बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाची माहिती

Bank of Maharashtra home loan information in Marathi वाचकहो तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाविषयी जाणून घेण्यास इच्छुक आहात का तर आम्ही या लेखात बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी आम्ही आशा करतो.

Bank of Maharashtra home loan information in Marathi

बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाची माहिती Bank of Maharashtra home loan information in Marathi

बँक ऑफ महाराष्ट्र ने गृहकर्जासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी विविध योजना तयार केल्या आहेत तसेच यात महिलांसाठी व भारतीय संरक्षण क्षेत्रातील व्यक्तीसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमुळे अनेक ग्राहकांनी त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जाची वैशिष्ट्ये:

बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:-

१) नियमितपणे EMI भरल्यास शेवटचे दोन हप्ते माफ केले जातात.
२) स्त्रियांना तसेच भारतीय संरक्षण दलातील व्यक्तींना ०.०५ पर्यंत सूट
३) ३० वर्षापर्यंतचा परतफेड कालावधी
४) वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत कर्ज परतफेड करण्यास अनुमती
५) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.६७ लाखापर्यंत सबसिडी
६) जलद प्रक्रिया व मंजुरी


बँक ऑफ महाराष्ट्र द्वारा कोणत्या कारणांसाठी गृहकर्ज दिले जाते?

१) घर /फ्लॅटची खरेदी/ बांधकाम/ विस्तार
२) नवीन प्लॉट खरेदी करून त्यावर बांधकाम करण्यासाठी
३) घराच्या/ फ्लॅटच्या दुरुस्ती नुतनीकरण तसेच घरामध्ये बदल करण्यासाठी


अर्जदाराची पात्रता:

गृहकर्जाच्या योजनांनुसार गृहकर्जासाठी असलेल्या पात्रतेच्या अटी वेगवेगळ्या असतात

अ) महा सुपर हाऊसिंग लोन – घर /फ्लॅटची खरेदी/ बांधकाम/ विस्तार:-
नोकरी करणारी/ स्वयंरोजगारावर अवलंबून असणारी/ व्यापारी तसेच शेतकरी व्यक्तींना हे गृहकर्ज उपलब्ध आहे.

ब) महा सुपर हाऊसिंग लोन – नवीन प्लॉट खरेदी करून त्यावर बांधकाम करण्यासाठी:-
नोकरी करणारी/ स्वयंरोजगारावर अवलंबून असणारी/ व्यापारी तसेच शेतकरी व्यक्तींना हे गृहकर्ज उपलब्ध आहे.

क) महा सुपर हाऊसिंग लोन – घराच्या/ फ्लॅटच्या दुरुस्ती नुतनीकरण तसेच घरामध्ये बदल करण्यासाठी:

या योजनेसाठी लागणारी पात्रता हे अर्जदाराच्या रोजगाराच्या पद्धतीनुसार वेगळी असते.

१] नोकरी करणाऱ्यांसाठी: किमान तीन लाख वार्षिक उत्पन्न (मागील वर्षाचे)
मागील दोन वर्षांचा आयकर परतावा किंवा फॉर्म 16 ची प्रत आवश्यक.

२] स्वयंरोजगार करणारी व्यक्ती: मागील वर्षाच्या आयकर परतावा नुसार कमीत कमी तीन लाख वार्षिक उत्पन्न. तसेच मागील दोन वर्षांचा आयकर परतावा आवश्यक.

३] व्यापारी व्यक्तींसाठी: मागील वर्षाच्या आयकर परतावानुसार कमीत कमी तीन लाख वार्षिक उत्पन्न.
मागील तीन वर्षांचा आयकर परतावा आवश्यक.

४] शेतकरी: शेती व शेती विषयक जोडधंद्यांमधून मिळणारे एकूण खात्रीशीर वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असणे गरजेचे आहे.


बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जाचे विविध योजना:

१] महा सुपर हाऊसिंग लोन:- घर /फ्लॅटची खरेदी/ बांधकाम/ विस्तार:-

 • नवीन घर बांधण्यासाठी तसेच घर किंवा फ्लॅट खरेदीसाठी हे गृह कर्ज दिले जाते (नोंद: खरेदी करत असलेले घर/ फ्लॅट तीस वर्षांपेक्षा जास्त जुने नसावे)
 • बिल्डर/ गृहनिर्माण संस्था इत्यादींकडून तयार किंवा बांधकाम सुरू असलेले फ्लॅट खरेदी करण्यासाठी.
 • घराच्या किंवा फ्लॅटच्या विस्तारासाठी.
 • दुसऱ्या बँकांमधून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गृहकर्ज ट्रान्सफर करण्यासाठी.

अ) पात्रता:
नोकरी करणारी/ स्वयंरोजगारावर अवलंबून असणारी/ व्यापारी तसेच शेतकरी व्यक्तींना हे गृहकर्ज उपलब्ध आहे.

