पाऊस नसेल तर मराठीत निबंध If rain is not there in Marathi Essay

If rain is not there in Marathi Essay मित्रानो तुम्ही पाऊस नसेल तर या विषयावर निबंध शोधत अहात का? या लेखात आम्ही या कल्पनात्मक विषयावरती आमचे विचार मांडले आहेत. पावसाळा म्हणजे निसर्गातील गरजेचं असणाऱ्या तीन ऋतूंनपैकी एक ऋतू. या पावसावर किती तरी गोष्टी अवलंबून असतात तर मग हा पाऊसच नसेल तर काय झाले असते बरं, चला तर हे जाणून घेऊया.

If rain is not there in Marathi

If rain is not there in Marathi Essay पाऊस नसेल तर निबंध

If rain is not there in Marathi Essay

पाऊस हे आपल्याला देवाने दिलेल्या वरदानापैकी एक आहे. पाऊस हा जुलै ते सप्टेंबर महिन्या दरम्यान पृथ्वीवर पडतो. पावसामुळे झाडे वाढतात, शेती होते ज्यामुळे आपल्याला अन्न मिळते, नद्या, विहिरी, तलाव भरून जातात. वातावरण एकदम स्वछ आणि सुंदर होऊन जाते.

असा हा पाऊस नसेल तर सर्वत्र मात्र दुष्काळ पडले असते. पाऊस पडल्यानन्तर पृथ्वीचे जे सौन्दर्य दिसते ते दिसले नसते. पाऊस पडताना येणारा सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य आपण पाहू शकलो नसतो.

आपला पोशिंदा असणारा शेतकरी शेती करु शकला नसता आणि जर शेतीच करता आली नसती तर आपल्याला खायला अन्नच मिळाले नसते, आपल्याला उपाशी राहावे लागले असते.

नद्या, नाले, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या असत्या, आपल्याला नद्यांमध्ये आणि विहिरीमध्ये पोहण्याचे आनंद लुटता आले नसते. अनेक प्राणी, पक्षी नद्यांमधून पाणी पितात व आपली तहान भागवतात, तर त्याना पाण्याच्या शोधात हिंडत राहावे लागले असते.

आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी आपल्याला प्यायला मिळाले नसते. जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी आणि अन्नच मनुष्याला मिळाले नसते तर मात्र मनुष्य मृत्युमुखी पडू गेले असते.

लहान मुलांना पाण्यात गाणे बोलत बोलत नाचण्याचा, वहीतील शेवटचे पान फाडून पाण्यात होडी बनवून सोडण्याचा आनंद घेता नाही आला नसता.

पाऊस नसेल तर जमीन कोरडी पडून, जमिनीला चिरा पडल्या असत्या. अशा कोरड्या जमिनीवर कोणतेच झाड वाढले नसते आणि जर झाडेच वाढले नसती तर आपल्याला फळ, फुल काहीच मिलाली नसती. झाडे हवेतील घातक असणारा हरितगृह वायू CO2 शोषतात, पण जर झाडेच नसतील तर हा वायू तसाच वातावरणात पडून राहीला असता ज्यामुळे अनेक श्वसनाचे त्रास उध्दभवले असते.

पाऊस नसेल तर जंगले, अभयारण्य झाडांशिवाय रिकामे होऊन गेली असती. जंगल व अभयारण्यातील प्राणी, पक्षी अन्न व पाण्यासाठी इथे तिथे भटकू लागती असती.

पाऊस पडल्यानन्तर सुंदर व स्वच्छ होणारे निसर्ग मात्र घाण आणि प्रदूषित होऊन गेले असते. अनेक प्रकारचा रोगराईने निसर्गात धुमाकूळ घातले असते.

अशा प्रकारे जर पाऊसच नसेल तर पृथ्वीवरील संपूर्ण सजीवसृष्टी संपुष्टात आली असती.

तर मित्रानो अशा प्रकारे आम्ही या If rain is not there in Marathi Essay लेखात जर पाऊस नसेल तर काय परिणाम झाले असते याबद्दलचे विचार लिहले आहे. आपल्याला हा लेख कसा वाटलं आहे हे खाली असलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व जर हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा.

Read aslo:-

Share on:

Leave a Comment