भारतरत्न पुरस्कार बद्दल संपूर्ण माहिती

मित्रहो आज आपण या लेखात भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारा बद्दल म्हणजेच भारत रत्न पुरस्काराविषयी माहिती करून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Bharat Ratna information in Marathi

Bharat Ratna information in Marathi | भारतरत्न पुरस्कार माहिती मराठी

भारतरत्न पुरस्कार काय आहे?

भारतरत्न पुरस्कार हे भारतातील सर्वात मोठे नागरी सन्मान आहे. हे पुरस्कार भारतामध्ये त्याच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीस दिले जाते. हा पुरस्कार विज्ञान, कला, मानवविकास, समाजसेवा अशा अनेक क्षेत्रात आपले आयुष्यभर योगदान देऊन उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती कडून देण्यात येते.

२०१४ वर्षांपासून भारतरत्न पुरस्कारासाठी क्रीडा क्षेत्राचा देखील समावेश करण्यात आला. भारतातील पहिला खेळाडू क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला ४ फेब्रुवारी २०१४ दिवशी भारतरत्न पुरस्कार मिळाले.

प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त तीन भारतरत्न पुरस्कार विजेत्याना दिले जाते.

भारतरत्न पुरस्कार हे फक्त भारतीय रहिवासींना न देता भारताबाहेरील व्यक्ती ज्यांनी भारत देशासाठी खूप मोलाची कामगिरी केली आहे त्यांना देखील दिले जाते जसे कि खान अब्दुल गफार खान, हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होते.

भारतरत्न पुरस्कारासाठी नामनिर्देशिताची निवड हि त्याच्या पद, व्यवसाय, लिंग, जातीवरून न ठरवता त्याच्या उत्तम कामगिरीसाठी केली जाते.

प्रथम भारतरत्न पुरस्कार हे चक्रवर्ती राजगोपालाचारी (भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (भारताचे पहिले उपराष्ट्रपती) आणि डॉ. चंद्रशेखर वेंकट रामन (भौतिकशास्त्रज्ञ) याना मिळाले.

इंदीरा गांधी या पहिल्या महिला होत्या, ज्यांना १९७१ मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं. इंदीरा गांधी या भारतातील तिसऱ्या पंतप्रधान होत्या.

मदर तेरेसा याना २५ जानेवारी, १९८० मध्ये संपूर्ण आयुष्यभर केलेल्या समाजसेवेमुळे भारतरत्न हे पुरस्कार मिळाले.

१९५५ मध्ये हे पुरस्कार मरणोत्तर देखील देण्याचे निश्चित करण्यात आले, आणि आजपर्यंत १४ जणांना हे पुरस्कार मरणोत्तर देण्यात आले.

भारतरत्न पुरस्काराचा गैर वापर केल्यास विजेत्याकडून भारतरत्न पुरस्कार परत घेण्याचा अधीकार भारतातील राष्ट्रपती कडे असतो.

भारतरत्न पदक कसे दिसते?

भारतरत्न पदक हे अलिपूर मिंट, कोलकाता येथे बनविले जाते. हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराच्या असते, जे कांस्य धातूचे असते आणि यावर समोरच्या बाजूस किरणांसोबत असणारे सूर्याचे चित्र असते, जे प्लॅटिनम धातूपासून बनलेले असते व त्याखाली “भारत रत्न” असे पित्तल धातूपासून बनलेले शब्द असते.

पदकाच्या मागच्या बाजूस देखील प्लॅटिनम धातूपासून बनलेले भारताचे राजकीय चिन्ह असते आणि त्याचप्रमाणे त्या खाली “सत्यमेव जयते” असे पित्तल धातूपासून बनलेले शब्द असते.

हे पदक आकारामध्ये २.३ इंच इतके लांबीमध्ये आणि १.९ इंच इतके रुंदीमध्ये असते आणि या पदकाला सफेद रंगाची कापडी रिबीन असते.

भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

भारतरत्न पुरस्काराची सुरवात ६८ वर्ष अगोदर १९५४ पासून झाली व त्यावर्षापासून २०१९ वर्षापर्यँत एकूण ४८ पुरस्कार विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात आली. भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्कारार्थीला अनेक सुविधा दिल्या जातात.

भारतरत्न पुरस्कार कुठे दिले जाते?

भारतरत्न पुरस्कार समारंभ सोहळा न्यू दिल्ली मधील राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित केले जाते व हे पुरस्कार राष्ट्रपती कडून त्या विजयी नामांकिताना दिले जाते.

अनेकदा विचारले जाणारे प्रश्न:

 1. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली?

  भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ६८ वर्ष अगोदर १९५४ मध्ये झाली.

 2. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण?

  भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय चक्रवर्ती राजगोपालाचारी , डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ. चंद्रशेखर वेंकट रामन हे होते.

 3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण?

  भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला इंदीरा गांधी या होत्या.

 4. भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू कोणता?

  भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू हा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर होता.

 5. भारतरत्न पुरस्कार कोठे दिला जातो?

  भारतरत्न पुरस्कार हा न्यू दिल्लीमधील राष्ट्रपती भवनामधे दिले जाते.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही Bharat Ratna information in Marathi या लेखात भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटलं त्याबद्दल आम्हाला खाली असणाऱ्या कंमेंट बॉक्स द्वारे नक्की कलवा. धन्यवाद.

हे देखील वाचा:

मीडिया क्रेडिट्स:

 • Bharat Ratna, India’s highest civilian award image by Wikipedia
Share on:

Leave a Comment