माझ्या आवडत्या प्राण्यावर 10 ओळी

10 lines on my favourite animal in marathi मित्रहो आपण आज या लेखात माझ्या आवडत्या प्राण्यावर 10 ओळी माहिती करून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.

10 lines on my favourite animal in marathi

माझ्या आवडत्या प्राण्यावर 10 ओळी 10 lines on my favourite animal in Marathi (सेट १)

१) कुत्रा हा माझा अत्यंत आवडता प्राणी आहे.

२) कुत्रा हा जगभरात अनेक प्रजातींमध्ये सर्वत्र आढळून येतो.

३) कुत्र्याला चार पाय, दोन कान, दोन डोळे व एक शेपूट असते.

४) कुत्र्याचे नाक अत्यंत तीक्ष्ण असते व त्याचा वापर करून तो एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा शोध घेऊ शकतो.

५) कुत्रा हा शाकाहारी व मांसाहारी असे दोनही प्रकारचे अन्न खातो.

६) काही प्रजाती चे कुत्रे अत्यंत केसाळ असतात तर काही प्रजातीच्या कुत्र्यांवर अत्यंत बारीक केस असतात.

७) कुत्रा हा पांढरा काळा तांबूस राखाडी अशा अनेक रंगांमध्ये दिसून येतो.

८) तो एका अत्यंत इमानदार प्राणी आहे व त्याच्या इमानदारीचे किस्से इतिहासातही आढळून येतात.

९) कुत्र्याच्या आवाजाला भुंकणे असे म्हटले जाते.

१०) कुत्रा हा अत्यंत वेगाने पळू शकतो.

माझ्या आवडत्या प्राण्यावर 10 ओळी (सेट २)

१) कुत्रा हा माझा अत्यंत आवडता प्राणी आहे व तो इतर प्राण्यांपेक्षा मला खूप आवडतो.

२) कुत्रा हा मांजराप्रमाणेच अत्यंत माणसाळलेला प्राणी आहे.

३) कुत्रा हा मालकाच्या अनुपस्थितीत घराची किंवा शेताची राखण करतो.

४) कुत्रा हा पाण्यात उत्तमरित्या पोहू शकतो.

५) तो त्याच्या मालकाचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत तत्पर असतो.

६) कुत्र्यांचा समावेश पोलिसदलामध्ये तसेच सैन्यदलामध्येही केला जातो.

७) जगभरात कुत्र्यांच्या विविध प्रजाती अस्तित्वात आहेत त्यामुळे प्रत्येक प्रजाती ही रंग, आकार, केस यानुसार वेगवेगळे असते.

८) काही ठिकाणी कुत्र्यांचा वापर शिकार करण्यासाठी देखील केला जातो.

९) हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत जगभरात सर्वत्र आढळून येतो.

१०) कुत्रा हा अत्यंत इमानदार व खेळकर प्राणी आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment