Definition of kriyapad in marathi [मराठी] | kriyapad in marathi

Definition of kriyapad in marathi मित्रांनो तुम्हाला क्रियापद व त्याचे प्रकार याबद्दल माहिती शोधत आहात का? तर या लेखात आम्ही क्रियापद व त्याचे प्रकार उदाहरणासहित सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Definition of kriyapad in marathi

Definition of kriyapad in marathi क्रियापदाची मराठी मध्ये व्याख्या

क्रियापद kriyapad meaning in marathi:-

१. वाक्यातील जो शब्द क्रिया दर्शवतो व त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास मदत होते अशा शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

२. उदाहरणार्थ (Example):- राम क्रिकेट खेळतो.

३. या वाक्यात खेळतो हा शब्द खेळण्याची क्रिया दर्शवतो व त्यामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो म्हणूनच या वाक्यात खेळतो हा शब्द क्रियापदाची भूमिका बजावतो.

क्रियापदाचे मुख्य प्रकार:-

क्रियापदांमध्ये मुख्यत्वे सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार असतात.

१. सकर्मक क्रियापद:-

जे क्रियापद वाक्यात वापरले असल्यास वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता भासते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- राम क्रिकेट खेळतो.

वरील ‘खेळतो’ या क्रियापदाचे वाक्य पूर्ण होण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे म्हणून ‘खेळतो’ हे क्रियापद सकर्मक क्रियापद आहे.

२. अकर्मक क्रियापद:-

क्रियापद वाक्यात वापरले असल्यास वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता भासत नाही अशा क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात.

उदाहरणार्थ:- राम निघून गेला.

या वाक्यात वाक्य पूर्ण करण्यासाठी धर्माची गरज भासत नाही.

अकर्मक क्रियापदाचे तीन प्रकार पडतात:

१. स्थितीदर्शक:-

क्रियेची स्थिती दर्शवणाऱ्या अकर्मक क्रियापदास स्थितीदर्शक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- राम क्रिकेटर आहे.

इतके आहे हे क्रियापद हर आमची सध्याची वस्तुस्थिती दर्शवते.

२. स्थित्यंतरदर्शक:-

जे अकर्मक क्रियापद वस्तुस्थिती मध्ये होणारा बदल दर्शवतो त्याला स्थित्यंतरदर्शक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- राम क्रिकेटर झाला.

या वाक्यातील झाला हे क्रियापद रामची बदललेली स्थिती दर्शवते.

३. गतिदर्शक:-

वाक्यातील क्रियेची गती दर्शवणाऱ्या अकर्मक क्रियापदाला गतीदर्शक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- राम मुंबईला पळाला.

वाक्यातील पळणे, धावणे, चालणे यासारखे क्रियापद गती दर्शवतात म्हणून त्यांना गतीदर्शक क्रियापद असे म्हणतात.

क्रियापदाचे इतर प्रकार:-

१. द्विकर्मक क्रियापदे:-

जे क्रियापद वापरण्यास वाक्यात दोन कर्मांची (प्रत्यक्षकर्म व अप्रत्यक्षकर्म) आवश्यकता भासते अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद म्हणतात.

उदाहरणार्थ:- प्रशिक्षक रामला क्रिकेट शिकवतात.

या वाक्यात ‘क्रिकेट’ हे प्रत्यक्षकर्म आहे व ‘राम’ हे अप्रत्यक्षकर्म आहे म्हणून ‘शिकवतात’ हे द्वि कर्म क्रियापद आहे.

२. उभयविध क्रियापद:-

जे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारांमध्ये मोडले जाते अशा क्रियापदाला उभयविध क्रियापद म्हणतात.

उदाहरणार्थ:- रामच्या घराचे छप्पर उडाले : सकर्मक

त्याच्या घराचे छप्पर उडाले : अकर्मक

या दोनही वाक्यात ‘उडाले’ हे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही भूमिका निभावते म्हणून या क्रियापदाला उभयविध क्रियापद म्हणतात.

३. अपूर्ण विधान क्रियापद:-

जे क्रियापद वापरल्यास वाक्याला अर्थ प्राप्त होण्यासाठी विधानपूरक शब्दाची गरज भासते अशा शब्दाला अपूर्णविधान क्रियापद म्हणतात.

