[मराठी] Information about cricket in Marathi | Essay on cricket in Marathi

Information of cricket in Marathi language क्रिकेट हा जगभरात प्रसिद्ध असलेला दुसऱ्या क्रमांकावरील खेळ ( Second most popular sport ) आहे. हा खेळ प्रामुख्याने भारत, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश अशा अनेक देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो.

हा खेळ 11 खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत हा खेळ सर्रास खेळला किंवा पाहिला जातो. या खेळाचे विविध सामने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्षभर चालूच असतात. तरी या लेखात आपण क्रिकेट या जगप्रसिद्ध केल्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Information about cricket in Marathi
information-of-cricket-in-marathi-language

Information aInformation about cricket in Marathi | Essay on cricket in Marathi

क्रिकेटचा इतिहास History of cricket :-

अनेक तज्ञांचे या गोष्टीवर ठाम एकमत आहे की क्रिकेटचा उगम हा सेक्सॉन किंवा नॉर्मन च्या काळात झाला असावा.
इसवी सन 1611 मध्ये हा खेळ मोठ्यांमध्ये खेळला गेल्याचे पुरावे अस्तित्वात आहेत.

इसवी सन सतराशे च्या काळात दक्षिण व पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेट हा खेळ विकसित होऊ लागल्याचे असे अनेक पुरावे आढळले आहेत
१६९७ मध्ये हा सामना पहिल्यांदा अकरा खेळाडूंच्या दोन गटांमध्ये खेळवण्यात आला.

सतराशे च्या काळात या खेळाला लंडनमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली.

इसवी सन १७६० मध्ये गोलंदाजीच्या तंत्रामध्ये बदल घडून आला व त्यानुसार क्रिकेट मध्ये सुद्धा बदल होत गेले.
अठराव्या शतकाच्या काळात या खेळामध्ये तीन यष्टी असलेल्या खेळपट्टीचा समावेश झाला व त्यात नवीन नियमांची भर पडली.

राऊंडआर्म व ओव्हरआर्म हे गोलंदाजीचे प्रकार एकोणिसाव्या शतकामध्ये उदयास आले.

ब्रिटिश साम्राज्य ज्या प्रदेशात आपला विस्तार करीत होते त्या-त्या प्रदेशात क्रिकेट पोहोचला जात होता.

एकोणिसाव्या शतकामध्ये क्रिकेट हा भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अशा अनेक देशांमध्ये लोकप्रिय होत गेला.

सन 1963 नंतर क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल घडत गेले. या काळात इंग्लंडमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळविले जाऊ लागले.

पहिला मर्यादित षटकांचे सामना हा 1971 मध्ये खेळवला गेला त्यानंतर आयसीसीने 1975 मध्ये पुरुषांसाठी क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन केले. हा विश्वचषक दर चार वर्षांनी खेळला जातो. तसेच सन 1973 मध्ये महिला क्रिकेट विश्वचषकाला ( women cricket world cup ) सुरुवात झाली.

एकविसाव्या शतकात हा खेळ वीस षटकांच्या सामन्यात खेळवला जाऊ लागला. सध्या क्रिकेट हा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला दुसऱ्या क्रमांकावरील खेळ आहे.

क्रिकेट बद्दल माहिती Information about cricket in Marathi:-

खेळाडूंची संख्या व त्यातील विविध भूमिका :-

क्रिकेटमध्ये प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात व त्यांना प्रत्येक वेळी खाली दिल्या प्रमाणे वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात :

१. फलंदाज Batsman : फलंदाज हा क्रिजवर उभा राहून गोलंदाजाने फेकलेला चेंडू टोळवतो. व धावा काढण्याचा प्रयत्न करतो. यातही स्ट्राइक व नाॅन स्ट्राइक असे फलंदाजाचे दोन प्रकार असत.

२. गोलंदाज Bowler : गोलंदाज हा समोर उभ्या असलेल्या फलंदाजामागच्या यष्ट्यावर चेंडू फेकून फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करत असतो.

३. यष्टीरक्षक Wicket Keeper : हा खेळाडू यष्ट्यांच्या मागे उभा राहून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो व संधी मिळताच फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करतो.

४. क्षेत्ररक्षक Fielder : हे खेळाडू फलंदाजाने टोलवला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाण्यापासून रोखतात तसेच फलंदाजाने टोलवलेल्या चेंडूचा झेल घेऊन फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करतात.

