Information about neem tree in Marathi | Uses of neem tree in marathi

मित्रांनो तुम्ही Information about neem tree in Marathi हा लेख शोधत आहात का ? तर आम्ही या लेखामध्ये कडुलिंब या विषयावर माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. कडुलिंबाच्या झाडाचा प्रत्येक अवयव हा अनेक गुणधर्मांनी समृद्ध असतो.

या झाडाचा वैद्यकीय तसेच कृषी क्षेत्रात ( Agriculture ) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या लेखात आम्ही झाडाचे वर्णन, त्याचे उपयोग, त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व यानुसार माहिती वर्गीकृत केली आहे. Information about neem tree in Marathi या विषया बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया पुढील लेख वाचा.

Information about neem tree in Marathi

Information about neem tree in Marathi मराठीमध्ये कडुनिंब झाडाची माहिती

Information about neem tree in Marathi

कडुनिंबाचे झाड सदा बहरणारे वृक्ष आहे व आकाराने खूप मोठे असतात. कडू लिंबाच्या पानाची चव कडू असल्याने या झाडाला कडुलिंब असे म्हटले जाते. हि सदाहरित वनस्पती औषधीदृष्ट्या खूप महत्त्व आहे. या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी केला जातो. कडुलिंबाच्या झाडाचे शास्त्रीय नाव Azadirachta Indica असे आहे.

कडू लिंबाचे झाड पृथ्वीवर सर्व ठिकाणी दिसून येते. कडूलिंबाची प्रजात भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. तामिळनाडू व पश्चिम बंगाल या राज्यात कडू लिंबाच्या फुलांचा व पानांचा आहारात समावेश केला जातो. हिंदू धर्मामध्ये मराठी वर्षाच्या, पहिल्या दिवशी गुढी उभी करतांना कडुलिंबाचा पाला गुढीला बांधला जातो.

कडुलिंबाचे झाड कसे दिसते?

कडू लिंबाच्या झाड वेगाने वाढणाऱ्या झाडांपैकी एक आहे. त्याची उंची पंधरा ते वीस मीटर इतकी असते. तसेच वातावरण पोषक असेल ते तीस ते पस्तीस मीटर इतकी उंची गाठू शकतो.
वसंत ऋतुमध्ये या झाडाची पाने गळून या झाडावर फुले येतात आणि त्यानंतर कडुलिंबाच्या झाडावर गोल आकाराची फळे तयार होतात.

कडू लिंबाच्या झाडाची खोड खूप मोठे असते, ते साधारण १.५ ते साडे ३.५ मीटर इतके वाढते. तसेच या खोडाची साल जाड असून ती लालसर तपकिरी रंगाची असते. कडुलिंबाची पाने फिकट हिरव्या रंगाची असतात व आकाराने वलयाकार व त्याचा खालचा भाग टोकदार असतो.

कडुलिंबाची फुले ही लहान व सफेद रंगाची व तसेच ती सुगंधी असतात. कडू लिंबाच्या झाडावर लागणाऱ्या फळांना लिंबोली असे म्हणतात ती गोलाकार असतात व ती जेव्हा कच्ची असतात तेव्हा ती हिरव्या रंगाची असतात तर जेव्हा ती पिकतात तेव्हा ती पिवळ्या रंगाची होतात. लागवड केल्यानंतर या झाडाला तीन ते पाच वर्षात फळे येण्यास सुरुवात होते. सदाहरित असलेली ही वनस्पती दोनशेहून अधिक काळ जगते.

कडुलिंबाच्या झाडाचे फायदे (advantages of Neem Tree) :-

कडूलिंब हे आयुर्वेदिक क्षेत्रात फार मोठी भूमिका बजावते जसे की :-

१] कडुनिंबाचे झाड हवेतील जंतूंना मारते व हवा स्वच्छ करते त्यामुळे प्रत्येक घरासमोर कडूलिंबाचे झाड असावे.

२] कडू लिंबाचे झाड प्रदूषण कमी करण्यास मदत करते. आजकाळ हवेचे‌ प्रदूषण खूप प्रमाणात वाढले आहे म्हणूनच कडुलिंबाची झाडे लावणे व ती वाढवणे खूप आवश्यक आहे जे आपल्या पर्यावरणास स्वच्छ ठेवतात.

३] कडू लिंबाच्या पानापासून बनवलेले तेल सांधेदुखी कमी करण्यास मदत करते.

४] कडुलिंबाची पाने जाळून त्याचा धूर केल्यास मच्छर निघून जाते.

५] कडुलिंबाची व लिंबोळी याच्या अर्काची फवारणी पिकांवर गेल्यास पिकांना कीड लागत नाही.

