सूर्य उगवला नाही तर निबंध

If Sun doesn’t rise Essay in Marathi मित्रानो तुम्ही सूर्य उगवला नाही तर या विषयावर निबंध शोधत अहात का? तर या लेखात आम्ही या बद्दल आम्ही आमचे विचार सांगितले आहेत. आम्हाला खात्री आहे कि आम्ही दिलेला हा कल्पनात्मक निबांध तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया कि सूर्य उगवला नाही तर काय होईल.

If Sun doesn't rise Essay in Marathi

सूर्य उगवला नाही तर निबंध:

मित्रानो तुम्हाला माहीतच असेल कि सूर्य हा सूर्यमालेतीळ एक तारा आहे. सूर्यामुळेच पृथ्वीवर रात्र आणी दिवस होत असतो. जेव्हा सूर्याचा उजेड पृथ्वीवर पडतो तेव्हा पृथ्वीवरील त्या भागात सकाळ असते व इतर भागात अंधार असल्यामुळे तेथे रात्र असते.

सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी उपजीविकेसाठी पूर्णपणे सूर्यावर अवलंबून आहे कारण सर्व वनस्पतीना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते.

असा आपला आधार असेलेला सूर्य उगवलाच नाही तर ?, सूर्य उगवला नाही तर सगलीकडे अंधारा चे राज्य पसरले जाईल आणि सर्वत्र काळे-कुट्ट अंधार होऊन जाईल. वारे वाहने थांबून जाईल, पृथ्वीवरील थंड असलेले भाग अजून थंड होतील त्याच प्रमाणे गरम असेलेले भाग अजून गरम होऊन जातील.

पहाट होताच आरवणारा कोंबडा आरवणार नाही. सकाळी होणारी सुंदर दिवसाची सुरवात होणार नाही. सुरवातीला भरपूर उशिरा उठणं होईल पण काही कालांतराने झोपून झोपून कंटाळा येईल. सकाळी उठल्यानन्तर ताजेतवाने वाटणार नाही.

सकाळी उठल्यानन्तर शाळेत जाण्यासाठी आवड वाटणार नाही. सर्वत्र अंधार झाल्यामुळे अंधारच फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात चोरी होऊ लागतील. सूर्याचे किरणे निसर्गावर पडल्यानंतरचे दिसणारे निसर्गाचे सौंदर्य दिसणार नाही. सर्व लहान मुले बाहेर पडून एकत्र खेळण्याचा आनंद घेऊ शकणार नाहीत.

सूर्य किरणे नसल्यामुळे सौरऊर्जेवर चालणारी सर्व उपकरणे तसेच निकामी पडून राहतील. सौर उर्जेवर निर्माण केली जाणारी वीज निर्माण होणार नाही. पशुपक्षी काळोख असल्यामुळे बाहेर हिंडू शकणार नाहीत त्यांना घरट्यातच पडून रहावे लागेल.

पर्यावरणातील अन्नसाखळी पूर्णपणे सूर्यावर अवलंबून असते जर सूर्यच उगवला नाही तर अन्नसाखळी पूर्णपणे संपुष्टात येईल. सूर्यकिरणेच पडले नाही तर झाडांची वाढ होणार नाही आणि ते जगूहि शकणार नाहीत. झाडे आणि शेतीच झाली नाही तर आपल्याला खायला अन्न मिळणार नाही आणि त्यांचा पासून मिळणारा प्राणवायू आपल्याला मिळणार नाही. आपल्याला उपाशी रहावे लागेल.

सूर्यकिरणांमुळे हवेतील जिवाणु मरूण जातात त्यामुळे निसर्गातील हव स्वछ राहते पण सूर्य उगवला नाही तर सर्वत्र दूषित हवा पसरेल. आपल्याला शरीराला आवश्यक असण्यारे जीवनसत्व-ड सुद्धा आपल्याला सूर्याकडून मिळते परंतु ते आपल्याला मिळणार नाही

सूर्य उगवला नाही तर पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पिभवन होणार नाही आणि त्यामुळे ढग तयार होणार नाहीत आणि परिणामी पाऊस पडणार नाही. आणि जर पाऊसच नाही पडला तर आपल्याला पिण्यास आवश्यक असनारे पाणी देखील मिळणार नाही.

अशाप्रकारे सूर्य उगवला नाहीतर निसर्गचक्र विस्कळीतच होऊन जाईल. सर्वांवर उपासमारीची वेळ येईल व सर्व सजीव सृष्टी नष्ट होऊन जाईल.

अशा प्रकारे मित्रानो आम्ही If Sun doesn’t rise Essay in Marathi या लेखात सूर्य उगवला नाही तर काय परिणाम होईल याबद्दल सांगितले आहे. आम्हाला खात्री आहे कि तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. जर हा कल्पनात्मक निबंध तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

हे देखील वाचा:

Share on:

Leave a Comment