स्वच्छतेवर 10 ओळी

10 lines on cleanliness in Marathi मित्रहो आज आपण या लेखात स्वच्छतेवर 10 ओळी पाहणार आहोत. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर यांना अस्वच्छतेपासून दूर ठेवणे होय. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.

10 lines on cleanliness in Marathi

स्वच्छतेवर 10 ओळी 10 lines on cleanliness in Marathi

स्वच्छतेवर 10 ओळी (सेट १)

1) मन, शरीर, बुद्धी सुदृढ राखण्यासाठी स्वच्छतेची नितांत आवश्यकता आहे.

2) अनेक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

3) अस्वच्छतेमुळे होणाऱ्या साथीच्या आजारांमुळे आजपर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत.

4) काहीही खाण्याआधी हात धुणे किंवा बाहेरून घरात आल्यानंतर हात पाय धुणे अशा सवयी आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात.

5) अस्वच्छतेमुळे कॉलरा, टायफर सारखे अनेक आजार होतात.

6) प्रत्येकाने स्वतःचे घर व परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली तर पर्यायाने संपूर्ण देश स्वच्छ होऊन जाईल.

7) उघड्यावर शौच करण्यापेक्षा सार्वजनिक शौचालय वापरल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते.

8) यासाठी खाजगी तसेच सार्वजनिक शौचालये बांधण्याचा उपक्रम भारत सरकारने हाती घेतला आहे.

9) घनकचऱ्यापासून होणारा त्रास टाळण्यासाठी घरीच ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करणे गरजेचे आहे.

10) महात्मा गांधींच्या मते स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षाही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

स्वच्छतेवर 10 ओळी (सेट २)

1) स्वच्छता म्हणजे आपले शरीर मन व परिसर यांना अस्वच्छतेपासून दूर ठेवणे होय.

2) उत्तम आरोग्य राखण्यासाठी स्वच्छता राखणे तितकेच महत्त्वाचे आहे.

3) उत्तम आरोग्यासाठी शरीराची व उत्तम वातावरणासाठी परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे.

4) सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याऐवजी जर तो कचरा पेटीत टाकला तर पर्यायाने परिसर स्वच्छ होण्यास आपोआप मदत होईल.

5) शारीरिक स्वच्छतेमुळे शरीर सुदृढ राहते तर परिसरातील स्वच्छता मध्ये मन प्रसन्न राहते.

6) अनेक आजार हे शारीरिक व परिसरातील अस्वच्छतेमुळे पसरतात.

7) दिवसभरातून किमान एकदा आंघोळ करणे तसेच बाहेरून आल्यावर हात पाय धुणे अशा सोप्या स्वच्छतेच्या सवयींमुळे अनेक आजारांना दूर ठेवता येते.

8) शौचालयासाठी शौचकुपाचा वापर करणे व शौच करून आल्यानंतर हात-पाय व्यवस्थित धुणे अशा सवयी कॉलरा टायफॉइड अशा अनेक आजारांपासून बचाव करतात.

9) आजारांचा सामना करण्यापेक्षा स्वच्छतेमुळे त्यांचा प्रतिबंध करणे हे नक्कीच फायद्याचे ठरते.

10) भारतामध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे.

Share on:

Leave a Comment