अग्नी विमा म्हणजे काय? संपूर्ण माहिती

Information of fire insurance in Marathi मित्रहो आज आपण या लेखात अग्नी विमा म्हणजे काय आणि त्याविषयीची भरपूर माहिती करून घेणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊया या.

information of fire insurance in marathi

अग्नी विमा हा विमाधारक व विमा कंपनी यांच्यामध्ये घडून येणारा करार आहे. यामध्ये विमा कंपनी विमाधारकाच्या मालमत्तेस आगीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देते.

या लेखात आम्ही अग्नी विमा, यातील योजनेचे प्रकार, विमा कव्हरेज इत्यादी बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

अग्नी‌ विमा म्हणजे काय? | Information of fire insurance in marathi

अग्नी‌ विमा म्हणजे काय? Fire insurance meaning in marathi

अग्नी विमा हा विमा कंपनी व विमाधारक यांच्यामध्ये होणारा करार आहे, ज्यामध्ये विमा कंपनी ठराविक प्रीमियमच्या बदल्यात विशिष्ट कालावधीसाठी आगीमुळे विमाधारक मालमत्तेचे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देते.

या योजनांमध्ये विमाधारकाच्या गरजेनुसार अग्नी विमाच्या विविध योजना उपलब्ध असतात. काही अग्नी विमा योजनेमध्ये मालमत्तेच्या नुकसान भरपाई सोबतच यामुळे होणाऱ्या परिणामांसाठी (नफ्याचे नुकसान, पगार इत्यादी.) देखील संरक्षण दिले जाते

येथे वाचा: बँक ऑफ इंडिया गृह कर्जाची माहितीबँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाची माहिती

अग्नी विमा मध्ये समावेश होणा-या गोष्टी:

अग्नी विमा या योजनेमध्ये पुढील गोष्टींसाठी विमा कव्हर मिळवता येतो:-

१) इमारत
२) इलेक्ट्रिक फिटिंग
३) प्लांट व त्यातील यंत्रसामग्री
४) कच्चामाल/ प्रक्रिया चालू असणारा माल/ तयार माल
५) फर्निचर
६) इमारतीमधील तसेच इमारतीबाहेर असणारी पाईप लाईन

अग्नी विमामध्ये कव्हर केल्या जाणाऱ्या जोखीम:

अग्नी विमा योजनेमध्ये पुढील जोखीमींसाठी विमा कंपनी विमा कवच देते:-

१) आगीमुळे मालमत्तेचे होणारे नुकसान

२) वीज पडून इमारतीचे होणारे नुकसान

३) आगीमुळे होणाऱ्या स्फोटातून होणारे नुकसान

४) विमानामुळे लागलेल्या आगीमुळे होणारे नुकसान

५) दंगल, संप यामुळे होणारे नुकसान

६) नैसर्गिक आपत्तीतुन होणारे नुकसान

७) भूस्खलनामुळे होणारे मालमत्तेचे नुकसान

८) पाण्याची टाकी फुटल्यामुळे मालमत्तेचे होणारे नुकसान

अग्नी विमामध्ये समाविष्ट न होणाऱ्या जोखीम:

अग्नी विमा योजनेमध्ये पुढील जोखीमींचा समावेश केला जात नाही:-

१) आण्विक कचरा तसेच किरणोत्सर्गापासून होणारे नुकसान

२) शॉर्टसर्किट तसेच वीज गळतीमुळे होणारे विद्युत उपकरणांचे नुकसान

३) युद्ध आक्रमण युद्धसदृश परिस्थिती यामुळे होणारे नुकसान

४) भूकंपामुळे होणारे नुकसान

५) उद्देशपूर्वक /हेतुपूर्वक केलेले नुकसान

६) नैसर्गिक हीटिंग, किण्वन यामुळे होणारे नुकसान

तसेच या सोबत प्रत्येक विमा कंपनीनुसार या बाबींमध्ये बदल होत राहतो.

अग्नी विमा पॉलिसीचे प्रकार:

विमाधारकाच्या गरजांनुसार अग्नी विमा योजनेचे अनेक प्रकार पडतात, यातील काही पुढे नमूद केले आहेत.

१) व्हॅल्यूड पॉलिसी (Valued policy): या पॉलिसीमध्ये विमा सुरक्षा दिलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन पॉलिसी घेताना केलेले असते. त्यामुळे जर पॉलिसी कालावधीमध्ये विमाधारक मालमत्तेचे नुकसान झाल्यास विमा कंपनी मूल्यांकनाद्वारे ठरवलेली निश्चित रक्कम भरपाई म्हणून दिली जाते. त्यासाठी विमाधारक मालमत्तेचे किती नुकसान झाले आहे हे विचारात घेतले जात नाही. तसेच या योजनेमध्ये मिळणारी भरपाई ही नुकसान झालेल्या मालमत्तेचे बाजार भावापेक्षा जास्त किंवा कमीदेखील असते.

२) कॉम्प्रेहेंसीव पॉलिसी (Comprehensive policy): या पॉलिसीमध्ये आगीसोबतच इतर जोखीमांचाही समावेश केला जातो.

उदाहरणार्थ: चोरी, युद्ध परिणाम, संप इत्यादी.
पण यासाठी भराव्या लागणाऱ्या प्रीमियमची किंमत खूप असते.