६] कडुलिंबाचा पाला धान्य साठवण्याच्या जागी ठेवल्यास धान्याला कीड लागत नाही. काही ठिकाणी कडू लिंबाच्या पानांचा उपयोग कपाटात ठेवण्यासाठी केला जातो त्यामुळे लाकडी कपाटाला वाळवी लागत नाही.

७‌] कडू लिंबाच्या पानांचा अर्क करून प्यायल्यास पचनशक्ती (digestion) सुधारण्यास मदत होते.

८‌‌] कडुलिंबाची पाने आंघोळीच्या गरम पाण्यात टाकून आंघोळ केल्यास त्वचा निरोगी व स्वच्छ होण्यास मदत होते.

९] कडू लिंबाच्या बियांपासून तेल बनवले जाते जे त्वचेवर लावल्यास त्वचेचे विकार (skin problems) दूर राहतात त्याचप्रमाणे ते तेल शेतामध्ये खत म्हणून देखील वापरले जाते.

१०] अनेक लोक रोज कडुलिंबाच्या अर्काचे सेवन करतात जे लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करते.

११] या झाडाच्या फळांच्या बियांचा उपयोग तेल काढण्यासाठी केला जातो. या तेलामध्ये अँटीफंगल तसेच अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

१२] कडुलिंबाची फळे तसेच बियांचा वापर करून बनवलेल्या तेलाचा वापर कीटकनाशक म्हणून केला जातो.

१३] कडूलिंब हे कर्करोग त्याचप्रमाणे मधुमेह सारख्या रोगांवर ही उपायकारक आहे.

१४] कडुलिंबाची कांडी दात घासण्यासाठी वापरली जाते जे दाताला कीड लागण्यापासून रोखते व दात स्वच्छ व मजबूत ठेवते.

१५] कडुलिंबाची पाने औषधांमध्ये वापरली जातात जे अनेक रोगराईपासून आपल्याला सुखरूप ठेवते.

१६] कडुनिंबाचा पाला मातीमध्ये कुजवून त्याचा वापर खत म्हणून (fertilizer) केला जातो.

१७‌] कडूलिंबाचे झाड विविध प्रकारच्या रोगांपासून आपले संरक्षण करते जसे की कर्करोग, मधुमेह ( diabetes) , मलेरिया, रक्त अशुद्धि, चिकुन गुनिया. पौर्वात्य देशांमध्येदेखील कडूलिंबाचा वापर कुष्ठरोग, ताप, पोटदुख, त्वचेशी निगडीत आजार, मधुमेह, डोळ्या संदर्भातील तक्रारी दूर करण्यासाठी वापर केला जातो.

१८‌] बाजारामध्ये कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेल्या अनेक वस्तू जसे की अंघोळीचे साबण, दाताला लावायची पेस्ट, डोक्याचे तेल, सौंदर्य उत्पादने व अनेक प्रकारची औषधे उपलब्ध असतात.

१९] कडू लिंबाचे झाड आणि पिंपळाचे झाड हे दोन्ही झाड त्यांच्या गुणधर्मामुळे पर्यावरणासाठी महत्वाचे आहेत. कडुलिंबाच्या फळांच्या अर्काचा उपयोग पिकांवरील फवारणीसाठी केला जातो.

२०] भारतात पूर्वीपासून कडुलिंबाच्या खोडाच्या सालीचा वापर कीटकनाशक बनवण्यासाठी केला जातो.

२१] कडूलिंबाच्या पानांचे चूर्ण चा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.

कडू लिंबाचा रस पिल्याने काय होते ? ( Neem juice benefits in Marathi ):-

  • कडुलिंबाच्या रसाचा उपयोग खोकला, दमा, आतड्यातील जंत असे आजार बरे करण्यासाठी केला जातो.
  • कडूलिंबाच रस करून प्यायल्यास ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी (Boost immunity) खूप मदत करते.
  • कडूलिंबाच रस करून प्यायल्यास पचनशक्ती सुधारते, लठ्ठपणा (obesity) कमी करण्यास मदत करते.

कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे ( Kadulimbachya pananche fayde ):-

कडू लिंबाच्या पानाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:-

  • कडुलिंबाच्या पानांचा उपयोग मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो.
  • उन्हाळ्यात कडुलिंबाची पाने वाटून त्यातून बनवलेला काढा प्यायल्यास उन्हामुळे होणारा थकवा जाणवत नाही.
  • कडूलिंबाचे पानांचे सेवन केल्यास शरीर स्वच्छ व निरोगी होते.

अशाप्रकारे कडूलिंब ही अत्यंत उपयोगी वनस्पती आहे.

Read aslo:-

Share on:

Leave a Comment