५. कर्णधार Captain: हा खेळाडू आपल्या संघाच्या खेळाडूंमध्ये समन्वय साधून सामना जिंकण्याचा प्रयत्न करतो. सामना जिंकण्यासंबंधीचे सर्व निर्णय हे कर्णधार घेतो.

खेळाचे साहित्य Cricket equipment list :

Information of cricket in marathi language
information-of-cricket-in-marathi-language

या साहित्याचे खेळण्यासाठी लागणारे व संरक्षणासाठी असलेले अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. खेळण्याच्या साहित्य मध्ये बॅट, बाॅल, यष्टी यांचा समावेश होतो. तर संरक्षक साहित्यामध्ये शिरस्त्राण ( helmet), फलंदाजीचे हातमोजे, यष्टीरक्षणाचे हातमोजे, लेग गार्ड, बॅटिंग पॅड, थाय गार्ड, आर्म गार्ड इत्यादीचा समावेश होतो.

१. बॅट (Bat) : क्रिकेट साठी वापरली जाणारी बॅट लाकडा पासून तयार केली जाते. क्रिकेटच्या नियमामध्ये बॅट ची मापे ठरवून दिली आहेत. बॅट ची लांबी ही जास्तीत जास्त 38 इंच इतकी असावी लागते तर रुंदी ही ४.२५ इंचापेक्षा कमी असावी लागते. या बॅटचे वजन साधारण दोन ते तीन पौंड इतके असते.

२. बाॅल (ball) : क्रिकेट साठी वापरला जाणारा चेंडू हा टणक काॅर्कपासुन बनवला जातो. कडक काॅर्कच्या बाॅलवर चामड्याचे आवरण शिवुन हा बाॅल तयार केला जातो. या चेंडूचे वजन 163 ग्राम इतके असते. या चेंडूचा परीघ ८.८१ इंचापेक्षा जास्त व 9 इंचापर्यंत असावा लागतो.
हा चेंडू लाल, पांढरा व गुलाबी रंगांमध्ये वापरला जातो.

टेस्ट क्रिकेट ( Test match ) साठी लाल रंगाच्या चेंडूचा वापर केला जातो तसेच एकदिवसीय सामन्यासाठी पांढऱ्या रंगाच्या चेंडूचा वापर केला जातो. तसेच रात्रीच्या उजेडात फलंदाजाला चेंडू दिसावा म्हणून गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर करण्यास सुरुवात झाली.

३. यष्टी : क्रिकेट साठी लागणारे यष्टी व वीटी या लाकडापासून बनवल्या जातात. प्रत्येक यष्टीची जाडी १.२५ इंच इतकी असते तर लांबी 28 इंच इतकी असते. तीन स्टंपची मिळून नऊ इंच इतकी रुंद विकेट तयार होते, यष्टींवर असणाऱ्या खाचेमध्ये विटी म्हणजेच बेल्स ठेवल्या जातात. दोन्ही विकेटमध्ये 22 यार्ड इतके अंतर असते.

खेळाचे मैदान Cricket ground :-

क्रिकेटचे मैदान हे खूप मोठ्या आकाराचे व गवताने आच्छादलेले असते. हे मैदान साधारणतः वर्तुळाकार आकाराचे असते काही ठिकाणी लंबवर्तुळाकार तर काही ठिकाणी याचा आकार निश्चित नसतो. या मैदानाच्या व्यास हा साधारणतः साडेचारशे फूट ते पाचशे फूट इतका लांब असतो.

मैदानाची सीमारेषा म्हणून दोरखंडाचा वापर केला जातो.

या मैदानाच्या मध्यभागी क्रिकेट खेळण्यासाठी धावपट्टी आखलेली असते. आयसीसीच्या ( International Cricket Council ) नियमानुसार क्रिकेट मैदानाची मापे ही अधिकतम किती असावीत व कमीत कमी किती असावे हे ठरवून दिले आहे. त्यांच्या मते धावपट्टीच्या मध्यभागापासून सीमारेषा (Boundary line) 90 यार्डापेक्षा अधिक नसावी तसेच 65 यार्डापेक्षा कमी देखील नसावी.

तसेच नियमानुसार सीमारेषेच्या पलीकडे 3 यार्ड इतकी जागा मोकळी असावी लागते जेणेकरून चेंडू अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक इजा होण्याची भीती न बाळगता झेप घेऊ शकेल.

धावपट्टी Cricket Pitch :-

या खेळासाठी लागणारे धावपट्टी २०.१२ मीटर लांब व ३.०५ मीटर रुंद इतकी असते.