ब) गृहकर्जाची मर्यादा:
बँक ऑफ महाराष्ट्र मधून ग्राहकाला मिळणाऱ्या गृहकर्जाची अधिकतम मर्यादा पुढील बाबींवर अवलंबून असते.

 • Maximum permissible LTV
 • Permissible deduction norms
 • कर्जाची रक्कम

क) मार्जिन दर:
या योजनेमध्ये द्यावा लागणार या मार्जिनची टक्केवारी पुढील प्रमाणे असते
तीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी: १०%
तीस लाखांपेक्षा जास्त गृहकर्जासाठी: २०%

ड) स्थगिती कालावधी: ३६ महिन्यांपर्यंत

ई) परतफेड कालावधी: ३० वर्षांपर्यंत तसेच अर्जदाराला त्याच्या वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंत कर्ज फेडता येते.

२] महा सुपर हाऊसिंग लोन- नवीन प्लॉट खरेदी करून त्यावर बांधकाम करण्यासाठी:-

हे गृहकर्ज नवीन प्लॉट खरेदी करून त्यावर बांधकाम करण्यासाठी दिले जाते.

अ) पात्रता:
नोकरी करणारी/ स्वयंरोजगारावर अवलंबून असणारी/ व्यापारी तसेच शेतकरी व्यक्तींना हे गृहकर्ज उपलब्ध आहे.

ब) गृहकर्जाची मर्यादा:
बँक ऑफ महाराष्ट्र मधून ग्राहकाला मिळणाऱ्या गृहकर्जाची अधिकतम मर्यादा पुढील बाबींवर अवलंबून असते.

 • Maximum permissible LTV
 • Permissible deduction norms
 • कर्जाची रक्कम

क) मार्जिन दर:
या योजनेमध्ये द्यावा लागणार या मार्जिनची टक्केवारी पुढील प्रमाणे असते
तीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी: १०%
तीस लाखांपेक्षा जास्त गृहकर्जासाठी: २०%

ड) स्थगिती कालावधी: प्लॉट खरेदीसाठी स्थगिती कालावधी नसतो पण बांधकाम करण्यासाठी कर्ज वितरित झाल्यानंतर ३६ महिन्यांपर्यंत स्थगिती कालावधी मिळतो.

ई) परतफेड कालावधी: बँक अर्जदाराला परतफेड करण्यासाठी कमाल ३० वर्षांपर्यंतचा कालावधी देते तसेच अर्जदाराला त्याच्या वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंत कर्ज फेडता येते.

३] महा सुपर हाऊसिंग लोन- घराच्या/ फ्लॅटच्या दुरुस्ती नुतनीकरण तसेच घरामध्ये बदल करण्यासाठी

अ) पात्रता:
या योजनेसाठी लागणारी पात्रता हे अर्जदाराच्या रोजगाराच्या पद्धतीनुसार वेगळी असते
नोकरी करणाऱ्यांसाठी:
किमान तीन लाख वार्षिक उत्पन्न (मागील वर्षाचे)
मागील दोन वर्षांचा आयकर परतावा किंवा फॉर्म 16 ची प्रत आवश्यक.

स्वयंरोजगार करणारी व्यक्ती:
मागील वर्षाच्या आयकर परतावा नुसार कमीत कमी तीन लाख वार्षिक उत्पन्न.
मागील दोन वर्षांचा आयकर परतावा आवश्यक.

व्यापारी व्यक्तींसाठी:
मागील वर्षाच्या आयकर परतावा नुसार कमीत कमी तीन लाख वार्षिक उत्पन्न.
मागील तीन वर्षांचा आयकर परतावा आवश्यक.

शेतकरी:
शेती व शेती विषयक जोडधंद्यांमधून मिळणारे एकूण खात्रीशीर वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असणे गरजेचे आहे.

ब) कर्जाची अधिकतम मर्यादा:-
दुरुस्ती व नूतनीकरणासाठी मिळणाऱ्या गृहकर्जाची कमाल मर्यादा पुढील बाबींवर ठरवली जाते.
१) दुरुस्ती नुतनीकरण बदलाचा एकूण खर्चाच्या 100 टक्‍क्‍यांपर्यंत.
२) कर्जाची कमाल मर्यादा: मालमत्तेच्या मूल्यांकन अहवालानुसार (valuation report) एकूण मूल्याच्या २५% रक्कम (valuation report तीन वर्षांपेक्षा जास्त जुना नसावा)
३) वरील दोन पर्यायांमधील कमी असलेली रक्कम कर्ज म्हणून दिली जाते.

क) परतफेड कालावधी: कमाल २० वर्षे
ड) स्थगिती कालावधी: नाही


व्याजदर:

बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जावरील व्याजदर हा पुढील महत्त्वाच्या बाबींवर अवलंबून असतो.

