SBI गृहकर्जासाठी लागणारी कागदपत्रे

SBI home loan documents in Marathi तुमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणजेच तुमचं घराच स्वप्न पूर्ण करण्यासाठी SBI गृहकर्ज ( Homeloan ) हा उत्तम पर्याय आहे. ज्याचा फायदा भारतातील तीस लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आहे व त्याचा वापर करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे.

SBI home loan documents in Marathi
sbi-home-loan-documents-in-marathi

SBI गृहकर्जासाठी लागणारी कागदपत्रे SBI home loan documents in Marathi

SBI मधून गृह कर्ज मिळवण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या कागदपत्रांमध्ये अर्जदाराचे ओळखपत्र, रहिवासी पुरावा, बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्र अशा अनेक कागदपत्रांचा समावेश होतो त्याचा तपशील खाली नमूद केला आहे.

सर्वसाधारणतः लागणारी कागदपत्रे:-

१) खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ओळखपत्र.

२) गृहकर्जासाठीचा अर्ज.

३) अर्जदाराचे ओळखपत्र:-

खाली दिलेल्या कागदपत्रांचा वापर ओळखपत्र म्हणून करू शकता.

  • पॅन कार्ड,
  • मतदार ओळखपत्र (Votor ID) ,
  • पासपोर्ट,
  • वाहनचालक परवाना ( Driving licence )

४) निवासी पुरावा:-

निवासी पुरावा म्हणून पुढे दिलेल्या एखाद्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी.

  • वीज देयक ( Electricity bill )
  • दूरध्वनी देयक ( Telephone bill )
  • पीएनजी देयक ( PNG bill )
  • पासपोर्ट प्रत ( Passport )
  • वाहनचालक परवाना (Driving licence)

प्रॉपर्टी संदर्भातील सादर करावयाची कागदपत्रे:-

१) बांधकाम परवाना ( Permission for construction ):-

हा परवाना आवश्यकता भासल्यास सादर करावा लागतो. हा दाखला तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडून म्हणजेच ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयातून बनवून घ्यावा लागतो.

२) विक्रीसाठीचा नोंदणीकृत करारपत्र / बिल्डरकडून मिळालेले अलॉटमेंट लेटर

३) भोगवटा प्रमाणपत्र ( Occupancy certificate):-

तयार असलेली घरं किंवा फ्लॅट खरेदीसाठी याची आवश्यकता भासते.

४) शेअर प्रमाणपत्र (हे फक्त महाराष्ट्र राज्य साठी लागू आहे) , मेंटेनन्स देयक, संपत्ती कर पावती, वीज देयक.

५) बांधकामाचा मंजूर झालेला आराखडा प्रत ( Approved plan copy ) तसेच बिल्डरचा करारपत्र, जमिनीची अभिहस्तांतरण प्रक्रिया कागदपत्रे (conveyance deed) (नवीन जागी बांधकामासाठी).

६) बिल्डर कडून मिळालेली पैसे भरण्याची पावती किंवा बिल्डरला पैसे दिले असे दाखवणारे बँक स्टेटमेंट.

बँक खात्यासंदर्भातील आवश्यक असणारी कागदपत्रे:-

१) अर्जदाराचे सर्व बँकांमधील मागील सहा महिन्यातील आर्थिक उलाढाल दाखवणारी प्रत
२) अर्जदाराने इतर बँकांमधून कर्ज घेतले असेल तर मागील एक वर्षाची लोन संदर्भातील माहिती दाखवणारे स्टेटमेंट.

अर्जदार किंवा जामीनदार नोकरी करत असल्यास त्याचा उत्पन्नाचा पुरावा:-

१) मागील तीन महिन्याची सॅलरी स्लिप.
२) मागील दोन वर्षांचा फॉर्म-१६ किंवा मागील दोन वर्षाचा आयकर परतावा प्रत (IT returns)

अर्जदार किंवा जामीनदार नोकरी करीत नसल्यास त्याच्या उत्पन्नाचा पुरावा:-

१) व्यवसायाच्या पत्त्यासंदर्भातील पुरावा
२) मागील तीन वर्षातील आयकर परताव्याची प्रत (IT returns copy)

आवश्यकता भासल्यास जमीनदाराला सादर करावी लागणारी कागदपत्रे:-

१) वैयक्तिक मालमत्तेचा तपशील
२) ओळखपत्र
३) रहिवासी पुरावा
४) व्यवसाय करीत असलेल्या पत्त्याचा पुरावा

SBI गृहकर्ज संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी SBI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा जवळच्या SBI शाखेत चौकशी करा.

या लेखामागील उद्देश  SBI गृहकर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंदर्भातील माहिती करून देणे इतकाच आहे. तसेच यात दिलेल्या माहितीमध्ये काळानुसार बदल झालेला असू शकतो. तसेच या माहितीचा उद्देश आर्थिक सल्ला देणे हा नाही.
Share on:

Leave a Comment