खेळपट्टीच्या प्रत्येक बाजूला तीन यष्टी मैदानामध्ये ठोकलेल्या असतात. व दोन यष्टीच्या मध्ये एक अशा दोन विटी म्हणजेच बेल्स ठेवल्या जातात. या तीन एसटी व त्यावरील बेल्स यांना एकत्रितपणे विकेट असे म्हणतात.

तसेच दोन्ही बाजूला यष्ट्यांपासून १.२२ मीटर अंतरावर एक रेषा आखली जाते याला क्रीज असे म्हणतात. फलंदाजाला खेळताना यष्टी व क्रिजच्या मध्यभागी राहूनच खेळावे लागते. तसेच गोलंदाजाला चेंडू क्रिजच्या अलिकडूनच फेकावा लागतो.

क्रिकेट मधील पंच Cricket umpire :-

Information of cricket in marathi language

क्रिकेट मैदानावर चालणाऱ्या विविध घडामोडींवर निर्णय देण्याचे काम हे पंचांकडे असते.

खेळ नियमबाह्य जाऊ नये हे पाहण्याची जबाबदारी पंचांकडे असते.

साधारणतः क्रिकेट मैदानात एकूण दोन पंच असतात. एक पंच गोलंदाजाकडील यष्टींच्या मागे उभा राहतो तर दुसरा पंच स्ट्राईक फलंदाजाच्या मागच्या बाजूस म्हणजेच शक्यतो स्क्वेअर लेग बाजूस उभा राहतो.

दुसरा पंच हा त्याची जागा बदलू शकतो पण जागा बदलण्या आधी त्याला दोन्ही फलंदाजांना, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला तसेच सहकारी पंचाला तसा इशारा द्यावा लागतो.

आधुनिक खेळामध्ये दोन ऐवजी चार पंचांचा वापर केला जातो. त्यातील दोन पंच हे मैदानात उभे असतात तर तिसरा पंच व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून त्यावर निर्णय देतो.

खेळाच्या विविध स्थितीनुसार पंचांनी दाखवायचे इशारे हे पुढील प्रमाणे आहेत,

१. बाद : खेळाडू बाद झाला हे दर्शवण्यासाठी पंच आपल्या एका हाताची तर्जनी वर उंचावतात.

२. नो बॉल : नो बॉल दर्शवण्यासाठी पंच आपला एक हात खांद्याच्या बरोबरीने उंचावतात.

३. वाईड बॉल : जर गोलंदाजाने चेंडू फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर म्हणजेच अति उंच किंवा फलंदाजाला पोहोचता येणार नाही अशा ठिकाणी फेकला तर हा वाईड बॉल ठरवला जातो. वाईड बॉल दर्शवण्यासाठी पंच आपले दोन्ही हात खांद्याच्या बरोबरीने पसरवतात.

४. चौकार : चौकार दर्शवण्यासाठी पंच आपला हात जमिनीशी समांतर दिशेने हलवतात.

५. षटकार : षटकार दर्शवण्यासाठी पंच आपले दोन्ही हात वरच्या दिशेला उंचावतात.

क्रिकेट मध्ये वापरली जाणारी काही महत्त्वाची नाव Cricket terminology :-

१. षटक : एक शतक हे सहा चेंडूचे असते

२. चौकार : जर फलंदाजाने चेंडूला मैदानावर टप्पा पडून सीमारेषा पलीकडे टोलवला तर त्याला चौकार म्हणतात व त्याच्या एकूण चार धावा संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये गणल्या जातात.

३. षट्कार : जर फलंदाजाने चेंडूला मैदानावर टप्पा न पडता सीमारेषेपलीकडे टोलवला तर त्याला षटकार म्हणतात व त्याच्या एकूण सहा धावा संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये गणल्या जातात.

४. नो बॉल : गोलंदाजी करताना गोलंदाजाचा पाय क्रीज लाईनच्या पलीकडे गेला तर तो चेंडू ग्राह्य धरला जात नाही.

क्रिकेट सामन्यांचे प्रकार Types of cricket tournament :-

षटकांच्या संख्येनुसार सामन्यांचे तीन प्रकारांमध्ये विभाजन केले जाते,

१. टेस्ट सामना : हा सामना एकूण पाच दिवसांचा असतो व प्रत्येक संघाला दोन डाव खेळण्याची संधी असते. प्रत्येक दिवसाचे तीन सेशनमध्ये विभाजन केले जाते प्रत्येक सेशन 30 षटकांचा असतो. पहिल्या सेशन नंतर चाळीस मिनिटांचा लंच ब्रेक असतो व दुसऱ्या सेशन नंतर वीस मिनिटांचा ब्रेक असतो.

२. एक दिवसीय सामना : हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा मर्यादित षटकांचा सामना आहे. यात प्रत्येक संघाला एक-एक डाव खेळण्याची संधी मिळते.

प्रत्येक डाव हा पन्नास षटकांचा असतो. विश्वचषकाचे सामने हे एकदिवसीय सामने म्हणूनच खेळवले जातात.

३. ट्वेंटी -२० सामने : ट्वेंटी -२० हा मर्यादित षटकांच्या खेळातील आधुनिक प्रकार आहे. यामध्ये प्रत्येक डाव हा वीस षटकांचा असतो. सध्या अनेक प्रतिष्ठित स्पर्धा या स्वरूपामध्ये खेळवल्या जातात.

क्रिकेटचे नियम Cricket rules :-

१. क्रिकेट हा खेळ दोन संघांच्या मध्ये खेळला जातो प्रत्येक संघांमध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू असतात.

२. प्रत्येक सामना हा किमान एक फेरीचा असतो व प्रत्येक संघाला फलंदाजी तसेच गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळते.

३. खेळा संदर्भातील पंचांचा निर्णय अंतिम असतो.

४. प्रत्येक षटकांमध्ये सहा चेंडूचा समावेश होतो. एकावेळी एका गोलंदाजाला एक षटक टाकता येते. त्यानंतर ती जबाबदारी दुसऱ्या गोलंदाजाकडे दिली जाते.

५. व्यावसायिक दृष्ट्या खेळल्या जाणाऱ्या सामन्याचा कालावधी हा निश्चित असतो. टेस्ट मॅच सुद्धा दिवसा सहा ते सात तासच खेळवली जाते.

६. फलंदाजाने टोळवलेला चेंडू मैदानावर टप्पा पडून सीमारेषा पलीकडे गेला तर त्या चार धावा मोजल्या जातात.

७. फलंदाजाने टोळवलेला चेंडू मैदानाला स्पर्श न करता सरळ जाऊन सीमारेषेपलीकडे पडल्यास या सहा धावा मोजल्या जातात.

८. जर क्षेत्ररक्षण करणारा खेळाडूने गोलंदाजाकडे चेंडू न देता इतरत्र फेकला तर त्या वेळेत फलंदाज धावपट्टीवर धावा काढू शकतात. तसेच चेंडू फेकताना जर सीमारेषेच्या पलीकडे गेला तर त्याच्या चार धावा मोजल्या जातात.

९. खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा खेळाडू दोन मिनिटाच्या आत धावपट्टीवर हजर असावा लागतो. अथवा जास्त वेळ लागल्यास त्या नवीन खेळाडूला बाद ठरवण्यात येते.

१०. फलंदाजाला बाद करण्याचे नियम पुढीलप्रमाणे आहेत :-

अ) त्रिफळाचीत (bowled) : गोलंदाजाने फेकलेला चेंडू तीन षटकांवर जाऊन आदळला, तर फलंदाज बाद होतो.

ब) झेलबाद : फलंदाजीने टोळवलेला चेंडू जर जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक संघाच्या खेळाडूने झेलला तर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूस बाद ठरविण्यात येते.

क) धावचित : फलंदाज धावपट्टीवर धावा काढत असताना जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूने चेंडू फलंदाज क्रिजजवळ पोहोचण्याच्या आत यष्ट्यांवर टोळवला तर फलंदाज बाद होतो.

ड) पायचीत : जर फलंदाजाने यष्ट्यांवर येणारा चेंडू बॅट सोडून शरीराच्या कोणत्याही भागाने अडवला तर फलंदाजाला बाद ठरवले जाते.

ई) चेंडू मारत असताना फलंदाजाकडून चुकून यष्टीला ( Stumps ) स्पर्श होऊन विट्या पडल्या तर फलंदाज बाद होतो.

कसा खेळायचा How to play cricket :-

हा सामना प्रत्येकी 11 खेळाडू असणाऱ्या दोन संघांमध्ये खेळवला जातो. प्रत्येक सामना हा दोन डावांमध्ये खेळला जातो. प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघाला फलंदाजीची संधी मिळते.

सामना सुरू होण्याआधी नाणेफेक केला जातो. नाणेफेक दोन्ही संघांच्या कर्णधारांसोबत केला जातो. जो संघ नाणेफेक जिंकतो त्याला पहिले फलंदाजी कि गोलंदाजी हे ठरवण्याचा अधिकार असतो.

यानंतर क्षेत्ररक्षण निवडलेल्या संघाचे खेळाडू मैदानावर आपापली जागा घेतात. त्या संघाचा कर्णधार रणनीतीनुसार क्षेत्ररक्षकांची जागा बदलू शकतो.

त्यानंतर दोनही पंच आपापल्या जागी जाऊन उभे राहतात. एक पंच गोलंदाजाचा जवळच्या यष्टिच्या मागे उभा राहतो तर दुसरा पंच फलंदाजाच्या विरुद्ध दिशेस म्हणजे स्क्वेअर लेगला उभा राहतो

फलंदाजी करणाऱ्या संघाचे सुरुवातीचे दोन खेळाडू धावपट्टीवर आपापली जागा घेतात. प्रत्यक्ष फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला स्ट्राइक फलंदाज म्हणतात तर गोलंदाजाजवळच्या क्रिजजवळ उभ्या असलेल्या फलंदाजाला नॉन स्ट्राइक फलंदाज असे म्हणतात.

खेळ सुरू झाल्यावर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडू स्ट्राइक वर असलेल्या फलंदाजाला चेंडू टाकतो. चेंडू फेकताना गोलंदाजाचा पाय क्रीज लाईनच्या पलीकडे असून चालत नाही. जर गोलंदाजाचा पाय क्रिस च्या पलीकडे असेल तर तो चेंडू ग्राह्य धरला जात नाही.

स्ट्राइक वर उभा असलेला फलंदाज गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूला दूर टोळवण्याचा प्रयत्न करतो व त्यानंतर धावा काढण्याचा प्रयत्न करतो.

धावा काढण्याच्या दोन पद्धती आहेत :-

१. चेंडू दूरवर मारून धावपट्टीवरील दोन यष्ट्यांमध्ये प्रत्यक्ष धावणे.

२. चेंडूला जोरात फटका मारून सीमारेषेच्या पलीकडे घालविणे. जर चेंडू मैदानात टप्पा पडून सीमारेषेपलीकडे गेला तर तो चौकात समजला जातो.
आणि जर चेंडू मैदानात टप्पा न पडता सीमारेषेपलीकडे जाऊन पडला तर तो षटकार म्हणून ग्राह्य धरला जातो.

फलंदाज धावपट्टीवर धावत असताना जर क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असतात व फलंदाज क्रिज लाईन जवळ पोहोचण्याआधी चेंडूने यष्टि पाडण्याचा प्रयत्न करतात.

जर ते यात सफल झाले तर त्या यष्ट्यांच्या दिशेने धावणारा फलंदाज बाद होतो. म्हणून चेंडू यष्ट्यांपर्यंत पोहोचण्याआधी फलंदाजाला क्रीजलाईनच्या आत यावे लागते. चेंडू यष्टीरक्षक किंवा गोलंदाजाकडे येण्याआधी फलंदाज जितक्या धावा पूर्ण करतात तितक्या धावा संघाच्या नावावर जमा होतात.

प्रत्येक षटकानंतर गोलंदाज बदलला जातो.

गोलंदाजाचे उद्दिष्ट हे समोरच्या फलंदाजाला बाद करण्याचे असते. फलंदाजी करणाऱ्या संघातील एकूण 10 खेळाडू बाद झाल्यानंतर त्यांचा डाव संपुष्टात येतो. किंवा सामन्यातील एकूण षटके संपली की डाव संपवला जातो. व दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने मिळवलेल्या एकूण धावांचे आव्हान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघापुढे ठेवले जाते.

दुसऱ्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ फलंदाजी करतो व प्रथम फलंदाजी करणारा संघ त्यांना त्यांचे आव्हान पूर्ण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो.

अशा रीतीने सामन्याच्या शेवटी ज्या संघाच्या धावसंख्या जास्त होतात तो संघ विजयी ठरतो.

क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे समजले जाणाऱ्या स्पर्धा Most popular cricket tournament in world :-

क्रिकेट मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या व प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या क्रिकेटच्या स्पर्धा पुढील प्रमाणे आहे,

१. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप
२. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
३. आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्ड कप
४. चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-ट्वेंटी
५. ऑस्ट्रेलियन ट्राय सिरीज
६. नाटवेस्ट सिरीज
७. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी
८. एशिया कप
९. ॲशेस सिरीज
१०. इंडियन प्रीमियर लीग

व अशा अनेक स्पर्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवल्या जातात.

Read also:-

Share on:

Leave a Comment