गाडी नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

मित्रांनो आज आपण या लेखामध्ये गाडी नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे या संदर्भात माहिती करून घेणार आहोत.

नवीन गाडी नावावर करणे, जुनी गाडी खरेदी केल्यानंतर तिच्या मालकीचे हस्तांतरण करणे तसेच वाहन मालकाचा मृत्यू झाल्यानंतर वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण करणे अशा विविध प्रक्रियांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंदर्भातील माहिती यात समाविष्ट केली आहे.

documents required to register the vehicle in marathi

नवीन गाडी नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे:

नवीन वाहन खरेदी केल्यानंतर सात दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक असते व यासाठी वाहन मालकाला खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

१) फॉर्म 20

२) वाहन वितरकाकडून मिळालेले विक्री प्रमाणपत्र: फॉर्म 21 (Sale certificate)

३) रस्ता योग्यता प्रमाणपत्र (फॉर्म 22 व 22अ) (Road worthiness certificate): हे प्रमाणपत्र उत्पादकाकडून दिले जाते व वितरकाकडून मिळवता येते.

४) रोड टॅक्स एकरकमी असल्यास वाहनाचे वितरकाकडून मिळालेले खरेदी चलन (Purchase invoice)

५) तात्पुरती नोंदणी (Temporary registration)

६) वाहनाचा विमा उतरवल्याचे प्रमाणपत्र (Vehicle insurance certificate)

७) वाहन मालकाचा पत्त्यासंदर्भातील पुरावा

८) वाहन आयात केले असल्यास त्यासंदर्भातील Bill of entry

९) जकात भरल्याची पावती (महानगरपालिका क्षेत्रासाठी)

१०) आयात केलेल्या वाहनासाठी सीमाशुल्क मंजुरी प्रमाणपत्र, लायसेंन्स तसेच बॉंड

११) ट्रेलर वाहन असल्यास परिवहन आयुक्तांद्वारा रचनेला मान्यता दिल्याचे प्रमाणपत्र

१२) वाहन महाराष्ट्र राज्याबाहेरून खरेदी केले असल्यास प्रवेश कर प्रमाणपत्र

याव्यतिरिक्त वाहन अपंगांकरिता असल्यास त्या संदर्भातील वाहन निर्मात्याद्वारा दिलेले प्रमाणपत्र तसेच शेतीपयोगी ट्रॅक्टर किंवा ट्रेलर साठी दिल्या जाणाऱ्या कर सवलतीसाठी ७/१२ उतारा अशा इतर कागदपत्रांची देखील आवश्यकता भासते.

जुने गाडी नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे (मालकीचे हस्तांतरण):

जुने वाहन खरेदी केल्यास त्याच्या मालकीचे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता भासते.

१) फॉर्म 29: वाहन विकणाऱ्याचे घोषणापत्र

२) फॉर्म 30: वाहन खरेदी करणार्‍याचे घोषणापत्र

३) फॉर्म 28 (3 प्रत): वाहन खरेदी करणारी व्यक्ती इतर नोंदणी प्राधिकरणाच्या अधिकारक्षेत्राअंतर्गत येत असल्यास

४) वाहनाचे PUC प्रमाणपत्र

५) वाहनाचा विमा उतरवल्याचे प्रमाणपत्र (Vehicle insurance certificate)

६) वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (Registration certificate/ RC)

७) कर भरल्याचे प्रमाणपत्र (Tax certificate)

८) पत्त्यासंदर्भातील पुरावा

वाहन मालकाच्या मृत्यूनंतर मालकीचे हस्तांतरण करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

वाहन मालकाच्या मृत्यूनंतर वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता भासते.

१) फॉर्म 30 व फॉर्म 31

२) मृत वाहन मालकाचे मृत्यूचे प्रमाणपत्र

३) वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (Registration certificate/ RC)

४) वारस असल्याचे प्रमाणपत्र

५) वारसाचे प्रतिज्ञापत्र

६) भांडवलदाराकडून (Financier) ना हरकत प्रमाणपत्र (असल्यास)

७) पत्त्यासंदर्भातील पुरावा

नोंद: गाडी नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे हा लेख लिहिण्यामागील मूळ हेतू या विषयासंदर्भातील माहिती उपलब्ध करून देणे इतकाच आहे.

हे देखील अवश्य वाचा:

Share on:

Leave a Comment