तलाठी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती

Talathi exam information in Marathi मित्रहो आज आपण या लेखात तलाठी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊया या.

Talathi exam information in Marathi

तलाठी हे महाराष्ट्र महसूल विभागातील गावपातळीवरील पद आहे. तलाठी या पदासाठी भरती ही जिल्हा निवड आयोगामार्फत केली जाते.

या लेखामध्ये तलाठी पदासाठी आवश्यक असणारी अर्जदाराची पात्रता, शिक्षण, परीक्षेचा आराखडा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया या संदर्भातील माहिती दिली आहे.

तलाठी परीक्षेची माहिती | Talathi exam information in Marathi

तलाठी भरतीसाठी पात्रता (Talathi eligibility):

तलाठी पदासाठी आवश्यक असणारी अर्जदाराची पात्रता ही पुढीलप्रमाणे आहे:-

१) वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्ष
मागासवर्गिय/ खेळाडू/ प्रकल्पग्रस्त यांना वयोमर्यादा मध्ये सूट देण्यात येते.
२) राष्ट्रीयत्व: भारतीय
३) परीक्षेच्या संधींची संख्या: वयाच्या अधिक त्या मर्यादेपर्यंत परीक्षा देता येतात.

तलाठी भरती शैक्षणिक पात्रता:

तलाठी भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:-

१) उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
२) मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.
३) उमेदवार संगणकविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

तलाठी परीक्षेचा आराखडा:

तलाठी ह्या पदासाठी असणाऱ्या परीक्षेचे साधारण स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:-

१) ही परीक्षा लेखी स्वरूपाचे असते तसेच यातील प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.
२) ही परीक्षा एकूण 200 गुणांची असते.
३) यामध्ये एकूण शंभर प्रश्न असतात व प्रत्येक बरोबर उत्तराला दोन गुण दिले जातात.
४) यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित व सामान्य-ज्ञान अशा चार विषयांचा समावेश होतो.
५) प्रत्येक विषयामध्ये 25 प्रश्न असतात.
६) हा पेपर सोडवण्यासाठी एकूण दोन तासाचा अवधी मिळतो

तलाठी परीक्षेसाठी अर्ज कसा करावा:

तलाठी परीक्षेसाठी Mahapariksha Portal येथे अर्ज करावा लागतो.

निवड प्रक्रिया संदर्भातील जाहिरात ही जिल्हा निवड समितीमार्फत प्रसिद्ध केली जाते त्यानंतर अर्जदाराला वर दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करता येतो.

तलाठी निवड प्रक्रिया (Talathi selection process):

तलाठी पदासाठी असणारी भरती ही सरळ सेवा पद्धतीने होते.

यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारची मुलाखत द्यावी लागत नाही.

तलाठी ही गट क विभागातील जागा असल्याने परीक्षेचा स्तरही त्यानुसार असतो.

ही परीक्षा जिल्हा निवड समिती मार्फत घेतली जाते. तलाठी या पदासाठी असलेल्या रिक्त जागांसाठी जिल्हा निवड समिती जाहिरात प्रसिद्ध करते त्यानंतर उमेदवारांद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जातात.

यानंतर उमेदवारांना बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा द्यावी लागते.

यानंतर जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यानुसार मेरीट लिस्ट जाहीर केली जाते.

तलाठी भरती अभ्यासक्रम (Talathi exam syllabus):

तलाठी भरती अभ्यासक्रमामधील मराठी विषयाचा स्तर हा बारावीचा अभ्यासक्रमाप्रमाणे असतो तर इतर तीन विषयांचा स्तर हा पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे असतो.

मराठी:-

  • समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द
  • काळ व काळाचे प्रकार
  • विभक्ती
  • म्हणी
  • वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग
  • शब्दसमुहाबद्दल एक शब्द
  • शब्दांचे प्रकार- नाम सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद विशेषण
  • संधी व संधीचे प्रकार

इंग्रजी:-

  • Sentence structure
  • Verbal comprehension passage etc.
  • Spot the error
  • Question tag
  • One word substitutions
  • Use proper form of verb
  • Synoms & anytoms
  • Spellings
  • Proverbs
  • Vocabulary
  • Phrases
  • Tense & kinds of tense

अंकगणित:-

  • बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
  • मापनाची परिमाणे
  • चलन
  • काळ, काम, वेग संबंधित – उदाहरणे
  • घड्याळ
  • सरासरी

सामान्यज्ञान:-

  • महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास
  • भारताच्या शेजारील देशांची माहिती
  • पंचायत राज व राज्यघटना
  • महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य
  • भारतीय संस्कृती
  • रसायनशास्त्र
  • जीवशास्त्र
  • भौतिक शास्त्र
  • चालू घडामोडी- राजकीय, आर्थिक, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा

तर मित्रानो अशाप्रकारे आम्ही Talathi exam information in Marathi या लेखात तलाठी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. आम्हाला अशा आहे कि हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला लेखाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर खालील कंमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका.

Share on:

1 thought on “तलाठी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती”

  1. तुम्ही दिलेली माहिती खूप महत्त्व पूर्ण आहे. आम्ही कायम उत्सुक असेल आपल्या नवीन नवीन माहिती साठी

    Reply

Leave a Comment