विमा म्हणजे काय? संपूर्ण माहिती

Insurance information in Marathi विमा हा व्यक्तीला अनेक पूर्वनिश्चित कारणांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देते. ही योजना ठराविक कालावधीसाठी व्यक्तीचे, वस्तूचे किंवा इमारतीचे विविध कारणांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानासाठी आर्थिक कवच प्रदान करते.

मित्रहो आम्ही या लेखामध्ये आम्ही विमा म्हणजे काय आणि विमा योजनांबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Insurance information in Marathi

विमा म्हणजे काय? | Insurance information in Marathi

विमा म्हणजे काय? Insurance meaning in Marathi

विमा हा विमा कंपनी व विमा घेणारी व्यक्ती म्हणजेच विमाधारक यांच्यामध्ये घडून येणारा एक करार आहे. या करारान्वये विमाधारक व्यक्तीचे काही विशिष्ट बाबतीत आर्थिक नुकसान झाल्यास विमा कंपनी त्या नुकसानाची पूर्णतः किंवा अंशतः भरपाई करते.

हा करार ठराविक कालावधीसाठी केला जातो व यासाठी विमाधारक व्यक्तीला ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून एकरकमी किंवा हप्त्याच्या स्वरूपात विमा कंपनीकडे जमा करावी लागते व या विमा कालावधीदरम्यान विमाधारकाचे पूर्वनिर्धारित अटीनुसार नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनी विमाधारक व्यक्तीस देते.

विमा का घ्यावा?

विमा घेतल्यास मिळणारे सर्वसाधारण फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

१) विमा योजनेमुळे अर्जदाराला आर्थिक नुकसानापासून संरक्षण मिळवता येते.
२) या योजनेचा वापर करून आपल्याला भविष्य सुरक्षित करता येते.
३) आपल्या व्यवसायाचे विविध कारणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करता येते.
४) विमा कवच असलेल्या वस्तुची / इमारतीची चिंता करावी लागत नाही.
५) कमी खर्चात मोठ्या नुकसानापासून संरक्षण मिळते.
६) नुकसानावेळी होणाऱ्या खर्चाचा आर्थिक भार पूर्णपणे किंवा अंशतः विमा कंपनी उचलते.

विमा योजनेचे विविध प्रकार:

ग्राहकाच्या गरजेनुसार विमा कंपनी विविध कारणासाठी विविध योजना उपलब्ध करून देते, यातील काही योजना पुढील प्रमाणे आहेत.

१) जीवन विमा: या योजनेद्वारे विमाधारक व्यक्तीच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित केले जाते. या योजनेनुसार विमा कालावधी चालू असताना विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विमाधारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या व्यक्तीला (Nominee) डेथ बेनिफिट दिला जातो.

म्हणून या योजनेचा वापर करून विमाधारक व्यक्ती त्याच्या पश्चात कुटुंबाचे आर्थिकदृष्ट्या संरक्षण करू शकतो.

२) आरोग्य विमा: या योजनेचा वापर करून विमाधारक व्यक्ती आरोग्यासंदर्भातील तक्रारींसाठी होणाऱ्या अमाप खर्चापासून रक्षण करू शकतो. तसेच या योजनेचा वापर करून महागड्या उपचार पद्धती स्वस्त दरात करता येतात.

३) ऑटो/ कार विमा: या योजनेचा वापर करून विमाधारक व्यक्तीला अपघातामुळे वाहनांच्या होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळते. तसेच यामध्ये अपघातामुळे होणाऱ्या इतर परिणामांचा देखील समावेश केला जातो.

४) कॉर्पोरेट विमा: कॉर्पोरेट विमा द्वारे व्यक्तीला त्याचा व्यवसायायामध्ये विविध कारणांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण मिळते. यामध्ये चोरी होणे, उत्पन्नामध्ये नुकसान होणे, ग्राहकाने केलेले दावे अशा अनेक बाबींचा समावेश होतो.

५) अग्नि विमा: अग्नि विमा योजनेचा वापर करून विमाधारकाला त्याच्या घराचे किंवा व्यवसायीक इमारतीचे आगीमुळे होणारे नुकसानापासून संरक्षण करता येते. तसेच यामध्ये यंत्रसामग्री, उपकरणे, कच्चामाल, तयार माल, पाणी, पाईपलाईन्स, इलेक्ट्रिक फिटिंग यांचादेखील समावेश होतो.

याचबरोबर अशा अनेक कारणांसाठी विमा कंपनी विविध योजना उपलब्ध करून देते.

विमा योजनेमधील काही महत्वाच्या संज्ञा:

विमा योजना व्यवस्थित जाणून घेण्यासाठी त्यातील संज्ञा जाणून घेणे गरजेचे असते आणि त्यामुळे विमा संदर्भातील विविध पॉलिसीबद्दल जाणून घेताना कोणतीही अडचण येत नाही.

१) विमा (Insurance): विमा हा विमाधारक व्यक्ती व विमा कंपनी यांच्यामधील करार आहे, ज्यानुसार विमा कंपनी विमाधारक व्यक्तीचे पूर्वनिश्चित कारणासाठी नुकसान झाल्यास भरपाई देते.

२) विमा कव्हरेज (Coverage): विमाधारक व्यक्तीस ज्या कारणांसाठी विमा कव्हर मिळते, त्यांना विमा कव्हरेज असे म्हणतात

३) प्रीमियम (Premium): विमा सुरक्षा कवचाच्या बदल्यात विमाधारक व्यक्तीने विमा कंपनीला ठराविक रक्कम हप्त्याच्या स्वरूपात किंवा एकरकमी द्यावी लागते, याला प्रिमियम असे म्हणतात.

४) पॉलिसीधारक (Policyholder): विमा कंपनीकडून विमा योजना घेणाऱ्या व्यक्तीस पॉलिसीधारक असे म्हणतात.

५) इनशुअर्ड (Insured): विमा योजनेद्वारे ज्या व्यक्तीचे आयुष्य सुरक्षित केले जाते, त्या व्यक्तीला इनशुअर्ड असे म्हणतात.

६) विमा कंपनी (Insurance Company): विमा कंपनी विमाधारकाला विविध योजनांसाठी विमा उपलब्ध करून देते.

७) नॉमिनी (Nominee): पॉलिसीधारकानंतर विमा कवचाचे फायदे ज्या व्यक्तीस मिळतात, त्याला नॉमिनी असे म्हणतात

८) परिपक्वता (Maturity): विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर किंवा विमाधारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसी परिपक्व झाली असे म्हणतात.

९) डेथ बेनिफिट (Death benefit): विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर नॉमिनी म्हणून नमूद केलेल्या व्यक्तीला विमा रक्कम ही एक रकमी स्वरूपात किंवा मासिक उत्पन्नाच्या स्वरूपात दिली जाते, याला डेथ बेनिफिट असे म्हणतात.

१०) क्लेम (Claim): विमा पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर परिपक्वता फायदा मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाला क्लेम असे म्हणतात.

११) सम अमाउंट (Sum amount): विमाधारक व्यक्तीस नुकसान झाल्यानंतर मिळणार्‍या अधिकतम रकमेला सम अमाऊंट असे म्हणतात.

तर अशाप्रकारे आम्ही विमा म्हणजे काय याबद्दल या Insurance information in Marathi लेखात सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment