पोस्ट ऑफिसवर 10 ओळी | 10 lines on post office in Marathi

10 lines on post office in Marathi मित्रहो आज आपण या लेखात पोस्ट ऑफिसवर 10 ओळी पाहणार आहोत. पोस्ट सुविधा ग्राहकांना अनेक पद्धतीने मदत करत असते. पोस्ट सेवेचा वापर करून पत्र व्यवहार करता येतो तसेच पैसे किंवा वस्तू पाठवण्यासाठी देखील पोस्टाचा वापर केला जातो. पोस्ट सुविधा ही भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात तसेच प्रत्येक गावात उपलब्ध आहे. चला तर मग अधिक माहिती करून घेउया.

10 lines on post office in marathi

पोस्ट ऑफिसवर 10 ओळी 10 lines on post office in Marathi

पोस्ट ऑफिसवर 10 ओळी (सेट १)

१) पोस्ट ऑफिस ही सेवा भारत सरकार द्वारा चालवली जाते.

२) भारतामध्ये पोस्ट सेवेचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो.

३) पोस्ट सेवा हे ग्राहकांना अनेक प्रकारे मदत करते.

४) भारतीय पोस्ट या सेवेचा वापर कागदपत्र, पत्र, पैसे तसेच वस्तू पाठवण्यासाठी केला जातो.

५) भारतीय पोस्ट सेवेचे मुख्यालय हे दिल्लीमध्ये आहे.

६) भारतामध्ये पोस्ट सेवा जवळ-जवळ प्रत्येक गावांमध्ये पोहोचली आहे.

७) पोस्ट ऑफिसमध्ये मुख्य अधिकाऱ्यांना पोस्टमास्तर असे म्हणतात.

८) तसेच पत्रांचे वाटप करणाऱ्या व्यक्तीला पोस्टमन असे म्हणतात.

९) पत्र पाठवण्यासाठी प्रत्येक गावाचा किंवा शहराचा सहाअंकी पिनकोड पत्त्यामध्ये टाकावा लागतो.

१०) पोस्ट ऑफिस ग्राहकांना दूरध्वनी, तार तसेच बँक अशा सुविधा पुरवते.

पोस्ट ऑफिसवर 10 ओळी (सेट २)

१) भारतामध्ये पोस्ट सेवेला १ एप्रिल १८५६ मध्ये सुरुवात केली गेली.

२) पोस्टामध्ये पत्रव्यवहार, मनीऑर्डर तसेच बँकिंग सेवा उपलब्ध असते.

३) भारतीय पोस्ट सेवेमध्ये ४१६०८३ इतके कर्मचारी कार्यरत आहेत.

४) पोस्ट ऑफिस तसेच पोस्ट पेटी ही लाल रंगाची असते.

५) सुरवातीच्या काळात पोस्ट दुसरीकडे पाठवण्यासाठी घोड्यांचा वापर केला जात असे तर सध्या पोस्ट पाठवण्यासाठी रेल्वेचा वापर केला जातो.

६) पत्र किंवा वस्तू जलद पाठवण्यासाठी स्पीड पोस्ट सुविधेचा वापर केला जातो.

७) सध्याही कागदपत्रे किंवा वस्तू पाठवण्यासाठी पोस्ट सेवेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

८) भारतामध्ये जगातील सर्वात मोठी पोस्ट सेवा अस्तित्वात आहे.

९) भारतामध्ये पोस्ट ऑफिसच्या अनेक बँका उपलब्ध आहेत.

१०) यामध्ये जीवन विमा, एटीएम, बचत खाते अशा विविध सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात.

Share on:

Leave a Comment