गौतम बुद्ध वर 10 ओळी | 10 lines on Gautam buddha in Marathi

10 lines on Gautam buddha in Marathi मित्रहो आज आपण या लेखात गौतम बुद्ध वर 10 ओळी पाहणार आहोत. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक असून ते जगातील महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. सध्या जगभरात त्यांचे 210 कोटीहून अधिक अनुयायी आहेत. चला तर माहिती करून घेऊया.

10 lines on gautam buddha in marathi

गौतम बुद्ध वर 10 ओळी 10 lines on Gautam buddha in Marathi

10 lines on Gautam buddha in Marathi (सेट १)

१) गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ हे होते.

२) गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत.

३) गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ मध्ये नेपाळमधील लुंबिनी येथे झाला.

४) त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन व आईचे नाव महामाया हे होते.

५) गौतम बुद्ध यांच्या पत्नीचे नाव यशोधरा होते व मुलाचे नाव राहुल हे होते.

६) त्यांनी वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी संन्यास मार्गाचा स्वीकार केला.

७) वयाच्या पस्तिसाव्या वर्षी बोधीवृक्षाच्या सान्निध्यात त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.

८) भगवान बुद्धांची शिकवण ही पाली या भाषेमध्ये लिहिली गेली.

९) गौतम बुद्धांच्या मते माणसाच्या अपेक्षा हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे.

१०) सध्या जगभरात भगवान बुद्धांचे 210 कोटी इतके अनुयायी आहेत.

10 lines on Gautam buddha in Marathi (सेट २)

१) गौतम बुद्ध हे महान धार्मिक गुरु व बौद्ध धर्माचे संस्थापक होते.

२) गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ तेथे लुंबिनी विहार येथे झाला.

३) त्यांच्या पित्याचे नाव राजा शुद्धोधन व मातेचे नाव महामाया हे होते.

३) गौतम बुद्धांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांची मावशी गौतमीने त्यांचा सांभाळ केला.

५) वयाच्या सोळाव्या वर्षी गौतम बुद्धांचा यशोधरा यांच्याशी विवाह झाला.

६) वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गौतम बुद्धांसमोर जगाचे वास्तव स्वरूप आल्यानंतर त्यांनी संन्यास स्वीकारला.

७) अत्यंत कठोर साधनेनंतर त्यांना वयाच्या पस्तिसाव्या वर्षी बोधिवृक्षाच्या सानिध्यात ज्ञानधारणा झाली.

८) गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर चारशे वर्षानंतर त्यांची शिकवण लिखित स्वरूपात अस्तित्वात आली.

९) इसवी सन पूर्व ४८३ मध्ये गौतम बुद्धांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी महापरीनिर्वाण झाले.

१०) गौतम बुद्धांच्या मते माणसाच्या न संपणाऱ्या इच्छा ह्या त्याच्या दुःखाचा मूळ कारण आहे.

Share on:

Leave a Comment