[मराठी] Gautam buddha thoughts in Marathi 2021 | Gautam buddha vichar in Marathi

मित्रांनो तुम्ही Gautam buddha thoughts in marathi या विषयावर माहिती शोधत आहात का? तर आम्ही या लेखात गौतम बुद्धांचे सुविचार सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

गौतम बुद्ध हे एक महान धर्मगुरू होते. त्यांनी दिलेली शिकवण ही बौद्ध धर्माचा पाया मानले जाते. त्यांनी जगाला सत्य, मानवता, समानता व शांतीचा संदेश दिला. बुद्धांनी जगाला अहिंसेचा मार्ग दिला.तसेच त्यांच्या मते माणसाच्या इच्छा ह्याच त्याच्यावरील संकटाचे मूळ कारण आहे. Gautam buddha thoughts in marathi लेखात आम्ही त्यांच्या काही शिकवणी नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे.

Gautam buddha thoughts in marathi
gautam-buddha-thoughts-in-marathi

Gautam buddha vichar in Marathi | Gautam buddha thoughts in marathi

१. ज्ञान हे धनाहूनही श्रेष्ठ आहे कारण धनाची रक्षा तुम्हाला करावी लागते परंतु ज्ञान हे नेहमी तुमची रक्षा करीत असते.

२. आपल्याकडे जे आहे त्याचा गर्व करू नका जे दुसऱ्याकडे आहे त्यावर जळू नका कारण गर्व करणाऱ्या व जळणाऱ्या व्यक्तीच्या मनाला कधी शांतता ( Peace ) मिळत नाही.

३. कोणतेही काम स्वतःच्या कर्तुत्वावर पूर्णत्वास न्या, त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका.

४. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे उत्तम आहे कारण हा विजय फक्त तुमचाच असतो व ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

५. रागावर प्रेमाने, वाईट वृत्ती वर चांगल्या वृत्तीने व खोट्यावर खऱ्यानेच विजय मिळवता येतो.

६. ज्ञानाने सामर्थ्य प्राप्त होते व उत्तम चारित्र्याने सन्मान प्राप्त होतो.

७. जर तुम्ही दुसऱ्यासाठी दीप प्रज्वलित केलात तर तो तुमचाही मार्ग प्रकाशमान करेल.

८. माणसाला आपल्या लक्ष्यापर्यंत ( Goal ) पोहोचण्यासाठी स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे.

९. निरर्थक वाद घालण्यापेक्षा शांतता सर्वश्रेष्ठ असते.

१०. या तीन गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाहीत; सूर्य, चंद्र आणि सत्य.

११. सज्ञान व्यक्तीमध्ये जगाचे रूपांतर स्वर्गामध्ये करण्याचे सामर्थ्य असते.

१२. आरोग्याशिवाय आयुष्य हे आयुष्य नाही तर ती एक त्रासदायक स्थिती आहे व मृत्यूचे आपल्यावरील सावट आहे.

१३. जी व्यक्ती क्रोधित विचारांपासून मुक्त आहे ती नक्कीच शांती प्राप्त करू शकते.

१४. शक्यतेची सीमा पडताळून पाहण्याचा एकच मार्ग आहे, अशक्यच्याही पुढे निघून जाणे.

१५. जो माणूस आपले आयुष्य समजूतदारपणे व्यतीत करतो त्याला मृत्यूचे भय वाटत नाही.

१६. ज्याचे मन कोणत्याही इच्छांनी भरलेले नाही त्याला कशाचेही भय नाही.

१७. मोजल्या जाणाऱ्या गोष्टींचा अंत निश्चित आहे त्यामुळे स्वतःच्या वयाचा व पैशाचा कधीही गर्व ( Proud ) करू नये.

१८. ताकदीची गरज ही फक्त वाईट गोष्ट करण्यासाठीच असते कारण जगात सर्व काही मिळवण्यासाठी प्रेमच पुरेसे आहे.

१९. जो सत्यपरिस्थितीचा विचार करून कार्य करतो तो या जगात व इतरत्र सुखी आहे.

२०. सुख संपादन करण्याचा कोणताच मार्ग नाही म्हणूनच आनंदी राहणे हा त्यावर एकच मार्ग आहे.

२१. सज्ञान व्यक्ती कधीही मरत नाही व अज्ञानी व्यक्ती ही आधीपासूनच मेलेली असते.

२२. कोणत्याही लहान कामाची केलेली सुरुवात ही मोठ्या कामाला अंतापर्यंत नेण्याची केलेली सुरुवात असते. तुम्ही सुरुवात लहान कामापासून करता की मोठ्या कामापासून हे गरजेचे नसते. जर तुम्ही केलेल्या सुरुवातीला त्या कामाच्या अंतापर्यंत पोहोचवु शकत असाल तर एक दिवस तुम्ही तुम्हाला हवे ते प्राप्त करू शकता.

२३. खोटं बोलण्याचा आवाज जरी खरं बोलणाऱ्या गप्प बसू शकत असला तरीही खरे बोलणाऱ्याचे मौन खोटं बोलणार याला संपूर्ण हादरवून टाकते.

२४. खोटेपणाला भविष्य नसते. खोटेपणा तुमचा आजचा दिवस सुखी करेल पण उद्या नक्कीच करणार नाही.

२५. धीर ठेवणे त्रासदायक जरी असले तरी त्याचे फळ निश्चितच गोड असते.

२६. जर एखादे काम करणे फायद्याचे असेल तर ते अत्यंत मनापासून करा.

२७. प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या शरीरातील व्याधींचा निर्माता आहे.

२८. वाईट विचारांपासून अलिप्त राहण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे चांगल्या विचारांना आपल्या आचरणात आणणे.

२९. आपण स्वतःच स्वतःला वाचवू शकतो. आपल्या मार्गावर आपल्यालाच चालायचे आहे.

३०. मी भूतकाळात काय केले याचा विचार करीत नाही, मी वर्तमानात काय करू शकतो याचा विचार करतो.

३१. तुमचे प्रत्येक स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा ते मिळवण्याची हिम्मत तुमच्यात असेल.

३२. इतरांना मदत करण्यात जर आम्ही यशस्वी ठरलो तर आम्हाला मदत कोण करेल.

३३. आपल्या स्वतःच्या निर्वाहासाठी स्वतः प्रयत्न करा व दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.

३४. मन व शरीराच्या उत्तम आरोग्याचे रहस्य म्हणजे; भूतकाळातील गोष्टींवर दुःख करू नका व भविष्याची चिंता करू नका आपल्या बौद्धिक क्षमतेवर व इमानदारीवर वर्तमानात जगा.

३५. कोणतीही व्यक्ती तिच्या स्वतःच्या विचारांवर स्वतःचे विश्व निर्माण करू शकते.

३६. भूतकाळ अगोदरच संपला आहे भविष्य यायला अजुन उशीर आहे तुमच्या जगण्यासाठी वर्तमान हा फक्त एकच क्षण आहे.

३७. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान हे सर्वात मौल्यवान धन आहे, व इमानदारी हे सर्वात मोठे नाते आहे.

३८. धीर ठेवणे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा जग सुद्धा थेंबाथेंबाने भरले जाते.

Read also:-

Share on:

Leave a Comment