चिमणीवर 10 ओळी | 10 lines on sparrow in Marathi

10 lines on sparrow in Marathi मित्रहो आज आपण या लेखात चिमणीवर 10 ओळी पाहणार आहोत. चिमणी हा साधारणतः छोट्या आकाराचा व सर्वत्र दिसून येणारा पक्षी आहे. तसेच ती अत्यंत चपळ असून थव्याने एकत्र राहते. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.

10 lines on sparrow in Marathi

चिमणीवर 10 ओळी 10 lines on sparrow in Marathi

चिमणीवर 10 ओळी (सेट १)

१) चिमणी छोट्या आकाराचा तसेच करड्या व पांढऱ्या रंगाचा पक्षी आहे.

२) चिमणी हा थव्याने राहणारा पक्षी आहे.

३) चिमणी ही मानवी वस्तीमध्ये तसेच जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.

४) चिमणीला दोन पाय, दोन डोळे, दोन पंख‌ व एक चोच असते.

५) चिमणी ही कीटक, बिया, तसेच फळे खाते.

६) चिमणी झाडावर किंवा घराच्या कोपऱ्यांमध्ये घरटी करून राहते.

७) नर चिमणी ही मादी चिमणी पेक्षा आकाराने मोठी असते.

८) चिमणी वनस्पतींमध्ये परागीभवन करण्यास मदत करते.

९) दरवर्षी २० मार्च हा चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.

१०) चिमणी हा पक्षी, जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे.

चिमणीवर 10 ओळी (सेट २)

१) चिमणी हा सर्वत्र आढळणारा सुंदर व चपळ पक्षी आहे

२) चिमणी हा पक्षी थव्यांमध्ये सर्वत्र आढळून येते.

३) चिमणी ही यूरोप व आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.

४) चिमणी ही साधारणतः छोट्या आकाराची असून तिला दोन पाय, दोन डोळे, छोटीशी चोच व दोन पंख असतात.

५) चिमणी ही करड्या रंगाची असते तसेच नर चिमणीची मान तपकिरी रंगाची असते.

६) चिमणी पिकांवरील कीटकांचा नाश करण्यास मदत करते.

७) चिमणी कीटक बिया तसेच फळ खाते.

८) साधारणतः चिमणी तीन वर्ष इतका काळ जगते.

९) सध्या मोबाइल टॉवरच्या वाढत्या संख्येमुळे चिमणीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

१०) दरवर्षी भारतामध्ये वीस मार्च हा दिवस चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.

Share on:

Leave a Comment