

उत्कलनबिंदू पेक्षा कमी तापमानाला द्रवाचे बाष्पामध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात.
बाष्पीभवन ही प्रक्रिया द्रवाच्या वातावरणाशी संपर्कात असणाऱ्या पृष्ठभागावर घडून येते.

बाष्पीभवन हे वातावरणाचा दाब, द्रवावरील बाष्पदाब (surface tension) , द्रवाचे तापमान इत्यादी बाबींवर अवलंबून असते.
उन्हाळ्यामध्ये उघड्या पात्रात ठेवलेल्या पाण्याची पातळी कमी होणे हे बाष्पीभवन प्रक्रियेचे उदाहरण आहे.

बाष्पीभवन कसे होते?

१) द्रवपदार्थाचे पृष्ठभागावरील रेणूंवर असणारा दाब हा द्रवातील इतर रेणुंपेक्षा कमी असतो.

२) तसेच पृष्ठभागावरील द्रव रेणू व आतील रेणुंमध्ये आंतर -रेण्वीय टक्कर होऊन आतील रेणू पृष्ठभागावरील रेणूंना उर्जा देतात. यामुळे पृष्ठभागावरील रेणूंमधील गतिज ऊर्जा वाढते.

३) रेणूंमधील गतिज ऊर्जा वाढल्यामुळे या रेणूंचे इतर रेणूंशी असलेले परस्पर आकर्षण कमी होते व हे रेणू पृष्ठभाग सोडून वातावरणामध्ये जातात.

बाष्पीभवनाचे फायदे:

बाष्पीभवनापासुन होणाऱ्या अनेक फायद्यांपैकी काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत:-

१) पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होणे ही नैसर्गिक बाष्पीभवनाची प्रक्रिया पाऊस पाडण्यास मदत करते.

२) मिठागरांमध्ये नैसर्गिक बाष्पीभवनाचा वापर करून मीठ तयार केले जाते.

३) क्षारयुक्त पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्यासाठी बाष्पीभवनाचा वापर केला जातो.

बाष्पीभवन व उकळणे यामधील फरक:

बाष्पीभवन व उकळणे या प्रक्रिया मधील महत्वाचे फरक पुढील प्रमाणे आहेत:-

१) बाष्पीभवन हे उत्कलनांक बिंदू पेक्षा कमी तापमानाला घडून येते तर उकळणे ही प्रक्रिया उत्कलनांक बिंदूपाशी घडून येते

२) बाष्पीभवन प्रक्रियेमध्ये पृष्ठभागाजवळच्या द्रव्याचे बाष्पामध्ये रूपांतर होते तर उकळणे या प्रक्रियेमध्ये ज्या द्रवरेणूंना उष्णता दिली जाते त्या द्रवरेणूंचे बाष्पामध्ये रूपांतर होते.

३) बाष्पीभवन ही प्रक्रिया मंद वेगाने घडून येते तर उकळणे ही बाष्प तयार होण्यासाठी जलद प्रक्रिया आहे.

बाष्पीभवनाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व:

बाष्पीभवनाचा दैनंदिन व गृहोपयोगी कामांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

१) कपडे सुकवणे
२) खाद्यपदार्थ वाळवणे
३) शेतामधील धान्य वाळवणे

बाष्पीभवन दरावर परिणाम करणारे घटक:

बाष्पीभवनाच्या दरावर पुढील घटकांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून येतो:-

१) द्रव्याचा वातावरणाच्या संपर्कात असलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: द्रव पदार्थाचा वातावरणाशी असणारा संपर्क जितका जास्त असेल तितका बाष्पीभवनाचा दरही जास्त असतो.

२) वातावरणाचे व द्रवाचे तापमान: वातावरणाचे किंवा द्रव पदार्थाचे तापमान वाढल्यास बाष्पीभवनाचा दर देखील वाढत जातो.

३) पृष्ठभागावरील हवेचा वेग: पृष्ठभागावरून वाहणाऱ्या हवेचा वेग जितका जास्त असेल तितका बाष्पीभवनाचा दर वाढत जातो

४) वातावरणातील आद्रता: वातावरणामध्ये आद्रतेचे प्रमाण जसे वाढत जाते तसा बाष्पीभवनाचा दर कमी होत जातो. पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी जास्त वेळ लागण्यासाठी हे एक कारण आहे.

हे देखील नक्की वाचा:

Share on:

Leave a Comment