भारत देशावर 10 ओळी | 10 lines on India in Marathi

10 lines on India in Marathi मित्रहो आज आपण या लेखात भारत देशावर 10 ओळी पाहणार आहोत. भारत हा विविधतेत एकता असणारा व ऐतिहासिक वारसा असणारा देश आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी साजरा केला जातो. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.

10 lines on India in Marathi

भारत देशा वर 10 ओळी 10 lines on India in Marathi

10 lines on India in Marathi (सेट १)

१) भारत हा आशिया खंडातील लोकशाही कार्यरत असणारा देश आहे.

२) क्षेत्रफळानुसार भारताचा जगात सातवा क्रमांक आहे.

३) भारताला एकूण सात शेजारी देशांनी वेढलेले आहे.

४) लोकसंख्येच्या मानाने भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे.

५) भारताचा उत्तरेकडील भाग हा पर्वतरांगांनी वेढलेलं आहे.

६) भारताला 7516 किलोमीटर इतका लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे.

७) समुद्राव्यतिरिक्त भारतात अनेक लहान मोठ्या नद्या देखील अस्तित्वात आहेत.

८) भारताचा राष्ट्रध्वज हा केसरी, पांढरा व हिरवा अशा तीन रंगांचा असून त्याच्या मध्यावर निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.

९) भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे असून ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे.

१०) भारतामध्ये अनेक जाती, धर्माचे, संस्कृतीचे लोक एकत्र राहतात.

10 lines on India in Marathi (सेट २)

१) भारत हा विविधतेत एकता असणारा व ऐतिहासिक वारसा असणारा देश आहे.

२) भारतामध्ये एकूण 29 राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.

३) भारताचा स्वातंत्र्यदिन हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी साजरा केला जातो.

४) दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून ओळखली जाते.

५) क्षेत्रफळाच्या मानाने राजस्थान हा भारतातील सर्वात मोठा राज्य आहे व गोवा हे सर्वात छोटे राज्य आहे.

६) भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्ध, जैन अशा विविध धर्माचे लोक एकत्र राहतात.

७) भारतीय भूदलाचा अमेरिका व चिननंतर जगात तिसरा क्रमांक आहे.

८) भारतामध्ये एकूण 600 अभयारण्ये आहेत व 1400 प्रजातीचे पक्षी अस्तित्वात आहेत.

९) भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही अस्तित्वात आहे.

१०) भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 60 टक्के लोकसंख्या ही गावामध्ये आहे.

Share on:

Leave a Comment