जनधन खाते कसे काढायचे?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना विविध बँकिंग सुवीधांचा लाभ घेता यावा या उद्दिष्ठाने भारत सरकारने सन २०१४ पासून प्रधानमंत्री जन धन योजना राबविण्यास सुरुवात केली. या लेखात आपण जनधन खाते कसे काढायचे, याबद्दल माहिती करून घेणार आहोत तसेच यासाठी लागणारी पात्रता, फायदे, अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल माहिती करून घेणार आहोत.

Jan dhan account opening in Marathi जनधन खाते कसे काढायचे

जनधन खाते म्हणजे काय?

देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी तसेच विविध सरकारी योजनाद्वारा दिली जाणारी रक्कम थेट नागरिकांना मिळावी या हेतूने 2014 पासून जनधन योजनेची सुरुवात केली. या खात्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला शून्य रुपये बॅलन्समध्येदेखील हे खाते सुरू करता येते, तसेच यात कमीत कमी बॅलेन्सची अटदेखील ठेवण्यात आली नाही.

या योजनेअंतर्गत जनधन खातेधारकांना विमा, कर्ज सुविधा, ओव्हरड्राफ्ट, निवृत्ती वेतन अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जनधन खात्यासोबतच खातेधारकाला डेबिट कार्ड सुविधादेखील देण्यात आली आहे जेणेकरून त्या व्यक्तीला भारतात कोठेही एटीएमद्वारा पैसे काढता येऊ शकतात, तसेच जन धन खात्यामध्ये पैसे जमा करणे किंवा काढणे अशा गोष्टीसाठी शुल्क आकारले जात नाही.

पात्रता:

जनधन खाते तयार करण्यासाठी आवश्यक असणारी अर्जदाराची पात्रता पुढीलप्रमाणे आहे:-

१) अर्जदाराचे नागरिकत्व भारतीय असणे गरजेचे आहे.
२) अर्जदाराचे कमीत कमी वय दहा वर्षे इतके असावे.
३) अर्जदाराचे इतर कोणत्याही बँकेत खाते नसावे.

जनधन खाते तयार करण्याचे फायदे:

जनधन खाते तयार करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:-

१) खाते तयार करताना कमीत कमी बॅलन्सची अट नाही.
२) ओव्हरड्राफ्ट सुविधा: खाते सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी खातेधारकाला ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा लाभ घेता येतो.
३) विमा कव्हर: 26 जानेवारी 2015 अगोदर जनधन खाते उघडणारे खातेधारक व्यक्ती रु. ३०,००० पर्यंत जीवन विमा कवच मिळण्यासाठी पात्र ठरतात.
४) डेबिट कार्ड: जनधन खाते असणाऱ्या खातेधारक व्यक्तीस रूपे डेबिट कार्ड दिले जाते ज्याचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी केला जाऊ शकतो.
५) कर्ज सुविधा: जनधन खाते असणाऱ्या व्यक्तीला खाते काढून सहा महिने झाल्यानंतर रु. ५,००० इतके कर्ज मिळू शकते.
६) नेट बँकिंग तसेच मोबाईल बँकींग सुविधा उपलब्ध.
७) जनधन खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

जनधन खाते तयार करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

जनधन खाते काढताना खालील कागदपत्राची आवश्यकता भासते:-
१) पासपोर्ट साईज फोटोग्राफ

२) केवायसी कागदपत्र (कोणतेही एक)
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
पॅन कार्ड
वाहन चालक परवाना
नरेगा जॉब कार्ड
पासपोर्ट
केंद्र किंवा राज्य सरकार विभागाकडून दिलेले फोटो सहित ओळखपत्र
राजपत्रित अधिकाऱ्याने दिलेले फोटोसहित पत्र

३) मोबाईल नंबर

जनधन खाते कसे काढायचे?

पुढील स्टेप्सचा वापर करून जनधन खाते काढणे अत्यंत सोपे आहे:-

१) जनधन खाते फॉर्म भरणे:
हा फॉर्म तुम्हाला जनधन सेवा उपलब्ध करून देणाऱ्या बँकेत मिळेल किंवा जनधन योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये फॉर्म मिळवता येतो. हा फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या व यामध्ये योग्य ती माहिती भरा.

२) तसेच वर दिल्या प्रमाणे कागदपत्रे जोडून हा अर्ज तुमच्या नजीकच्या जनधन खाते सेवा असणाऱ्या बँकेत जमा करा.
अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला जनधन खाते उघडता येते.

अनेकदा विचारले जाणारे प्रश्न:

  1. जन धन योजनेअंतर्गत खाते कोणाला उघडता येते?

    जन धन खाते उघडण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिकत्वाचा असणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराचे किमान वय १० वर्ष इतके असणे गरजेचे आहे.

  2. जन धन योजना ओपनिंग फॉर्म ऑनलाइन उपलब्ध आहे का?

    होय, जन धन खाते उघडण्यासाठी लागणारा फॉर्म हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रधानमंत्री जन धन योजनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नोंद: जन धन खाते कसे उघडावे या लेखामागचा मूळ उद्देश या योजनेबद्दल माहिती पुरवणे इतकाच आहे तसेच कोणताही आर्थिक किंवा गुतंवणुकीसंदर्भातील सल्ला देणे हा यामागचा उद्देश नाही.

Share on:

Leave a Comment