मराठी राजभाषा दिन

मित्रहो, या लेखामध्ये आपण मराठी राजभाषा गौरव दिनाविषयी माहिती करून घेणार आहोत. हा दिवस का साजरा केला जातो तसेच हा दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट काय आहेत, याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Marathi rajbhasha din information in marathi

मराठी राजभाषा दिन निबंध Marathi rajbhasha din nibandh in marathi:

ज्ञानपीठ, साहित्य अकादमी अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी व मराठी साहित्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी व त्यांच्या अथक परिश्रमांना अभिवादन म्हणून सन २०१३ पासून त्यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

वि. वा. शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने अनेक काव्यसंग्रह, नाटक, कादंबऱ्या व एकांकिका लिहिल्या. कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून अवतरलेले नटसम्राट हे नाटक आजही अजरामर आहे. त्यांनी विशाखा, वादळवेल, स्वगत, समिधा अशी अनेक काव्यसंग्रह तसेच कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव अशा कादंबऱ्या दिल्या. मराठी साहित्यामधील त्यांनी दिलेले योगदान हे त्यांच्या विशाल प्रतिभेचे तसेच मराठी भाषेविषयीच्या आस्थेचे दर्शन घडविते.

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करणे हे त्यांच्या प्रचंड प्रतिभा साधनेला, त्यांनी निर्माण केलेल्या विशाल साहित्यकृतीला व मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून स्थान मिळावे यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांना अभिवादन करण्याजोगे आहे.

मराठी भाषेचे साहित्यभांडार अत्यंत विपुल आहे. शांत, शृंगार, करुण, रौद्र, वीर, बीभीत्स अशा नवरसांनी व्यापलेल्या मराठी भाषेची थोरवी अनेक साहित्यिकांनी त्यांच्या लेखणीतून व्यक्त केली. अनेक साहित्यिकांनी त्यांच्या कृतीतून हा साहित्याचा झरा अविरत वाहत ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. अगदी म्हाईंभट्ट यांचे लीलाचरित्र, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी यापासून हा प्रवाह वृद्धिंगत होत गेला‌.

विविध संतांचे संतकाव्य, ओव्या, अभंग यांचा समावेश या प्रवाहात झाला. यानंतर विविध कथासंग्रह, कादंबऱ्या, काव्यसंग्रह अशा अनेक स्वरूपांत मराठी साहित्याचे वैभव वाढतच गेले ते आजतागायत. म्हणूनच मराठी भाषेच्या विशाल वैभवाचे व सामर्थ्याचे वर्णन करताना कवी कुसुमाग्रज म्हणतात,

मराठी भाषेला लाभलेल्या साहित्यिक व सांस्कृतिक वैभवाचे जतन व संवर्धन करणे हेदेखील या राजभाषा गौरव दिनाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. दरवर्षी या दिवशी अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

कोणत्याही प्रदेशातील संस्कृतीचे मूळ हे तिच्या भाषेशी निगडित असते, त्यामुळे तिथल्या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी तिथल्या मातृभाषेचे व त्यामधील साहित्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असते. म्हणूनच या दिवशी मराठी भाषा व साहित्य संवर्धनाच्या दृष्टीने तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार हे मुख्य धोरण ठेवून विविध उपक्रम राबवले जातात.

अनेकदा विचारले जाणारे प्रश्न:

  1. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो?

    मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी या तारखेला साजरा केला जातो.

  2. मराठी राजभाषा गौरव दिन कोणाचा जन्मदिवस आहे?

    मराठी राजभाषा गौरव दिन हा कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे.

  3. आज जगामध्ये किती देशात मराठी भाषा बोलली जाते?

    मराठी हि भाषा भारताव्यतिरिक्त अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्युझीलँड, इस्राईल, मौरिशस, युनाइटेड किंग्डम अशा अनेक देशांमध्ये बोलली जाते.

तर अशाप्रकारे आम्ही Marathi rajbhasha din information in marathi या लेखामध्ये मराठी भाषा गौरव दिनाविषयी सविस्तररित्या माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Share on:

1 thought on “मराठी राजभाषा दिन”

Leave a Comment