३) व्हॅल्युएबल पॉलिसी (Valuable policy): या पॉलिसी अंतर्गत मालमत्तेचे नुकसान झाल्यानंतर त्याचे मूल्यांकन करून त्यानुसार भरपाई दिली जाते. भरपाईसाठी दिली जाणारी ही रक्कम नुकसानाच्या वेळी असणाऱ्या मालमत्तेच्या बाजारभावानुसार दिली जाते.

४) कन्स्क्विन्शियल लॉस पोलिसी (Consequential loss Policy): या पॉलिसी अंतर्गत आगीमुळे होणारे नुकसानासोबतच इतर परिणामी नुकसान यांचादेखील समावेश केला जातो.
उदाहरणार्थ: नफ्याचे नुकसान, पगार इत्यादी.

५) स्पेसिफिक पॉलिसी (Specific policy): या पॉलिसी अंतर्गत एका ठराविक रकमेपर्यंत भरपाई दिली जाते व यासाठी मालमत्तेचे मूल्यांकन केले जात नाही. ही रक्कम मालमत्तेच्या किमती पेक्षा कमी असते.

६) रीइंस्टेटमेंट पोलिसी (Reinstatement policy): या पॉलिसी अंतर्गत विमा कंपनी नुकसान झालेल्या मालमत्ता पुन्हा उभारण्यासाठी लागणारा खर्च भरपाई म्हणून देते.

७) ॲवरेज पोलिसी (Average policy): जेव्हा पॉलिसीधारक व्यक्तीने मालमत्तेच्या पूर्ण किमतीचा विमा उतरवण्याऐवजी कमी विमा उतरवला असेल तेव्हा ॲवरेज पॉलिसी लागू होते. या पॉलिसीमध्ये विमाधारकाला मिळणारी नुकसानाची टक्केवारी ही अर्जदाराने एकूण मालमत्तेच्या किमती पैकी किती टक्के पॉलिसी घेतली आहे यावर अवलंबून असते.

उदाहरणार्थ: जर एखाद्या व्यक्तीने एक लाख मूल्यांकन असलेल्या मालमत्तेवर साठ हजाराचा विमा घेतला असेल म्हणजेच एकूण किमतीपैकी 60 टक्के रकमेचा विमा घेतला गेला असेल तर नुकसान झाल्यानंतर नुकसानाच्या रकमेचा सुद्धा 60 टक्के इतकाच शेअर भरपाई म्हणून दिला जातो.

८) एक्सेस पॉलिसी (Excess policy): स्टॉकची किंमत बदलत राहणाऱ्या ग्राहकांसाठी या योजनेचा वापर केला जातो यामध्ये विमाधारक व्यक्तीला दोन पॉलिसीज घ्यावे लागतात. यातील पहिली पॉलिसी स्टॉकच्या कमीत-कमी किमतीसाठी घेतली जाते. दुसरी पॉलिसी ही त्यावरील बदलत राहणाऱ्या उर्वरित मूल्यासाठी घेतली जाते व या बदलत राहणाऱ्या मूल्याची माहिती दर महिन्याला विमा कंपनीकडे जमा करावी लागते.

९) फ्लोटिंग पॉलिसी (floating policy): या पॉलिसी अंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेसाठी सुद्धा एकाच पॉलिसी अंतर्गत इन्शुरन्स काढता येतो. व यासाठी विमाधारकाला एकच प्रीमियम भरावा लागतो.

१०) डिक्लेरेशन पोलिसी (Declaration policy): या पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारक स्टॉकच्या अधिकतम रकमेइतका इन्शुरन्स पॉलिसी घेतो. सुरुवातीला विमाधारकाला वार्षिक प्रीमियमच्या 75 टक्के इतकी रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते.
त्यानंतर विमाधारकाला दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीनंतर स्टॉकच्या मूल्यासंदर्भातील माहिती विमा कंपनीला द्यावी लागते. व यानंतर या नोंदींची सरासरी काढून प्रीमियमची रक्कम ठरवली जाते.

११) ॲडजस्टटेबल पॉलिसी (Adjustable policy): जर विमाधारकाच्या मालमत्तेचे मूल्य बदलत राहत असेल, तर त्याला विमा रक्कम निवडणे कठीण होते. त्यामुळे या योजनेमध्ये विमा पॉलिसीच्या सुरुवातीला मालमत्तेचे मूल्यांकन करून त्यावर प्रीमियमची व कव्हर ची रक्कम ठरवली जाते व त्यानंतर मालमत्तेचे‌ मूल्यांकन बदलले तर विमाधारकाला त्यानुसार विमा कव्हर व प्रीमियम मध्ये बदल करता येतो. त्यासाठी विमाधारकाला मालमत्तेची बदलणाऱ्या मूल्यासंदर्भातील माहिती विमा कंपनीला द्यावी लागते.

तर अशाप्रकारे आम्ही अग्नी विमा या योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे Information of fire insurance in Marathi या लेखाचा उद्देश फक्त या योजनेसंदर्भात माहिती पुरवणे इतकाच आहे व या माहितीचा वापर तुम्ही आर्थिक सल्ला म्हणून करू नये.

हा लेख अग्नी विमाबद्दल माहिती करून देणे या उद्देशाने लिहिला आहे. तसेच कोणताही आर्थिक सल्ला देणे हा यामागचा उद्देश नाही.

हे देखील वाचा:

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? संपूर्ण माहितीGmail account कसे उघडावे? सर्व माहिती
पदवी म्हणजे काय? संपूर्ण माहितीअपघात विमा योजना म्हणजे काय? संपूर्ण माहिती
Share on:

Leave a Comment