उदाहरणार्थ:- राम डॉक्टर झाला.

या वाक्यात डॉक्टर हा विधान पूरक शब्द आहे.

४. सहाय्यक क्रियापद:-

जी क्रियापद वाक्य पूर्ण करण्यासाठी धातुसाधितानंतर वापरले जाते अशा क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.

( sahayak kriyapad examples in marathi ) उदाहरणार्थ:- राम क्रिकेट खेळणार आहे.

यामध्ये ‘खेळणार’ हे धातुसाधित आहे व ‘आहे’ हे सहाय्यक क्रियापद म्हणून वापरले आहे. त्यामुळे ‘खेळणार आहे’ हे एकत्रितपणे संयुक्त क्रियापद आहे.

. संयुक्त क्रियापद sanyukta kriyapad in marathi:-

काही वाक्यात धातुसाधित व सहाय्यक क्रियापद एकत्रितरीत्या क्रिया दर्शवतात म्हणून धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांना एकत्रितरीत्या संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- राम क्रिकेट खेळणार आहे.

यामध्ये ‘खेळणार’ हे धातुसाधित आहे व ‘आहे’ हे सहाय्यक क्रियापद आहे त्यामुळे ‘खेळणार आहे’ हे एकत्रितपणे संयुक्त क्रियापद आहे.

. सिद्ध क्रियापद:-

जी मूळ क्रियापदे आहेत व ते कोणत्याही नामापासून तयार झाली नाहीत अशा क्रियापदांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- येणे, जाणे, उठणे इत्यादी.

. साधित क्रियापद:-

जी क्रियापदे मूळ नसून ती इतर शब्दांपासून म्हणजेच धातूपासून तयार होतात अशा क्रियापदांना साधित क्रियापद म्हणतात.

उदाहरणार्थ:- खेळतो : (मूळ धातु : खेळ)

पाणावले : (मूळ धातू : पाणी)

८. प्रयोजक क्रियापद:-

जे क्रियापद वापरल्यास मुख्य कर्ता दुसर्‍या कर्त्यास कर्म करण्यास प्रवृत्त करत असेल तर त्या क्रियापदास प्रयोजक क्रियापद म्हणतात.

उदाहरणार्थ:- आई मुलांना खेळवते.

या वाक्यात आई हा मुख्य करता मुलांना खेळण्यास म्हणजेच कर्म करण्यास प्रवृत्त करीत आहे. म्हणून खेळवते हे प्रयोजक क्रियापद आहे.

९. शक्य क्रियापद:-

जे क्रियापदाचा वापर वाक्यातील क्रियेची शक्यता दर्शवण्यासाठी केला जातो त्या क्रियापदास शक्य क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- मला इतकेच धावता येईल.

या वाक्यात येईल हे क्रियापद शक्यता दर्शवित आहे.

१०. अकर्तूक/ भावकर्तूक क्रियापद:-

जे क्रियापद वापरले असल्यास वाक्यात प्रत्यक्ष कर्ता नसतो तसेच क्रियापदातील भाव हाच कर्ता असतो अशा क्रियापदास अकर्तूक किंवा भावकर्तूक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- आज लवकर उजाडले.

या वाक्यात कर्ता नसून उजाडणे हा भावच कर्त्याची भूमिका बजावतो.

११) गौण क्रियापद:-

ज्या क्रियापदातील मूळ धातू ओळखता येत नाही अशा क्रियापदाला गौण क्रियापद म्हणतात.

उदाहरणार्थ:- पाहिजे, नको, नाही इत्यादी.

१२) करणरुपी / अकरणरुपी क्रियापद:-

काही क्रियापद हे वाक्यामधील होकारार्थी भाव दर्शवतात अशा क्रियापदांना करणरुपी क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- असावे, आहे, करावे इत्यादी.

जे क्रियापद वापरल्यामुळे वाक्यामध्ये नकारार्थी भाव उत्पन्न होतो अशा क्रियापदांना अकरणरुपी क्रियापद असे म्हणतात

उदाहरणार्थ:- नाही, नसावे, नलगे इत्यादी.

Share on:

Leave a Comment