१) कर्जाची रक्कम
२) CIBIL स्कोर
३) गृह कर्ज योजना
४) रोजगार पद्धती: नोकरी/ स्वयंरोजगार
५) महिला व संरक्षण दलातील व्यक्तींना व्याजदरात सवलत


कर्जाची परतफेड:

१) घर किंवा फ्लॅट दुरुस्ती नूतनीकरण यासाठी घेतलेल्या कर्जासाठी वीस वर्षाचा परतफेड कालावधी.
२) इतर योजनांसाठी तीस वर्षांचा परतफेड कालावधी
३) अर्जदाराला वयाच्या 75 व्या वर्षाच्या कर्जाची परतफेड करावी लागते.
४) नियमितपणे सर्व मासिक हप्ते भरल्यास शेवटचे दोन हप्ते बँक माफ करते.


स्थगिती कालावधी:

१) घर खरेदी किंवा बांधकाम तसेच विस्तारासाठी गृह कर्ज वितरित झाल्यानंतर 36 महिन्यापर्यंतचा स्थगिती कालावधी
२) प्लॉट खरेदी साठी स्थगिती कालावधी नाही.
३) घर दुरुस्ती व नूतनीकरणासाठी स्थगिती कालावधी नाही.


बँक ऑफ महाराष्ट्र द्वारा मिळणाऱ्या गृहकर्जाची रक्कम:

घर /फ्लॅटची खरेदी/ बांधकाम/ विस्तार तसेच नवीन प्लॉट खरेदी करून त्यावर बांधकाम करण्यासाठी ग्राहकाला मिळणाऱ्या गृहकर्जाची अधिकतम मर्यादा पुढील बाबींवर अवलंबून असते.

१) Maximum permissible LTV
२) Permissible deduction norms
३) कर्जाची रक्कम

दुरुस्ती व नूतनीकरणासाठी मिळणाऱ्या गृहकर्जाची मर्यादा पुढील बाबींवरील ठरवली जाते.

१) दुरुस्ती नुतनीकरण बदलाचा एकूण खर्चाच्या 100 टक्‍क्‍यांपर्यंत.
२) कर्जाची कमाल मर्यादा: मालमत्तेच्या मूल्यांकन अहवालानुसार (valuation report) एकूण मूल्याच्या २५% रक्कम (valuation report तीन वर्षांपेक्षा जास्त जुना नसावा)
३) वरील दोन पर्यायांमधील कमी असलेली रक्कम कर्ज म्हणून दिली जाते.


बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जासाठी लागणारी कागदपत्रे

बँक ऑफ इंडिया गृहकर्जासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१) गृहकर्जासाठीचा अर्ज

२) २ पासपोर्ट साईज फोटो

३) ओळखपत्र: पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालक परवाना, पासपोर्ट, नोकरी करत असलेल्या ठिकाणचे ओळखपत्र इत्यादी.

४) पत्ता संदर्भात पुरावा: आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, विज देयक, दूरध्वनी देयक इत्यादी.

५) नोकरी करत असणाऱ्या व्यक्तींसाठी:-

 • मागील तीन महिन्याच्या सॅलरी स्लिपच्या मुळ प्रत.
 • आयकर विभागाकडून मिळालेल्या मागील दोन वर्षाच्या आयकर परताव्याची प्रत किंवा फॉर्म-16 ची प्रत
 • इतर बँकांमध्ये अर्जदाराचे खाते असल्यास तिथला सहा महिन्यांच्या बँक स्टेटमेंट.
 • नोकरी करीत असलेल्या एम्प्लॉयरकडून जेव्हा शक्य असेल तेव्हा मासिक हप्ता पाठवण्याची हमी.

६) नोकरी न करणारे/ व्यापारी/ व्यवसायिक व्यक्तींसाठी:-

 • उत्पन्न, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ऑडिट रिपोर्ट इत्यादी बाबी समाविष्ट असलेला मागील तीन वर्षांचा आयकर परतावा
 • कर नोंदणीची प्रत
 • शॉप एस्टॅब्लीशमेंट ॲक्ट
 • कंपनी नोंदणी परवाना
 • मागील एक वर्षासाठीचा बँक स्टेटमेंट

७) जामीनदार अर्ज (नेट वर्थ/उत्पन्नाचा पुराव्या सहित)

८) जामीनदाराच्या आयकर परतावा KYC कागदपत्रांसहीत.

या कागदपत्रांसह अर्जदाराला संपत्ती संदर्भातील कागदपत्रे तसेच योजनेनुसार इतर काही कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात.


हा लेख लिहिण्याचा मूळ हेतू हा फक्त बँक ऑफ इंडिया गृहकर्जासंदर्भातील माहिती पुरविणे इतकाच आहे व कोणताही आर्थिक सल्ला देणे हा यामागचा उद्देश नाही. यामध्ये दिलेली माहिती हि लेखाच्या प्रकाशनावेळी मिळवलेली आहे. त्यामुळे काळानुसार या माहितीमध्ये बदल झालेले असू शकतात. त्यामुळे या गोष्टीची वाचकांनी नोंद घ्यावी. 

हे सुद्धा अवश्य वाचा:

Share on:

Leave a Comment