अपघात विमा योजना म्हणजे काय? संपूर्ण माहिती

Personal accident insurance in Marathi मित्रहो आज आपण या लेखात अपघात विमा योजना म्हणजे काय आणि त्याविषयीची भरपूर माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊया या.

Personal accident insurance in Marathi

अपघात विमा योजना म्हणजे काय? | Personal accident insurance in Marathi

अपघात विमा योजना म्हणजे काय? Personal accident insurance meaning in marathi

अपघात विमा योजना हि विमा कंपनी व विमाधारक यांच्यामध्ये घडून येणारा करार आहे, ज्यामध्ये विमा कंपनी विमाधारक व्यक्तीस अपघातासाठी विमा संरक्षण देते.

हे विमा कवच ठराविक कालावधीसाठी असून त्यासाठी विमाधारक व्यक्तीस विमा कंपनीला ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून हप्त्याच्या स्वरूपात किंवा एक रकमी भरावी लागते.

तसेच काही योजनांमध्ये अपघातामुळे होणारे मिळकतीचे नुकसान सुद्धा विमा कंपनी कव्हर करते. तसेच यामध्ये विमाधारक व्यक्तीचा अपघातादरम्यान मृत्यू झाल्यास नॉमिनीला डेथ बेनिफीट दिला जातो. अपघातात विमाधारकास अपंगत्व आल्यास त्यासाठी सुद्धा विमा कंपनी विमा कव्हर देते.

अपघात विमा योजनेचे प्रकार:

अपघात विमा योजनेचे पुढील प्रकार पडतात:-

१) वैयक्तिक अपघात विमा: ही योजना एखाद्या व्यक्तीचे अपघातामुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण करते. या योजनेअंतर्गत विमाधारकाचा अपघातातून होणारा मृत्यू, दृष्टी गमावणे, हातपाय गमावणे अशा गोष्टी कव्हर केल्या गेल्या आहेत.

२) ग्रुप अपघात विमा: ही योजना एखाद्या कंपनी किंवा संस्थेद्वारे कर्मचाऱ्यांकरिता घेतली जाते. ग्रुप मध्ये घेतल्या जाणाऱ्या अपघात विम्याचा प्रिमियम हा इतर पॉलिसींच्या मानाने कमी असतो. साधारणतः ही पॉलिसी एका वर्षाच्या मुदतीसाठी असते. काही विमा कंपनी या ग्रुपच्या संख्येनुसार प्रीमियममध्ये सवलत देतात.

अपघात विमा योजनेमध्ये कव्हर केल्या जाणाऱ्या जोखिम:

अपघात विमा योजना मध्ये पुढील जोखिमांचा समावेश केला जातो:-

१) अपघाती मृत्यू: पॉलिसी धारकाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याने अर्जात नमूद केलेल्या नॉमिनीला डेथ बेनिफीट दिला जातो.
२) कायमस्वरूपी अपंगत्व (पूर्णतः किंवा अंशत:): कायमस्वरूपी अपंगत्व आले असल्यास पॉलिसी मध्ये ठरल्याप्रमाणे विमाधारकाला ठराविक रक्कम दिली जाते.
३) वैद्यकीय खर्च
४) रुग्णवाहिका खर्च
यासोबतच प्रत्येक विमा कंपनी नुसार इतरही खर्च कव्हर करण्यासाठी योजना असू शकतात.

अपघात विमा योजनेमध्ये कव्हर न होणाऱ्या गोष्टी:

अपघात विमा योजनेमध्ये पुढील जोखीमांचा समावेश केला जात नाही:-

१) अपघातापूर्वी असणारे अपंगत्व/ जखम
२) गरोदरपणा
३) आत्महत्या
४) हेतुपूर्वक केलेली जखम
५) मादक पदार्थांच्या प्रभावामुळे होणारा अपघात
तसेच अशाच इतर काही जोखीमांचा समावेश अपघात विमा योजनेमध्ये केला जात नाही.

अपघात विमा कोणाला घेता येते?(अर्जदाराची पात्रता)

ज्या व्यक्तींच्या व्यवसायात किंवा कामात जोखीमांचा समावेश असतो, त्या व्यक्ती अपघात विमा योजनेचा वापर करू शकतात.

अपघात विमा योजनेसाठी साधारणतः कमीतकमी वय १८ वर्षे इतके असते तर जास्तीत जास्त ६५ वर्ष इतके असते. ही वयोमर्यादा प्रत्येक विमा कंपनी नुसार वेगळी असते.

अपघात विमा योजनेमध्ये क्लेम कसे करावे?

अपघात विमा योजनेमध्ये क्लेम करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:-

१) अपघात झाल्यानंतर विमा कंपनीच्या कस्टमर केअर नंबर वर फोन करून अपघाता संदर्भात माहिती द्यावी.
२) यानंतर विमा कंपनीमध्ये विम्याची कागदपत्रे जमा करावी व यासोबत क्लेमसाठीचा फॉर्म भरून जमा करावा.
३) तसेच विमा कंपनीला आवश्यक असणारी अपघातासंदर्भातील माहिती तसेच कागदपत्रे जमा करावी.
४) यानंतर विमा कंपनी चौकशी करून अर्जाची पात्रता ठरवते.
५) अर्ज पात्र ठरल्यास विमा कंपनी अर्जदाराच्या बँक अकाऊंट मध्ये विमा रक्कम जमा करते.
६) अर्ज रद्द केल्यास विमा कंपनीला हवी असणारी अधिक कागदपत्रे जमा करावी लागतात.

अपघात विमा क्लेम करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:-

अपघात विमा क्लेम करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती असल्यास क्लेम करणे सोपे होते. सर्वसामान्यपणे अपघात विमा क्लेम करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:-

१) क्लेम साठीचा अर्ज
२) डॉक्टरांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला
३) मृत्यूचा दाखला (विमाधारकाचा मृत्यू झाल्यास)
४) FIR प्रत
५) शवविच्छेदन अहवाल
६) तपासणी अहवाल
७) वैद्यकीय दाखला
८) डॉक्टरांचा रिपोर्ट

तर अशाप्रकारे आम्ही या लेखात अपघात विमा योजनेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Personal accident insurance in marathi हा लेख लिहिण्यामागचा हेतू हा फक्त अपघात विमा योजने बद्दल साधारण माहिती पुरवणे इतकाच आहे व कोणताही आर्थिक सल्ला देणे हा यामागचा उद्देश नाही. तसेच प्रत्येक विमा कंपनीसाठी लागणाऱ्या पात्रतेच्या अटी, कागदपत्रे इत्यादी गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात.

हे देखील वाचा:

डेबिट कार्ड म्हणजे काय? संपूर्ण माहितीक्रेडिट कार्ड म्हणजे काय? संपूर्ण माहिती
पदवी म्हणजे काय? संपूर्ण माहितीGmail account कसे उघडावे? सर्व माहिती
बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाची माहितीतलाठी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
Share on:

Leave a Comment