दिवाळीवर 10 ओळी (२०२२)

10 lines on Diwali in Marathi मित्रानो तुम्ही दिवाळी वर १० ओली शोधत अहात का? आम्ही या लेखात दिवाळी बद्दलची माहिती १० ओळीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल.

10 lines on Diwali in Marathi for class 1,3,4,5,6

10 lines on Diwali in Marathi for class 1,3,4,5,6 | दिवाळीवर 10 ओळी

१. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे.

२. दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सणांपैकी एक आहे.

३. दिवाळी हा सण सहा दिवस आनंदने साजरा केला जातो.

४. दिवाळीतील पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गाईची व तिच्या वासराची पूजा केली जाते.

येथे वाचा: दिवाळी का साजरी केली जाते आणि दिवाळी सणाचे महत्व

५. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी धनवंतरी ऋषी अमृताचा कलश घेऊन पृथ्वीच्या दिशेने येत असतात म्हणून या दिवशी एक दिवा दक्षिणेच्या दिशेला लावला जातो जेणेकरून त्यांच्या येण्याच्या मार्गात प्रकाश पडेल.

६. धनत्रयोदशीचा दिवशी भगवान कुबेर यांची देखील पूजा केली जाते. हा दिवस सोने चांदी किंवा दागिने खरेदीसाठी उत्तम मानला जातो.

७. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून पृथ्वीचा जाच संपवला होता.

८. नरक चतुर्दशीचा दिवसाची सुरुवात ही अभ्यंगस्नानाने केली जाते अभ्यंगस्नान म्हणजेच सुगंधी उटणे लावून तसेच सुगंधी द्रव्य लावून त्यानंतर कारीटाचे फल पायाच्या अंगठ्या खाली चिरडले जाते. कारीट म्हणजे नरकासुराचे प्रतीक मानले जाते व त्या नंतर दाराच्या अंगणात आंघोळ केली जाते व त्यानंतर देव पूजा आटोपली जाते.

९. दिवाळीच्या चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. कधीकधी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येतात.

१०. लक्ष्मीपूजनचा दिवशी लक्ष्मीची आराधना केली जाते. लक्ष्मी पुजना दिवशी घरे, दुकाने फुलांच्या हराने सजवले जातात.

तर मित्रानो अशा प्रकारे आम्ही या 10 lines on Diwali in Marathi लेखात दिवाळी बद्दलची माहिती १० ओळीत सांगितली आहे. आम्हाला आशा आहे कि दिवाळी बद्दलचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

हे देखील वाचा:

Share on:

2 thoughts on “दिवाळीवर 10 ओळी (२०२२)”

Leave a Comment